/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

मी आहे ना !!!

User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

एक दिवस साधना व संजय ऑफिसला जायच्या गडबडीत असता साधनाचा 'सेलफोन' वाजला.ती स्वतःच्या तयारीत बिझी असल्याने सुनीलने रिसीव्ह केला. "हेलो, कोण ? काय ? होय .. हुं हुं..बरं आम्ही येतो ताबडतोब.." असे म्हणून त्याने फोन डिस्कनेक्ट केला. "काय झाले ?" साधनाने त्याचा गंभीर चेहरा पाहून काळजीने विचारले.

"लौकर चल.." घाईघाईने तिचा हात धरून तो चालताचालता म्हणाला " रस्त्यात सांगतो.." असे म्हणून त्याने गाडी बाहेर काढून सफाईदार वळण घेत कोथरूडच्या दिशेने घेतली. "काय झाले ?" साधनाने विचारले "आपण कुठे चाललोय ?"

"आपण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला चाललोय.." "आईंचा फोन होता का ? अंगद तर ठीक आहे ना ?" तिच्या मनात विविध विचार फेर धरून नाचू लागले. "सर्व ठीक आहेत ..काळजी करू नकोस तू साधना .." सुनील म्हणाला. "मग कोणाला काय झालंय की आपण .." तिचे वाक्य अध्र्यावर तोडत सुनील म्हणाला "संजयला अपघात झालाय.."|

हे ऐकताच ती सुन्नच झाली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.सुनीलला समजू नये म्हणून तिने आपले तोंड दुस-या बाजूला वळवले व मूकपणे रडू लागली पण सुनीलच्या नजरेतून ते सुटले नाही. "याक्षणी तो 'आउट ऑफ डेंजर' आहे.." सुनील तिची काळजी कमी व्हावी म्हणून म्हणाला..पण ते ऐकूनही तिचा जीव थान्यावर नव्हता.

"संजय ..माझा संजय ..काय झालं असेल त्याला ?" ती स्वतःशीच म्हणाली व देवाचा धावा करू लागली.

हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर ते त्वरेने ओ.पी.डी.त गेले.तिथे त्यांना कळले की संजयला वॉर्ड नं. ३२ मध्ये हलवले आहे.

त्या दोघांनी तिथे जाऊन संजयला शोधून काढले. Accident जबरदस्तच झाला असावा कारण संजयला बरेच जास्त लागले होते.मात्र त्याची बिकट अवस्था पाहताच साधनाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही...त्याक्षणीच ती त्याला मिठी मारून ढसढसा रडू लागली.संजयवर उपचार करणारा डॉक्टर तिच्याकडे पाहू लागताच सुनीलने तिला उठवून बाजूला केले व डॉक्टरशी बोलून त्याच्या स्थितीची माहिती घेतली. अपघाताच्या वेळी संजय प्रचंड प्यालेला होता व बहुदा आत्महत्येच्या इराद्याने गाडीखाली आला असावा असे त्याला admit केलेल्या प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे असल्याचे डॉक्टरने सांगताच सुनीलने त्वरेने पुढील हालचाली केल्या.सर्वप्रथम त्याने डॉक्टरला रिक्वेस्ट करून "उद्या दुपारपर्यंत संजयचे पोलीस स्टेटमेंट घेऊ देऊ नका .." असे कन्व्हिन्स केले व त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणा-या सज्जन गृहस्थाचा सेल नंबर घेतला. त्याला पटवता पटवता सुनीलला नाकीनऊ आले पण सरतेशेवटी स्टेटमेंट

| "अपघाताचे"च रेकॉर्ड व्हावे अशी व्यवस्था झाली. ( रेकॉर्ड करणाच्या पोलिसाला पाच हजार द्यावे लागणार होते ते वेगळेच !!)

एव्हढे झटपट करून सुनील साधनाकडे आला व तिथेच थबकला.कारण त्याने तिला पाठीमागून पहिले तर काय ?| तिचे रडणे अजूनही थांबले नव्हते. "काळजी करू नकोस साधना.."

सुनीलने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर देत म्हणाला " मी आहे ना तुझ्या सोबत, संजयला ठीक करूनच आपण घरी नेऊ.."

हे ऐकताच साधनाने रडतच सुनीलला मिठी मारली."प्लीज साधना, कंट्रोल युवरसेल्फ. मी आहे ना.." सुनील तिच्या पाठीवर हळूहळू थोपटू लागला. तोपर्यंत "एक्स-रे" रिपोर्टस आलेले होते.संजयच्या डोक्याला इजा झाल्याने M.R.I. करावा लागणार होता व पायाचे Fracture झाले होते. त्याला 'डिस्चार्ज' मिळायला कमीतकमी ३ आठवडे लागणार होते.
सुनीलने सेलवरूनच त्या दोघांचीही २ दिवसांची रजा टाकली.

****
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

दोन-तीन दिवसांनंतर संजयला शुद्ध आली व समोर साधनाला पाहताच तो चमकलाच !! पण नंतर त्याने साधनाकडून सगळा "वृतांत" काढून घेतला.साधनाने सुनीलला "संजय शुद्धीवर आला" हे कळवताच तोही संजयला भेटायला ताबडतोब आला. पुढचे २-३ दिवस ते दोघंही आळीपाळीने संजयला 'अटेंड' करत होते व नंतर डॉक्टरच्या advice प्रमाणे ते फक्त "व्हीझीटिंग अवर्स"ला येऊ लागले. पण एक दिवस संजयचा अस्वस्थपणा अचानकच वाढताच डॉक्टरने त्याला 'सिडेटिव्ह' दिले पण खरे कारण वेगळेच होते. ५-६ दिवसात "दारू न मिळाल्यामुळे" त्याची तडफड होऊ लागली होती. संध्याकाळी साधना त्याला भेटायला आली असता त्याने गोडगोड बोलून (| "काहीतरी चटपटीत खमंग" खाण्यासाठी म्हणून ) साधनाकडून पैसे घेतले व वॉर्डबॉयला पटवून एक क्वार्टर दारू मागवून "खटाखट" मारली पण डॉक्टरला कळल्यामुळे त्याने सुनीलला बोलावून तंबी देताच त्याच्या लक्षात सर्व प्रकार आला.

त्याने "दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सला 'कन्सल्ट' करून शांतपणे संजयला 'मुक्तांगण' या Rehab Center मध्ये शिफ्ट केले पण त्याने एक चूक केली व ती ही की त्याने संजयच्या "शिफ्टिग"चे कारण साधनाला सांगितले नाही जेणेकरून तिला 'गिल्टी' वाटू नये. | तिथे पहिले ३-४ दिवस त्याने खूप आरडओरड करून Rehab Center डोक्यावर घेतले कारण त्याला एकतर "प्लास्टर"मुळे मनाजोगे हलताच येत नव्हते व Center च्या लोकांना अश्या लोकांच्या 'या' वागण्याची सवय'

असल्याने त्यांनी 'हे' प्रकार खपवून घेतले व त्याच्या 'मेडिकल ट्रीटमेंट'सोबतच Rehabilitationची ट्रीटमेंट सुरु | केली.(त्यात सर्वात पहिली स्टेप म्हणजे 'प्रॉब्लेम'ला 'अरेस्ट' करणे... अर्थात 'पेशंट'ला 'अरेस्ट' म्हणजेच "आयसोलेट"| करणे,ही असते. 'पेशंट'चे 'प्रकार' पाहणारा व ऐकणारा कोणीही नसतो. संध्याकाळी डॉक्टर व्हिजीटला येतात तेव्हा जर का पेशंटने त्यांना शिव्या दिल्या तर ते शांतपणे चालले जातात व दुस-या दिवशी येतात.) सुनील जरी फोनवरून Rehab Center च्या 'टच'मध्ये होता तरी साधनाला त्याची खबरबात न मिळाल्याने चार दिवसांनंतर जेंव्हा साधना त्याला भेटायला आली तेंव्हा संजय तिला मिठी मारून ढसढसा रडला व तिचे प्रचंड 'Emotional Blackmail' करून तिला म्हणाला "साधना,तू कसेही करून मला इथून घरी घेऊन चल किंवा मला "अ-ग-दीsss थोssss-डी-शी-च" दारू आणून दे ..कारण 'सवयीप्रमाणे' दारू न मिळाल्यामुळे माझे हात पाय थंड पडत चाललेत व बी.पी.अगदी 'लो' होतंय..या अश्या Rehab Center चे लोक "या बाबतीत" इतके "निर्दय" असतात की पेशंट मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही... पण हे जर का असंच चालू राहिलं तर २-४ दिवसात मी मरून जाईन.Please...साधना प्लीज... फक्त एक क्वार्टर ..कारण तेवढ्याने मला "काहीही" होत नाही हे तर तुला माहित आहेच !!"

बिचारी साधना हे ऐकून फारच गांगरली. या परिस्थितीत यावर काय करावे हे तिला कळेना ..!! "बघते काहीतरी..उद्या आणून देते." ती कशीबशी म्हणाली. "नक्की ?" त्याने आशाळभूतपणे विचारले. "होय..अगदी नक्की !!" असे म्हणून ती तिथून निघाली. "एक लक्षात ठेव की सुनीलला 'हे' कळू देऊ नकोस."त्याने तिला बजावले.

तिने दुस-या दिवशी त्याला "घरच्या बार"मधून एक क्वार्टर व्हिस्की त्याला चोरून दिली.त्याने ती "खटाखट मारली" व नंतर साधनाला एक तासभर छानछान Romantic गाणी ऐकवली.त्याचा आवाज ऐकून 'सेंटर'चे 'अटेंडन्टस' ही फसले कारण त्यांना वाटले की हा पेशंट 'स्वतःला विरंगुळा' म्हणून गाणी गातोय व तसाही संजय हा प्रचंड ताकतीचा असा 'प्रोफेशनल सिंगर' असल्यामुळे त्याची गाणी ऐकून तेही खुश झाले.

डॉक्टरची 'राउंड'ची वेळ जवळ आल्याचे लक्षात येताच संजयने चालूपणा करून "साधना, आता मी थकलोय.. मी आता झोपतो, तू घरी जा व उद्याही येतांना माझ्यासाठी 'घेऊन' ये व प्लीज कोणालाही आपले 'हे' गुपित कळू देऊ नकोस."असे म्हणून तिचे चुंबन घेतले. भोळीभाबडी साधना त्याच्या 'नाटकांना' व्यवस्थित फसली होती. त्याच्या अश्या सांगण्यामुळे ती तिथून त्याचा निरोप घेऊन घरी आली.

| दुस-या दिवशी कधी नव्हे ते सुनील आयुष्यात पहिल्यांदा साधनाला "सॉलिड" रागावला...कारण पूर्ण Rehab Center जरी फसलं तरी डॉक्टर फसले नव्हते.त्यांनी सेन्टरच्या स्टाफला जोरदार झापून व "पेशंटला दारू कोणी आणून दिली ?" ह्याचा पूर्ण मागोवा घेऊन व स्वतःची खात्री करूनच साधनाची "करतूत" सुनीलला सांगितली. त्यावर तिने "संजयची अवस्था मला न पहावल्यामुळे मी असं केलं..आय एम सो सॉरी.. " अशी कबुली देत चक्क रडू लागली. त्यामुळे त्यानेही तिला ताबडतोब मिठीत घेऊन "साधना जाऊ दे..झालं ते झालं पण यापुढे आता त्याच्या कुठल्याही 'नाटकांना' प्लीज भुलू नकोस.. कारण संजय त्याशिवाय यातून बाहेर येणार नाही." असे समजावले व "तो | तुला ज्याही-काही "स्किमा" देईल त्या तू मला सांग.म्हणजे त्यावर काय उपाय करायचा ते मी बघतो." हेही निघून सांगितले.

त्यानंतर सुनीलने स्वतः सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

साधना जेंव्हाही संजयला भेटायला जात असे तेंव्हा तोही (मुद्दाम) तिच्या बरोबरच जात असे व त्यामुळे संजयचा दारूचा "सोर्स" बंद झाला व "आपली" साधना सुनीलने "आपल्यापासून चोरली" हा नवीनच विचार त्याच्या मनात घर करू लागला होता.सुनीलचे त्याच्यावर अगदी "कावळ्यासारखे लक्ष" होते कारण त्याला डॉक्टरने "ह्या स्टेजमध्ये मनुष्याची सारासार विचारशक्ती नष्ट होऊन त्याला सतत दारूचाच "ध्यास" लागलेला असतो व त्यामुळे त्याच्या मार्गात "जोही" येईल तो त्याला त्याचा "कट्टर वैरी" वाटत असतो." हे सांगून ठेवल्याने तो सावध होताच.
दारूबिना आठवडाभरापेक्षा जास्ती वेळ झाल्याने एक दिवस संधी साधून संजयने पळण्याचा प्रयत्न केला पण सेंटरपासून अवघ्या पाव किलोमीटरमधेच तो पकडल्या गेला ... कारण त्याच्या पायाला प्लास्टर असल्याने त्याला जास्ती दूर जाता आले नाही.(रादर त्याच्या पायाच्या प्लास्टरमुळेच स्टाफचे दुर्लक्ष झाले असता तो पळू शकला.) संजयला पकडून आणल्यावर डॉक्टरने सुनीलला ही बातमी दिली असता सुनील डॉक्टरला (व संजयलाही) भेटावयास आला असतांना त्याला पाहून तर संजयने "नीट बघून घ्या डॉक्टर ह्याला, हाच मादरचोद माझ्या "ह्या"|

अवस्थेला कारणीभूत आहे ..ह्याचा पहिलेपासूनच साधनावर डोळा होता व तिला मिळवायला हा कुठल्याही थरावर जाऊ शकतो... ह्याच्याच बहकाव्याने साधना माझ्याशी भांडत असे व तिची कटकट सहन होईना म्हणून मी दारू पिऊ लागलो. नंतर ह्याने कधी मदतीच्या बहाण्याने तर कधी 'तुमचा समेट करून देतो..' या बहाण्याने साधनाच्या मनात विष भरवले व तिने माझ्याशी 'डायव्होर्स' घेतला.माझा 'काटा' काढल्यानंतरचे सगळेच सोपे होते ..आणि आता बघा कसा हा मादरचोद "जगाच्या व साधनाच्या नजरेत किती "महान" होऊ इच्छितो. ह्याच्याकडून खरंतर "अमिताभने अभिनयाचे धडे घ्यावे" अशी परिस्थिती आहे.. डॉक्टर, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना ? ठीक आहे.. मी मेल्यावर एक दिवस मात्र तुमचा नक्कीच विश्वास बसेल...."

डॉक्टरने फक्त आपल्या असिस्टंटकडे पाहिले. त्यावर त्याने स्टाफच्या मदतीने संजयची उचलबांगडी करून त्याला रुममध्ये कोंडून ठेवल्याने व थकून गेल्याने त्याची पुढची "बडबड" थांबली.

पण संजयची मुक्ताफळे ऐकून मात्र सुनील कधी नव्हे ते प्रचंड "डीमॉरलाईझ" झाला. असले "आरोप" आपल्यावर होतील याची त्याने मुळीच कल्पना केली नव्हती. डॉक्टरच्या ताबडतोब लक्षात आले व त्यांनी त्याला ताबडतोब धीर देत त्याला म्हणाले- "सुनील तू ह्याच्या बडबडीकडे मुळीच लक्ष देऊ नकोस...'अश्या' पेशंटला अश्या 'स्टेज'मध्ये 'असेच' बोलावेसे वाटते कारण बरेच दिवस दारू न मिळाल्याने ते स्वतः इतके जास्तीचे "डीजेक्टेड" असतात की ते आजूबाजूला असेच वातावरण निर्माण करतात. आम्ही त्यांना नीट समजावून, कधी त्यांच्या कलाने घेऊन तर कधी आजसारखे निष्ठुरपणे त्यांना "आयसोलेट" करून पण सरतेशेवटी त्यांना दारूच्या विळख्यातून बाहेर काढून घरी पाठवतो पण घरी जर असे वातावरण त्यांना मिळाले नाही तर ते पुनःपुन्हा त्याच मार्गावर जातात व नंतर त्यांच्या घरचे लोक त्यांना 'इथे' घेऊन येतात. बरं झालं की आज साधना इथे आली नाही नाहीतर .." असे म्हणून ते चूप बसले.

त्यावर काहीही न बोलता सुनील तिथून निघून गेला कारण त्यालाच माहित नव्हते की साधनाने संजयच्या 'ह्या' प्रकारावर कसे react केले असते ते !!

********
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

(^%$^-1rs((7)
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मी आहे ना !!!

Post by SATISH »

😘 😝 (#%j&((7) मस्त अपडेट भाऊ मजा आली सेक्सी स्टोरी

Return to “Marathi Stories”