एक दिवस साधना व संजय ऑफिसला जायच्या गडबडीत असता साधनाचा 'सेलफोन' वाजला.ती स्वतःच्या तयारीत बिझी असल्याने सुनीलने रिसीव्ह केला. "हेलो, कोण ? काय ? होय .. हुं हुं..बरं आम्ही येतो ताबडतोब.." असे म्हणून त्याने फोन डिस्कनेक्ट केला. "काय झाले ?" साधनाने त्याचा गंभीर चेहरा पाहून काळजीने विचारले.
"लौकर चल.." घाईघाईने तिचा हात धरून तो चालताचालता म्हणाला " रस्त्यात सांगतो.." असे म्हणून त्याने गाडी बाहेर काढून सफाईदार वळण घेत कोथरूडच्या दिशेने घेतली. "काय झाले ?" साधनाने विचारले "आपण कुठे चाललोय ?"
"आपण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला चाललोय.." "आईंचा फोन होता का ? अंगद तर ठीक आहे ना ?" तिच्या मनात विविध विचार फेर धरून नाचू लागले. "सर्व ठीक आहेत ..काळजी करू नकोस तू साधना .." सुनील म्हणाला. "मग कोणाला काय झालंय की आपण .." तिचे वाक्य अध्र्यावर तोडत सुनील म्हणाला "संजयला अपघात झालाय.."|
हे ऐकताच ती सुन्नच झाली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.सुनीलला समजू नये म्हणून तिने आपले तोंड दुस-या बाजूला वळवले व मूकपणे रडू लागली पण सुनीलच्या नजरेतून ते सुटले नाही. "याक्षणी तो 'आउट ऑफ डेंजर' आहे.." सुनील तिची काळजी कमी व्हावी म्हणून म्हणाला..पण ते ऐकूनही तिचा जीव थान्यावर नव्हता.
"संजय ..माझा संजय ..काय झालं असेल त्याला ?" ती स्वतःशीच म्हणाली व देवाचा धावा करू लागली.
हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर ते त्वरेने ओ.पी.डी.त गेले.तिथे त्यांना कळले की संजयला वॉर्ड नं. ३२ मध्ये हलवले आहे.
त्या दोघांनी तिथे जाऊन संजयला शोधून काढले. Accident जबरदस्तच झाला असावा कारण संजयला बरेच जास्त लागले होते.मात्र त्याची बिकट अवस्था पाहताच साधनाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही...त्याक्षणीच ती त्याला मिठी मारून ढसढसा रडू लागली.संजयवर उपचार करणारा डॉक्टर तिच्याकडे पाहू लागताच सुनीलने तिला उठवून बाजूला केले व डॉक्टरशी बोलून त्याच्या स्थितीची माहिती घेतली. अपघाताच्या वेळी संजय प्रचंड प्यालेला होता व बहुदा आत्महत्येच्या इराद्याने गाडीखाली आला असावा असे त्याला admit केलेल्या प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे असल्याचे डॉक्टरने सांगताच सुनीलने त्वरेने पुढील हालचाली केल्या.सर्वप्रथम त्याने डॉक्टरला रिक्वेस्ट करून "उद्या दुपारपर्यंत संजयचे पोलीस स्टेटमेंट घेऊ देऊ नका .." असे कन्व्हिन्स केले व त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणा-या सज्जन गृहस्थाचा सेल नंबर घेतला. त्याला पटवता पटवता सुनीलला नाकीनऊ आले पण सरतेशेवटी स्टेटमेंट
| "अपघाताचे"च रेकॉर्ड व्हावे अशी व्यवस्था झाली. ( रेकॉर्ड करणाच्या पोलिसाला पाच हजार द्यावे लागणार होते ते वेगळेच !!)
एव्हढे झटपट करून सुनील साधनाकडे आला व तिथेच थबकला.कारण त्याने तिला पाठीमागून पहिले तर काय ?| तिचे रडणे अजूनही थांबले नव्हते. "काळजी करू नकोस साधना.."
सुनीलने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर देत म्हणाला " मी आहे ना तुझ्या सोबत, संजयला ठीक करूनच आपण घरी नेऊ.."
हे ऐकताच साधनाने रडतच सुनीलला मिठी मारली."प्लीज साधना, कंट्रोल युवरसेल्फ. मी आहे ना.." सुनील तिच्या पाठीवर हळूहळू थोपटू लागला. तोपर्यंत "एक्स-रे" रिपोर्टस आलेले होते.संजयच्या डोक्याला इजा झाल्याने M.R.I. करावा लागणार होता व पायाचे Fracture झाले होते. त्याला 'डिस्चार्ज' मिळायला कमीतकमी ३ आठवडे लागणार होते.
सुनीलने सेलवरूनच त्या दोघांचीही २ दिवसांची रजा टाकली.
****