डोंबीवली फास्ट
लेखक:- विकी
मधु दमुन भागुन घरी पोचला तेव्हा ११ वाजले होते. लॅच किने दार उघडुन तो फ्लॅटमध्ये शिरला व सरळ बेडरुममध्ये जावुन फॅन लावला. शिरतानाच त्याने ब्रिफकेस टेबलावर आदळली. अंगावरचे घामट कपडे ओरबाडून काढले व बाथरूमध्ये जावुन शॉवर खाली उभा राहिला.
अंघोळी नंतरही त्याला घामट वाटत होते. त्याने अंगावर फक्त एक अर्धी चड्डी ठेवली होती. वर फॅन फुल स्पीडमध्ये चालु होता. तरी मधुची अंगाची तगमग व बेचैनी कमी होत नव्हती. त्याला रागिणीची एकदम खुप आठवण आली.
त्याची बायको रागिणी बिचारी रोज नाईट शिफ्ट करत होती. प्रशिक्षीत परिचारीका असलेली आगिणी, गेली सहा वर्षे ती एका प्रसिध्द रुग्णालयात नर्सची नोकरी करत होती. त्याक्षणी तरी मधुला रागिणीची खुप उणीव भासत होती.
मधुने व रागिणीने मिळून सहा वर्षापुर्वी कर्ज घेवुन त्यांनी त्यांचा हा फ्लॅट विकत घेतला, खर तर हा फ्लॅट घेणे मधुच्या आवाक्या बाहेर होते. एक खोलीच्या जिर्ण चाळीतुन त्यांना बाहेर पडायचे होते. पण त्यांनी उडी मारली ती एकदम दोन बेडरुम हॉल, किचनच्या त्याच्या डोंबीवलीच्या सदनिकेत. तेव्हा तो घ्यायची त्यांची एपतही नव्हती किंवा अवकातही नव्हती.
त्याने कर्ज तर मिळवले, पण ते डोक्यावरचे भले मोठे कर्ज कसे फेडणार हा प्रश्न होताच. मग त्या वेळी मधु व रागिणीने ठरवले की रागिणी परत नोकरी करणार, बारा वर्षाच्या मोया गॅपनंतर.
मधुने रोज ओव्हरटाईम करुन १५/१६ तास काम केले, तरी त्या कर्जाचे हफ्ते भरुन एक साधे मध्यमवर्गीय जीवन जगणे त्याच्या तुटपुंज्या पगारात त्यांना शक्य नव्हते. नविन घरात ते आले तेव्हा, त्यांचा मुलगा शशांक तेव्हा बारा वर्षाचा होता.
शशांकच्या जन्मापुर्वी रागिणी सरकारी इस्पितळात नर्सची नोकरी करत होती. मधे बारा वर्षाच्च मोठा कालावढी गेला होता, तरी तिचे शिक्षण व अनुभव याच्या जोरावर तिला एका नव्या खाजगी रुग्णातयात नोकरी मिळत होती.