/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

मराठी चावट कथा-सतीश

User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

शनिवारी संध्याकाळी नेहमीच्या जागी तिला यावंच लागणार होत. त्या आठवड्यामध्ये खूपच काही गोष्टी घडल्या होत्या ज्याचे तिला नीटपणे अवलोकन करायचे होते. तिला ते सगळे अनुभव आले जे बालपणतून तारुण्याकडे प्रवास करणाऱ्या एका मुलीच्या आयुष्यात फार क्वचित येतात.
"म्हणजे खरेच मी सुंदर आहे. शाळेतला असा मुलगा माझ्या मागे लागून मला प्रपोज करतो ज्याच्या साठी बाकी मुली पण तयार आहेत. पण मला का असे वाटत नाही कि माझे पण त्याच्यावर प्रेम आहे. परवा त्याने मला जवळ घेतले तेव्हा किती घाबरले होते मी. पण नंतर तेच सगळे किती आल्हाददायक वाटत होते. त्याच्या ओठांची उष्णता. तो कमरेवरती त्याच्या हाताचा स्पर्श. त्याचे खांदे किती रुंद आहेत. मला तर खरेच तिथून दूर व्हावे वाटत नव्हते. पण तरीही... प्रेम? ती भावना अजून इतकी काही तीव्र वाटत नाहीये मनामध्ये. तो जवळ असावा असे वाटते पण.. पण फक्त .. नाही नाही.. काय विचार करतीये मी. मी अजूनही त्याला नीटशी स्वीकारू शकली नाहीये. माझच काही चुकतंय का? म्हणजे मला समजत नाहीये कि हि गोष्ट कशी हाताळू. प्रथमेश छानच आहे प्रश्नच नाही. मला त्याच्याशी मिळतं जुळतं करून घ्यावं लागणार आहे. त्याच्या आणि माझ्या आवडी थोडीच सारख्या असतील? मग मी त्याच्या समजून घेतल्या आणि त्याने माझ्या समजून घेतल्या तर झाले. काही अवघड नाही. पण हे सर्व कुठपर्यंत?..." ह्याचे उत्तर काही तिला मिळाले नाही.
तिने त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे नाही असे ठरवले. कारण काही प्रश्न वेळ आली कि आपोआप सुटतात. आपण काही करायचे नसते असे तिला नेहमी वाटायचे. ती रिलॅक्स झाली. तो दरीतला घोंगावणारा वारा तिच्या मनातल्या भावनांना सहज करत होता. शरीराला भिडणाऱ्या सलील स्पर्शाने तिला प्रथमेशची पहिल्यांदाच प्रखर आठवण आली. हे पहिल्यांदाच घडले होते कि शारीरिक पातळीवर असणारे तिचे आकर्षण तिला त्याच्या आठवणींमध्ये बेभान करत होते. त्या भावनिक अवस्थेमध्ये ती घराकडे परतली.
****
सोमवारी मधल्या सुट्टीत प्रथमेश तिच्या वर्गात आला. त्याला पाहून ती लाजली. तो तिच्याकडे पहात होता. पण कोणाला कळू नये म्हणून त्याने नजर फिरवली. तिच्या जवळच्या बेंचवर बसणाऱ्या त्याच्या एका मित्राला त्याने सांगितले कि,
"शाळा सुटल्यावर तो मारुतीच्या मंदिराकडे जाणार आहे. तुला यायचं का? मागच्या विहिरीवर पोहायला."
"मला आज नाही जमणार रे. घरी काम आहे." असे तो मुलगा म्हणाला.
"ठीके." म्हणून तो पुन्हा एकदा स्वरालीकडे बघत बाहेर गेला. जाताना परत त्याने त्याला हाक मारली. "मी तर जाणार आहे. जमले तर ये."
नीलिमा स्वरालीला म्हणाली,"तुला बोलावतोय तो."
"कळले मला. एवढी बुद्धू समजू नकोस." स्वराली तिला खोट्या रागाने म्हणाली.
शाळा सुटल्यावर ती आणि नीलिमा शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या मारुती मंदिराजवळ गेल्या. कोणीतरी बोलल्याचे आवाज त्यांना ऐकू गेले.
"कशासाठी आलायस मग इथे?" कोणीतरी विचारात होतं.
"तुला काय करायचंय?" प्रथमेश म्हणत होता.
स्वराली मंदिराच्या मागच्या बाजूला आली तर तिथे प्रथमेश आणि विराज एकमेकांच्या जवळ जवळ नाकाला नाक लावून उभे होते. सगळ्यात मोठा धक्का तिला हा बसला कि तिथे तिचा मोठा चुलत भाऊ गजाननपण होता. तिने डोळे मोठे करत तोंडावर हात ठेवला. नीलिमा तर जाम घाबरली. तेवढ्यात त्या तिघांना दोघींच्या अस्तित्वाची चाहूल लागली.
"बघ रे गजा. तुला काय बोललॊ होतो मी. ती बघ स्वराली. ह्याला भेटायला आलीये.ह्यांचे खूप दिवस झाले चालू आहे."
"स्वराली! इकडे ये." गजानन ओरडला.
स्वराली घाबरी झाली होती. "आता काही खरे नाही. घरी कळणार."
" तिला तरी पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते कि प्रथमेश आपल्यापासून तुटू शकतो ह्या गोष्टीला आपण जास्त घाबरायला हवे तर आपण घरी कळेल म्हणून घाबरत आहोत. असले कसले प्रेम करत आहोत आपण."
"तू याला भेटायला आली होतीस?" गजाननने विचारले.
"..." स्वराली शांत होती.
आडदांड गजानन पुढे सरसावला. माझ्या बहिणीला नादाला लावतो. हरामखोर साल्या.. असे म्हणून त्याने प्रथमेशची कॉलर धरली आणि त्याच्या मुस्काटात मारली. नंतर एक, दोन , तीन, चार.. तो प्रथमेशला मारतच होता. स्वराली तोंड ओंजळीत लपवून रडत होती. भीतीने तिच्या पोटात गोळा आला होता.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

लाडकी ना तुमची. म्हणजे आता मी काही बोलायलाच नको. बरं नशीब म्हणायचं हिचं गजानन कडून आपल्याला समजलं. तो घरातला आहे म्हणून हि गोष्ट कुठं बाहेर समजणार नाही. तुमच्या सवलतीचा परिणाम बघा. थोरलीच कधी काही कानावर नाही आलं. पण हि अवदसा बघा कशी रंग उधळतीये एवढुश्या वयात." स्वरालीची आई बडबड करत होती.
स्वरालीचा चेहरा रडून रडून सुजला होता.
"समजवा तुम्हीच तुमच्या भाषेत. मी तर बाई हात जोडले ह्या कार्टीसमोर."
तिचे बाबा तिला घेऊन वरच्या खोलीत गेले. तिला खाटेवर बसवून तिच्या शेजारी बसले. स्वराली हुंदके देतच होती.
"स्वरा. तू का अशी वागलीस असे मी विचारणार नाही तुला. पण एका गोष्टीचे प्रामाणिक उत्तर मला दिले तरच मी तुला माफ करिन." तिचे बाबा तिला म्हणाले.
तिने रडवेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पहिले.
"मी तुझा बाप असल्यामुळे तुला बऱ्यापैकी ओळखतो. तुझी ताई आणि छोटी ह्या दोघीना पण. तू हुशार आहेस पण भावनिक पातळीवर फार कमी पडतेस. मला तुला असे विचारायचे होते बाळ कि खरेच तुला त्या मुलासोबत अशा काही नात्यामध्ये अडकायचे होते का? मनापासून खरं सांग."
"बाबा. मला नाही माहित मी काय करत होते. खरेच. पण त्याला मी नाही म्हणू शकले नाही. मी खरेच सांगतीये." एवढे बोलून ती परत रडायला लागली.
तिच्या डोक्यावर थोपटत तिचे बाबा तिला सांगू लागले.
"मला फक्त एवढेच हवे होते. बेटा जर एखादी गोष्ट आपल्याला नकोशी असेल तर कधी कधी लगेच त्या गोष्टीला नकार देणे हितकारक असते. आत्ता तुझ्या वयाचा जो पडाव आहे त्यात तू अशा चुका करणे स्वाभाविक आहे. मी म्हणत नाही कि प्रेम भावना ठेवणे चूक आहे. पण आत्ता तुझे जे कर्तव्य आहे ते तू प्रथम करणे गरजेचे आहे. तुझे शिक्षण, तुझ्या व्यक्तिमत्वाचा विकास तो आत्ता महत्वाचा. जी ती गोष्ट ज्या त्या वयातच शोभते. परत तू असे काही करणार नाहीस ह्याचा मला विश्वास वाटतो. तो विश्वास तू कायम तसाच ठेवशील."
"हो बाबा." असे म्हणून तिने तिच्या वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवले. तिच्या मनातले भीतीचे मळभ निवले होते.
खाली आल्यावर तिच्या बाबानी घरात सर्वांना बजावले कि ह्या गोष्टीचा उल्लेख इथून पुढे कोणीही करणार नाही. स्वरावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे ती परत अशी चूक करणार नाही.
स्वराने आईची पण माफी मागितली. आईने तिला जवळ घेत माफ केले. घरातले वातावरण परत हलके झाले.
****
शनिवारी नेहमीप्रमाणे स्वराली त्या ठिकाणी आली. कड्यापासून ४-५ पावलांवर येऊन थांबली. तिचे डोळे मिटले गेले. त्या भारल्या वातावरणात परत मनाचा संवाद सुरु झाला.
"बाबा आपल्याला किती जवळून ओळखतात. त्यांचे मन किती मोठे आहे. प्रथमेश सोबत आपला जो काही प्रकार घडला तो त्यांनी किती सहजपणे हाताळला. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. मी भले त्याला भेटायला गेले किंवा माझ्या कडून त्याच्यासोबत त्यादिवशी तो प्रकार पण घडला असेल. तरीही मला त्याच्याबद्दल प्रेम भावना काही तितकी तीव्र वाटत नव्हती हेच खरे. आणि मी तसेच तर बाबाना सांगितले. नशीब मला असे समजून घेणारे वडील आहेत. मी खूप भाग्यवान आहे. मी माझे वागणे त्यांना कधी ते दुखावले जातील अशा पद्धतीचे ठेवणार नाही."
स्वराली स्वतःशी बोलत होती. तिच्या मनावरचे प्रचंड मोठे ओझे उतरले होते. वाऱ्याचा झोत तिच्या केसांशी खेळत होता. तिला आता भान आले होते कि नुसतेच अल्लड राहून चालायचे नाही. अशा गोष्टी हाताळताना नीटपणे विचार करूनच हाताळाव्या लागतात. महत्वाचे म्हणजे आपल्या चुकीच्या वागण्याने आपल्या जवळच्या लोकांना त्रास होऊ शकतो. मन मोकळे झाले कि पिसासारखे हलके होते. ह्या आठवड्याच्या शेवटी मनावरचा ताण कमी होत तिच्या मानसिकतेमध्ये परत सकारात्मकता आली होती. स्वतःशी छानसे हसत तिने सायकल काढली आणि कड्याकडून परत घरी जायला निघाली.
-क्रमश:
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by rajsharma »

खूपच मस्त सॉलिड अपडेट
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

😂 😭 😆 स्टोरी वाचल्या बद्दल आपला आभारी आहे
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

स्वराली कॉलेजमध्ये होती तोवर ती अशीच राहिली. तिने मनाच्या गाभाऱ्यात कोणालाच स्थान दिले नाही. तिला तिच्या कॉलेजच्या त्या वर्षांमध्ये आणखी काही अनुभव आले पण तिने मनावर घेतले नाही. शिक्षण संपत आलेले असतानाच तिच्यासाठी काही नातेवाईकांकडून स्थळ सुचविण्याचे प्रकार सुरु झाले. त्यातून एक स्थळ सर्वानाच पसंत पडले. मोठ्या शहरात राहणारे व्यावसायिक लोक होते. घरंदाज कूटूंब. त्यांना एकत्र कूटूंबात वाढलेली गावाकडची सालस मूलगी हवी होती. स्वराली त्या पठडीत अगदी योग्य बसली. तिच्या मोठ्या बहिणीचे २ वर्षांपूर्वीच लग्न उरकलेले असल्यामुळे आता तिचाच नंबर होता. ती काही घरच्यांच्या शब्दाबाहेर नव्हती. आईच्या जीवाला मागे झालेल्या प्रकारामूळे आणि स्वरालीच्या सौंदर्यामूळे फार घोर लागला होता. तेव्हा तीनेसूध्दा फारच मनावर घेतले होते.
स्वरालीचे आयूष्यदेखील एकसूरी झाले होते. सतत नाविण्याची ओढ असलेल्या स्वरालीच्या मनाला आता बदल हवा होता. तिला नव्या नात्यामध्ये जाण्याची इच्छादेखील होती. कारण गावात काही मैत्रिणींचे लग्नानंतरच्या आयूष्यांचे किस्से तिला कळत होतेच. मनामध्ये हुरहूर होती. तिने आईवडिलांवर सर्व सोपवले आणि डोळे झाकून होकार दिला.
"लग्न.. कसे असेल नंतरचे माझे आयूष्य? आईबाबांनी ठरवलय. फोटो बघून मला पसंत केलीये त्यांनी. प्रत्यक्ष भेटीत आवडेन का मी त्यांना?.. आणि माझं काय? मला आवडतील का ते? कसे असतील? माझं मन राखणारे कि त्यांच मन लादणारे? माझं सर्वस्व मी ज्याला देईन ती व्यक्ती तितकिच तूल्यबळ असावी एवढेच मला वाटते. माझ्या बाबांनी पसंती दाखवली म्हणजे नक्कीच खास असणार. तो थोडातरी रसिक असावा. मला हसवणारा असावा. मस्तीखोर नसला तरी चालेल पण माझी मस्ती सहन करणारा असेल तर काय मजा येईल. आता अपेक्षा करून ऊपयोग काय? जे असेल ते आपले म्हणून स्विकारायचे." ती समाधानाने हसली.
बघण्याच्या कार्यक्रमात ती पहाल्यांदाच तिच्या होणार्‍या नवर्‍याला पहात होती. तीला अगदी साजेसा असा तो होता. तिच्या आणि त्याच्या वयामध्ये ६-७ वर्षांचे अंतर होते. तिला त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व अगदी संयमी, शांत आणि समजूतदार वाटले. बघण्याच्या कार्यक्रमात तिला त्याच्याशी जुजबी बोलता आले. दोघांनी परस्परांविषयी काही गोष्टी जाणून घेतल्या. वागणे बोलणे अगदी घरंदाज होते. सर्वात महत्वाचे तीला आवडले ते त्याचे डोळे. एकदम कॅट आईज. तीला त्याच्या व्यक्तीमत्वाची भूरळ पडल्यासारखे झाले.
लग्नाची तारीख ठरली. पण मुहूर्त आणि तिची B .A फायनलची परीक्षा जवळ जवळ आले होते. लग्नानंतर परीक्षा असणार होती. पुढील ४-५ महिने कसे गेले तेच तिला कळले नाही. लग्नाची खरेदी, मैत्रिणी आणि बहिणीसोबत त्यासाठी फिरणे. मजा, मस्ती नाचणे गाणे आणि थोडा अभ्यास. ह्यात ते दिवस अगदी फास्ट गेले. लग्नाचा दिवस उजाडला. स्वरालीच्या मनात धाकधूक वाढली होती. मधून मधून शरीरातली कंपने तिला जाणवत होती. काही दिवसात तिचे पूर्ण आयुष्य बदलणार होते. लग्न लागले आणि विशीतली कुमारी स्वराली उत्तम पाटील ची सौभाग्यकांक्षिणी स्वराली महेश देशमुख झाली.
लग्न लागून तिची पाठवणी झाली. सासरी आल्यावर सर्व पाहुण्यांच्या लग्नातील घडामोडींवर चर्चा सुरु होत्या. पण चर्चेमधला मूळ सूर होता तो म्हणजे देशमूखांना अतिशय सुंदर आणि सालस सून मिळाली हा. तिच्या सासरकडच्यांना सर्व पाहुणे अभिनंदनाच्या वर्षावात भिजवत होते. स्वराली लग्नात अगदी एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. सलज्ज असली तरी तिच्या चालीत मद भरला होता. तिची दुग्धवर्णीय शुभ्र काया. भरलेली उंच देहयष्टी. मोठे नितळ डोळे आणि जीवनी पसरून सुंदर हसण्याची अदा पाहणाऱ्याला मुग्ध करत होती. महेश तर स्वतःला अतिशय नशीबवान समजत होता कि त्याला असे रत्न गवसले होते. स्वराली कौतुकात न्हाऊन निघत होती. लग्नानंतर २ दिवसांनी सर्व सोपस्कार आटोपले होते. पण तिची BA ची फायनल परीक्षा २ दिवसांनी होती. तिला १५ दिवस संपण्यासाठी लागणार होते. ते महत्वाचे असल्यामुळे तिला काही सासरी थांबता आले नाही. ती २ दिवसांनी माहेरी आली. तसे तर तिचे अजिबात मन लागत नव्हते. महेशची देखील हीच अवस्था होती. पेपरचा अभ्यास करताना तिला सतत त्याची आठवण येत असे. दोघेही एकमेकांच्या सहवासासाठी तळमळत होते. कसे बसे ते परीक्षेचे दिवस उरकले आणि स्वराली परत सासरी जायला निघाली. तिच्या पाठवणीच्या वेळी घरातले जास्त कोणी रडले नव्हते. पण आता मात्र ती खरेच सासरी मोठ्या कालावधी साठी निघाली होती. तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते. स्वराली मात्र एवढी भावुक नव्हती. तिला वाईट वाटत होते. पण त्याहीपेक्षा तिला महेशची ओढ जास्त वाटत होती.

Return to “Marathi Stories”