"मग काय... सांगितले!... सांगायचे तर होतेच ना कधीतरी... अनायसे विषय निघाला होता तर सांगून टाकले..." ती हसून म्हणाली.
"मग काय म्हणाली तुझी मम्मी? तिची काय रिॲक्शन होती??" मी कुतुहलाने विचारले.
"काय असणार?... आधी तिला आश्चर्य वाटले... पण नंतर ती खूष झाली!... तुझ्याबद्दल कुतुहलाने विचारायला लागली..." दिपाली हसत म्हणाली.
"मग काय सांगितलेस तू? माझी खूप 'लाल' केली असशील ना?" मी उगाच माझ्या शर्टाची कॉलर टाईट करत विचारले.
"केली केली... चांगली स्तुती करत सांगितले तुझ्याबद्दल..." दिपालीने हसत म्हटले.
"मग? इंप्रेस झाली की नाही तुझी मम्मी??" मी अधीरपणे विचारले.
"झाली ना!... चांगली इंप्रेस झाली!... मग तुझे नाव-गाव विचारायला लागली..."
"मग?"
"मग मी सांगितले तुझे नाव... तर ती ना... तुझे नाव ऐकून थोडी हबकली!" दिपाली उत्साहाने सांगायला लागली...
"हबकली?... का?" मी कुतुहलाने विचारले.
"हबकली म्हणजे तुझे नाव ऐकून तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले... ती तुझ्याबद्दल खोदून खोदून विचारायला लागली... तुझे घर, तुझे गाव., तुझ्या वडीलांबद्दल... मी शेवटी तिला म्हटले 'मम्मी... मला त्याबद्दल इतकी माहीती नाही... आम्ही ३ वर्षे एकत्र काम करतोय आणि आमचे स्वभाव, आवडीनिवडी जुळतात तेव्हा आमच्यात प्रेम जुळले... ते सुद्धा हल्लीच... मी तिला म्हटले नाही की आपले गेले वर्ष दिड वर्ष अफेअर चालू आहे ते... मी म्हटले की दोन आठवड्यापुर्वी आम्ही आमचे प्रेम कबूल केले आहे... मी तुला सांगणारच होते आणि बरे झाला हा विषय निघाला ते... तिला म्हटले त्याच्याबद्दलची माहिती तोच भेटला की तुला सांगेल..." दिपालीने म्हटले.
"अच्छा!... म्हणून तिने मला चहा घ्यायला बोलावलेय का?" मी हसून विचारले.
"हो!... मी आधी म्हटले की पुढच्या आठवड्यात पप्पा आले की त्याला घेवून येते... तर म्हणाली 'नको नको!... त्याला आत्ताच घेवून ये... आधी मला त्याच्याशी बोलू दे... मला तो पसंत पडला की मग मी सवडीने पप्पांचा मूड पाहून त्यांना सांगेन आणि त्यांची परवानगी घेईल'... मला पण ते पटले आणि मी तिला म्हटले की 'ठिक आहे! एक दोन दिवसात त्याला घेवून येते'..." दिपाली म्हणाली.
"हंम्म्म... म्हणजे आता आमची 'वर-परिक्षा' होणार तर..." मी हसून म्हटले.
"ऑफकोर्स!... आणि तुला मम्मीला मस्त इंप्रेस करायचे आहे... तुझा सगळा चार्म दाखवून..." दिपालीनी उत्साहात म्हटले.
"आणि तिला मी पसंत नाही पडलो तर?... तिने नकार दिला तर?..." मी हळुच मिश्किलपणे हसत तिला विचारले.
"तसे होणारच नाही!... तिला तू नक्की पसंत पडणार... शेवटी तिला माहीत आहे की माझी चॉईस वाईट नसणार..." दिपाली अभिमानाने म्हणाली.
"तरी पण... समजा की तिने मला पसंत केले नाही आणि नकार दिला... तर तू काय करशील?" मी तरीही हसून विचारले.
"तर मी तिला निक्षून सांगेन की लग्न केले तर तुझ्याशीच... नाहीतर करणारच नाही!..." दिपाली ठामपणे म्हणाली.
"हाय हाय मेरी जान!... ये हुई ना बात!... इसको कहते है 'लैला मजनू' का प्यार!..." मी तिला मिठीत घेत म्हणालो.
"लैला मजनू नही!... त्यांचे प्रेम सफल झाले नव्हते... आपले 'डिडीएलजे' च्या 'राज-सीमरन' सारखे प्यार... एकदम सक्सेसफूल!" दिपाली मला बिलगत म्हणाली.
"येस्स!... एकदम सक्सेसफूल!... आय लव यु, डिअर!" मी तिला प्रेमाने म्हटले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेतले.
"आय लव यु टू, दिनेश!" तिनेही प्रेमाने म्हणत माझे चुंबन घेतले...
******