बस मध्ये भेटलेली कविता

User avatar
007
Platinum Member
Posts: 5355
Joined: Tue Oct 14, 2014 11:58 am

बस मध्ये भेटलेली कविता

Post by 007 »

बस मध्ये भेटलेली कविता

माझी नोकरी अशी आहे की मला कामानिमित्त पूर्ण महाराष्ट्राभर फिरावं लागतं. तशी कंपनीच मला जाण्यासाठी कॅब आणि राहण्यासाठी चांगल्या हॉटेल्सची व्यवस्था करते. एकंदरीत थोडं फिरावं लागत पण जॉब तसा निवांत आहे.

काही दिवसांपूर्वी असच कामानिमित्त संगमनेरला जावं लागणार होतं. क्लायंटला लवकरात लवकर भेटायला जाण्यासाठी कंपनीने मला तातडीने जायला सांगितलं आणि १० मिनिटात ऑफिसच्या दारात जाण्यासाठी कॅब आली. आम्ही (मी आणि ड्रायव्हर) पुण्याहून निघालो.

तसा मी नेहमीच चांगले प्रेसेंटशन देत असल्यामुळे मला तयारी करण्याची तशी आवश्यकता नाही पडत. थोडं भोसरीच्या जवळ कॅब आली आणि अचानक कॅबच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. ड्रायव्हर बोलला की प्रॉब्लेम मेजर दिसतोय तसं मी कपाळावर हात मारून घेतला कारण मला तातडीने जायचं नसलं तरी त्याच दिवशी जाणं महत्वाचं होतं.

ऑफिसमध्ये फोन करून दुसरी कॅब अरेंज होईपर्यंत वेळ लागला असता म्हणून मी थोडा विचार केला आणि जवळच असणाऱ्या भोसरी बस स्टॉपवर येऊन उभा राहिलो. बस किंवा प्रायव्हेट गाडया, कॅब जे काही आधी भेटेल त्याने निघाव अस ठरवून मी वाट पाहू लागलो.

पाचच मिनिटात नाशिक बस आली. ‘चला जाण्याची सोय झाली,’ म्हणून मी इतर ६-७ प्रवाश्यांच्यामागून बसमध्ये चढलो. आत मध्ये गेल्यावर समजलं की बसायला जागा नाहीये. मग मी माझी बॅग काढुन रॅकमध्ये ठेवली आणि एका सीटला टेकून उभा राहिलो.

तिकीट काढून कंडक्टर त्यांच्या जागेवर जाऊन बसलेले, थोडं अंतर गेल्यावर सहज पूर्ण बसमध्ये नजर फिरवली. कुठे जागा होऊ शकते का याची चाचपणी करत होतो. तेवढ्यात नजर खिळावी तशी माझी एका ठिकाणी नजर खिळून राहिली.

साधारण शेवटून तिसऱ्या सीटवर एक लेडी बसली होती. २५-२६ वय असावं, खिडकीमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस भुरभुर उडत होते. सावळी, नाकी-डोळी नीटस पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि चेहऱ्यावर हसू होतं.

अचानक तिने माझ्याकडे पाहिलं, आमची नजरानजर झाली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. थोडस घाबरल्या सारखं झालं कारण कितीही काही झालं तरी ती अनोळखी होती.

मग मी इकडेतिकडे पाहण्याचं नाटक केलं जणू मी त्या गावचा नाहीच आनि तेवढ्यात चाकण आलं म्हणून कंडक्टरने बेल दिली. जागा होईल या आशेने मी पुन्हा इकडे-तिकडे पाहिलं पण काही चान्सेस दिसेना.

पुन्हा एकदा नजरानजर झाली आणि मग मी पुन्हा थोडीशी मरगळ झटकून उभच राहावं लागणार अशी मनाची समजूत घालून मन मारून उभाच राहिलो. आता मात्र माझ्या मनात सारख ती बसलीय त्या बाजूलाच बघू वाटत होतं.

मी मुद्दाम खिडकीतून बाहेर बघायच्या बहाण्याने तिच्याकडे पाहिलं पण तीच लक्ष पुन्हा बाहेरच्या बाजूला होतं. पण मगाशी वाऱ्याने भुरभुरणारी बट तिने आता कानामागे टाकली होती.

पुन्हा मी तिला मन भरून पाहू लागलो आणि पुन्हा तिने अचानक माझ्याकडे पाहिलं. यावेळी मात्र मी रंगेहाथ पकडले गेलो होतो. माझ्याकडे इकडे-तिकडे पाहण्याचा बहाणासुद्धा नव्हता. मी तसाच पाहत राहिलो आणि एक हलकेच स्माईल केलं. तिने एकदम रागात असल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि आपली पंजाबी ड्रेसची ओढणी व्यवस्थित केली.

माझ्या मनात विचार येऊन गेला की तिला जाऊन सांगावं लगेच की, ‘अहो! एव्हढीपण खराब नजर नाही ओ माझी…’ पण बहुधा माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव समजून तिने घेतले असतील अशी मनाची समजूत घालून मी दुसरीकडे नजर फिरवली.

आता मी खेडच्या जवळपास आलेलो. तेवढ्या वेळात आमची अजून २-३ वेळा नजरानजर झाली पण ह्यावेळी मी स्माईल वगैरे देण्याच्या भानगडीत नाही पडलो.

बेल वाजली आणि लोकांची उतरण्याची लगबग झाली. निदान आतातरी जागा मिळेल म्हणून मी पुन्हा एकदा चौफेर नजर फिरवली आणि मला काही मोकळ्या जागा दिसल्या. मी पटकन बॅग घेऊन बसायला जाईपर्यंत त्या जागांवर बाकी माझ्यासोबत उभे असलेले सहप्रवासी बसले फक्त योगायोग म्हणा हवं तर त्या लेडीशेजारी जागा होती.

तिला कळलं होतं की मी जागा पाहतोय बसण्यासाठी…. पण मगाशी घडलेल्या प्रसंगामुळे माझं मन तिथे जाऊन बसण्यासाठी कचरत होतं. पण अहो आश्चर्यम! तिनेच मला नजरेने, ‘ये बस इथे,’ अस खुणावले. मला तर विश्वासच बसेना मी पटकन जाऊन शेजारी बसलो आणि “थँक्स,” बोललो.

जरावेळ असाच गेला माझ्या मनात धडधड का होतीये हे मात्र मला कळत नव्हतं. ‘चला आपणच पुढाकार घेऊ,’ असा मनात विचार केला आणि “हाय, मी संकेत,” अशी स्वतःची ओळख करून दिली. तशी तिने एक गोड स्माईल देत उत्तर दिलं, “हॅलो. मी अदिती,” हे ऐकून मी नेहमीची एक टिपिकल कमेंट दिली की, “खूपच छान आहे नाव तुमचं..” तशी ती चटकन बोलली की, “त्यात काय छान…. मला तर अजिबात नाही आवडत माझं नाव..” आणि हसून माझ्याकडं पाहिलं.

मला माझ्याच झालेल्या फजितीवर हसू येईना पण कसनुस हसून मी तिच्या जोकला दाद दिली. आता पुढे काय बोलावे म्हणून सुचेना तशी तीच बोलली, “काय करता तुम्ही?” तस मी सांगितलं की, “मी तसा तर इंजिनिअर आहे पण नंतर एमबीए केलं आणि एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग हेड आहे आणि एका मिटिंगकरता संगमनेरला चाललोय.”

मला वाटत होतं की ती माझं इन्ट्रोडक्शन ऐकून माझ्यावर फ्लॅट होईल पण ती जोरात हसली आणि बोलली, “काय रे तुम्ही सगळे इंजिनिअर असेच का रे? आधी इंजिनीअरिंग करायची आणि नंतर एमबीए नाहीतर एखादा भलताच कोर्स आणि ते पण करून जॉब नाही लागलाच तर आहे मग एमपीएससी….”
कांटा....शीतल का समर्पण....खूनी सुन्दरी

(¨`·.·´¨) Always

`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &

(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !

`·.¸.·´
-- 007

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
User avatar
007
Platinum Member
Posts: 5355
Joined: Tue Oct 14, 2014 11:58 am

Re: बस मध्ये भेटलेली कविता

Post by 007 »

तीच हे उत्तर ऐकून तर मला अस वाटत होतं बेल देऊन गाडी थांबवावी आणि सरळ उतरून काशिला निघून जावं. माझा उतरलेला चेहरा पाहून तिला कळलं की मी हिरमुसलोय, तशी ती बोलली, “अहो. गम्मत केली हो,” आणि पुन्हा गोड हसली तीच ते हसन पाहून मला तर भारी वाटलंच पण त्याहीपेक्षा तीच ते लडीवाळपणे, “अहो” म्हटलेलं खूप आवडलं आणि आदितीपण.

मी पुन्हा एकदा (बहुतेक सत्तराव्यांदा… नाही नाही…. बहुतेक एकशे सत्तराव्यांदा….) प्रेमात पडलोय ह्याची मला जाणीव झाली. “चला मंचर आलं…” कंडक्टरने बेल देऊन घोगऱ्या आवाजात अनाऊन्स केलं आणि पुन्हा लोकांची चढायची-उतरायची लगबग चालू झाली.

मी थोडा घसा खाकरला आणि अदितीला विचारलं, “तुम्ही काय करता?” तस ती बोलली की, “मी एक टीचर आहे आणि इकडे आळेफाटा म्हणून गाव आहे तिकडे शिकवते. आत्ता माझ्या एमफीलच्या निमित्ताने पुणे विद्यापीठात गेले होते.”

हे ऐकून मला तीच खूप कौतुक वाटलं तिची शिकण्याची आवड पाहून मला तिच्याबद्दल अभिमान वाटला आणि “वा…. खूपच छान… आय मस्त एप्रिशिएट युअर टॅलेंट….. ब्युटी विथ ब्रेन हा….” अशी कॉम्प्लिमेंट देऊन मी तीच कौतुकही केलं आणि थोडस फ्लर्टसुद्धा.

पण नंतर जेव्हा आठवलं की आता आपण नारायणगावजवळ आलोय आणि अदिती आळेफाट्याला उतरणार ही जाणीव झाली तस मी घाईत पावलं उचलून बोलायचं ठरवलं. पण आता काय बोलायचं म्हणून मी विचसर करत होतो तशी माझ्या कानावर नको ती आरोळी पडली,”चला नारायणगाववाले उतरा लवकर..” आणि माझ्या पोटात खड्डाच पडला.

मला बोलायचं तर खूप होत तिच्याशी पण सुचेना काय बोलावं ते, मी विचार करत असतानाच तिने विषय काढला की, “किती छान वाटत नई… अस पावसाळ्यात वातावरण खूपच छान असत. मस्त गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा घेऊ वाटतो आणि एक छानशी कविता…” आणि ती बोलायची थांबली मी एकदम चमकून पाहिलं, “तुम्हीसुद्धा कविता करता. मलापण आवडत खूप…. सिरियसली..”

चला ३६ पैकी हा गुण तर जुळला म्हणून माझ्या मनात लाडू फुटला. अहो का म्हणून काय? यंदा कर्तव्य आहे. मग थोडी कविता आणि लेखकांच्याबद्दल गप्पा झाल्या पण आता मनाला हुरहूर लागली होती आळेफाटा कधीपण येणार होता.

काही करून तीच पूर्ण नाव मला माहिती करून घ्यायचं होत. निदान एफबी वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट तरी पाठवू म्हणून पण कस विचारायचं हा प्रश्न होता. इकडं-तिकडच्या गप्पा मारून झालेल्या आणि ती काय बोलते ह्याकडे आता माझा लक्ष नव्हतं. माझ्या मनात काहूर माजलं होतं. मला तिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहायचं होतं. पण माझी हिम्मत शेवटपर्यंत झाली नाही.

शेवटी आळेफाटा ५ मिनिटांच्या अंतरावर राहील होतं आणि मला एक भन्नाट आयडिया सुचली. मी एक बनाव रचला आणि आणि माझा कुटील डाव मांडायला सुरवात केली.

“ऐका ना अदिती माझं एक काम होतं.”

“बोला ना.”

“ते ना मला काही कॉल्स करायचे आहेत. पण अचानक माझा फोनमधला बॅलन्स सम्पलाय..”

“अच्छा. अस आहे होय.”

“तर माझं काम होतं.”

“हा बोला ना?”

“मी एक काम करतो तुम्हाला पैसे आणि माझा फोन नंबर देतो. प्लिज फक्त तुम्ही आता उतरणारच आहेत तर फक्त माझं तेवढं रिचार्ज कराल का?”

“हो चालेल ना… काही हरकत नाही.”

“एकच मिनिट हा..”

थोडस उचंबळूनच मी माझा नंबर देण्यासाठी छोटा कागद काढला आणि खिशातल्या पेनाने नंबर लिहिला आणि दोनशे रुपयेही दिले. मला आकाश जणू दोन च बोटांवर राहील होतं.

“चला आता माझा स्टॉप आला. करते हा मी रिचार्ज. अच्छा बाय… हॅपी जर्णी…”

“थँक्स… रिचार्ज करा हा नक्की… मला सांगा… भेटूया पुन्हा…”

त्यानंतर गाडी निघाली. मी मनातून थोडा खट्टू झालो होतो कारण आता ती सोबत नव्हती प्रवासात. “पण चला आपण खूप मोठा तीर मारलाय आज,” अस म्हणून स्वतःचीच पाठ थोपटण्याची इच्छा झाली.

साधारण २०-२२ मिनिटं झाली पण मला रीचार्जचा मेसेज काही आला नाही. मला काळजी वाटू लागली. विषय दोनशे रुपयांचा नव्हताच. विषय नंबरचा होता आणि अचानक फोनची मेसेज ट्यून वाजली. तेव्हाच माझ्या मनाचीदेखील घंटी वाजली आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजली.

एक अननोन नंबर माझ्या फोन स्क्रिनवर झळकत होता. माझ्या हृदयाच्या धडधडीचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता एवढं जोरात ते आता धडधडू लागलं होतं. माझे हात थरथर कापत होते. मी फोन उचलला आणि कानात सगळा जीव साठवून कानाला लावला.

“हॅलो,” आधी मी हॅलो बोललो. तेवढ्यात तिकडून एका पुरुषाचा आवाज आला. माझं हृदयच बंद पडलं होतं आता. तिकडून आवाज आला, “हॅलो. कोण संकेत का?” मी उसनं अवसान आणून बोललो, “हो. आपण कोण?” तसा पलीकडून उत्तर आलं. “नमस्कार. मी प्रमोद. अदितीचा होणारा नवरा. आलं का रिचार्ज?” हे उत्तर ऐकून मी फोन कट केला आणि मगाशी काशीला जाण्याचा आलेला विचार आता पक्का करायचा ठरवलं.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कांटा....शीतल का समर्पण....खूनी सुन्दरी

(¨`·.·´¨) Always

`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &

(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !

`·.¸.·´
-- 007

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>