डॉलर बहू
बेंगळूरहून मिरजेकडे जाणाऱ्या कित्तूर-चन्नम्मा एक्सप्रेसची चंद्रू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता.
त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता.
चंद्रूचा धाकटा भाऊ गिरीशही त्याच्याबरोबर होता. पण `आलोच एका मिनिटात दोन पेपर घेऊन!-’ असं सांगून तो जो निघून गेला होता, तो अर्धा तास होऊन गेला तरी आला नव्हता. चंद्रू मनातल्या मनात चडफडत पुन्हा-पुन्हा घड्याळ पाहत होता.
रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा चंद्रूच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात कातरता भरली होती. वाटत होतं, आजवर न पाहिलेलं गाव - धारवाड! कसं आहे कोण जाणे!
आयुष्यात प्रथमच आपलं लाडकं आणि चिरपरिचित माहेर सोडून अपरिचित पतीमागून आनंदानं, तरीही कातर मनानं जाणाऱ्या नव-विवाहितेसारखी चंद्रूची मन:स्थिती झाली होती.
बेंगळूर, मंड्य, मैसूर, शिवमोगा ह्या प्रदेशापलीकडे चंद्रू आजवर कधीही गेला नव्हता. आता शिक्षण संपल्यावर पहिल्या-वहिल्या नोकरीच्या निमित्तानं तो धारवाडला निघाला होता.
धारवाडमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. आज-काल नोकरी मिळणंच कठीण असल्यामुळे हाताला लागलेली पहिली नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. गावाचा मोह मोठा, की पैशाचा मोह मोठा ? राष्ट्रीय बँकेत टेक्निकल ऑफिसरच्या हुद्द्यावर काम करायचं म्हणजे चांगलीच नोकरी म्हणायची! त्यामुळे निरुपायानं तो धारवाडला जायला तयार झाला होता.
कुठूनतरी अचानक समोर आलेला गिरीश म्हणाला, `गाडी आली चंद्रू. चल, सामान दे.’
चंद्रू विचाराच्या तंद्रीतून भानावर आला. या गिरीशचा स्वभावच असा! क्षणभरही निवांत म्हणून राहणार नाही हा! सतत काही ना काही धावपळ चालूच असते याची!-
चंद्रू आपल्या जागेवर बसला. गाडी सुटताच त्यानं प्लॅटफॉर्मवरच्या गिरीशला हात हलवून निरोप दिला. गाडीनं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला आणि ती धावू लागली. बघता-बघता गिरीशचा हलणारा हात नजरेआड झाला.
गाडीनं वेग घेताच चंद्रूनं आत नजर टाकली. शेजारपाजारचे प्रवासीही काही वेळ आपापलं सामान नीट लावण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात गढून गेले.
`यंदा पाऊस काय करतोय कोण जाणे!’
`गेल्या वर्षी बरा झाला पाऊस! यम्मी केरि- म्हशींचं तळं पूर्ण भरून गेलं होतं.’
`त्याच्या मागच्या वर्षी- सांगतो मी- घटप्रभेचा धबधबा अस्सा भरून वाहत होता म्हणून सांगू! मस्त दिसत होता!’
चंद्रू ऐकत होता. मनातल्या मनात तो गडबडला होता. भोवतालची माणसं त्याच्या मातृभाषेतच- म्हणजे कन्नडमध्येच- बोलत होती. पण त्याला त्यातले कितीतरी शब्दांचे अर्थच समजत नव्हते! एखादी परक्या प्रांतातली भाषा ऐकावी तसं वाटून तो कावरा-बावरा झाला होता.
तपकिरी रंगाचा कोट आणि काळी टोपी घातलेले एक प्रौढ गृहस्थ तळहातावर तंबाखू अंगठ्यानं मळता-मळता शेजारी बसलेल्या पागोटेवाल्या गृहस्थांना बजावून सांगत होते, `तू काहीही म्हण- पण मला तर हुक्केरी बाळप्पाची गाणीच आवडतात.’
यावर ते पागोटं आणि धोतरवाले गृहस्थ जोरात सांगत होते, `असेल! पण मला मात्र बाले खाँ साहेबांची सतार फार आवडते.’
मुकाट्यानं बसलेल्या चंद्रूलाही बोलण्यात ओढत त्यांनी विचारलं, `कुठल्या गावाला निघालाय?’
`धारवाडला.’
`असं होय! धारवाडला कुणाच्या घरी?’
अरेच्चा! हा काय प्रकार आहे? साऱ्या धारवाडमधल्या प्रत्येक घराची ओळख असल्यासारखं विचारताहेत हे!
`कुठल्याच घरी नाही.’
`मग? नोकरीसाठी निघालाय वाटतं!’
`होय.’ चंद्रूनं निरुत्साहानं सांगितलं. पुढचं संभाषण टाळण्याचा हेतू त्यात स्पष्ट होता.
धारवाडमध्ये त्याचा दूरचा नातेवाईक कृष्णमूर्ती राहत होता. कृष्णमूर्ती, म्हणजे किटीच्या घरची माणसं मूळची बेंगळूरची असली तरी, गेली कितीतरी वर्षं धारवाडला राहत होती. किटीच्या वडिलांनी तर तिथं स्वत:चं घरच बांधलं होतं.
किटीलाही धारवाडमध्येच नोकरी लागली होती. तो आणि चंद्रू साधारण बरोबरीच्या वयाचेच होते. आता किटीची कन्नड भाषाही बेंगळूरी ढंग सोडून धारवाडी ढंगाची झाली होती.
चंद्रूला घेऊन जाण्यासाठी आपण स्टेशनवर येत असल्याचं किटीनं कळवलं होतं. त्याच्या घरी जास्तीतजास्त आठवडाभर राहता येईल. वेगळी खोली किंवा घर बघण्यासाठी त्यानं किटीलाही सांगून ठेवलं होतं. किटीनं घर पाहून ठेवलंय की नाही, देव जाणे!
गाडी तुमकूरला थांबली. काळ्या टोपीवाल्या गृहस्थांनी चंद्रूला विचारलं, `आमच्याबरोबर जेवताय काय ? चपात्या आहेत.’
चंद्रू चकित झाला. अपरिचित तरुणाला आपल्याबरोबर जेवायला बोलवण्याइतकं औदार्य किती माणसांत पाहायला मिळतं? नकळत त्याच्या आवाजात सौम्यपणा आला,
`नको-नको! थँक्स! मी जेवण करूनच घराबाहेर पडलो.’
सहप्रवाशांनी आपापले जेवणाचे डबे उघडले. चंद्रू बाहेरच्या मैदानावर नजर खिळवून उद्याचा विचार करण्यात गढून गेला.
सुरेख, सुमधुर स्वर! कुणीही मोहून जावं असे स्वर!
चकित झालेल्या चंद्रूच्या मनाला ग्रासून टाकणारे सारे विचार क्षणार्धात नाहीसे झाले आणि त्याचं मन त्या स्वरांवर एकाग्र झालं.
पार्टिशनच्या पलीकडून गाणं ऐकू येत होतं-
`वसंत बनी ती गाते कोकिळ
राजमुद्रेची तिला न आशा-’
कोकिळाकंठी कुणी गायिका पलीकडे अति-सुरेल स्वरात आत्ममग्न होऊन गात होती. कुठल्याही वाद्याची साथ नाही-साधं सरळ भावपूर्ण गाणं!
अगदी हलक्या आवाजात गाणं सुरू झालं. बघता-बघता डब्यातले इतर सारे आवाज थांबले. केवळ गाण्याचा आवाज चढत राहिला आणि काही क्षणातच त्यानं संपूर्ण डबा भारून टाकला. सारेच माना डोलावत तल्लीन होऊन गाणं ऐकत होते.
चंद्रू त्या गंधर्व-लोकातल्या गंधर्व-गायनात पूर्णपणे बुडून गेला होता. मागं राहिलेल्या बेंगळूरचं आणि पुढं येणाऱ्या धारवाडचं भानही काही क्षण त्याला राहिलं नाही.
गाणं संपलं. पाठोपाठ हसण्याचा किलकिलाट कानांवर आला तेव्हा चंद्रू भानावर आला. तो तरुणींचा आवाज ऐकताना त्याला आपण कित्तूर-एक्सप्रेसमध्ये असल्याची जाणीव झाली.
पाठोपाठ मागणी झाली, `वन्स मोअर! वन्स मोअर, विनू.’
अच्छा ! या अभिनव लता मंगेशकरचं नाव `विनू’ आहे तर! पण विनू म्हणजे काय? वनिता? वंदना? त्या सुरेल स्वराच्या मालकिणीला पाहण्याची इच्छा चंद्रूच्या मनात प्रबल झाली.
पार्टिशनमागून धारवाडी कन्नड भाषेत तोच स्वर पुन्हा ऐकू आला, `नको गं बाई! पुरे आता माझं गाणं! साडेदहा वाजून गेले आहेत. लवकर झोपलं नाही तर धारवाडऐवजी पुढं लोंढ्याला उतरायची पाळी येईल!’ त्या विनूनं आणखी गाणी म्हणायचा प्रस्ताव धुडकावून टाकला.
चंद्रूला त्या बोलण्यामुळे बरं वाटलं. म्हणजे ही विनू आणि तिच्या मैत्रिणीही धारवाडला उतरणार आहेत तर! चंद्रूचा उत्साह द्विगुणित झाला.
`विनू, तुलाच गान-गंधर्व पुरस्कार मिळायला हवा बघ! कालच्या स्पर्धेत तुझाच पहिला नंबर येणार याविषयी आमच्या मनात तरी तिळभरही शंका नव्हती!’
म्हणजे या सगळ्या बेंगळूरला कुठल्याशा गायनाच्या स्पर्धेसाठी आल्या होत्या तर! तिथं या विनूला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं तर त्यात काहीही आश्चर्य नाही- चंद्रूच्या अंतर्मनानं न पाहिलेल्या विनूच्या वतीनं निर्वाळा दिला.
`खरंच गं! काल तू `तुंगा-तीर विहारी’ गात होतीस तेव्हा जज्जांसह सगळेच कसे माना डोलावत होते!’
`ते सगळं ठीक आहे! पण आता गाणं बंद! उद्या दुपारी लेडीज-रुममध्ये हवं तर म्हणेन. समजलं?’
बहुधा मैत्रिणींना एवढं बजावत विनू उठून उभी राहिली असावी. काचेच्या बांगड्यांचे आवाज ऐकू आले. चंद्रूच्या ज्ञानात आणखी भर पडली- या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली दिसताहेत.
`एक्सक्यूज मी! मिस्टर- उठता ना?’ तोच आवाज. चंद्रूनं मान वर करून पाहिलं.
गोरापान वर्ण, मोठाले काळेभोर डोळे, सरळ टोकदार नाक, दाट काळेभोर केस- अपरिचित तरुणाबरोबर बोलत असल्यामुळे चेहऱ्यावर उमटलेले मिश्र भाव- एका हातात बेडशिट आणि उशी, दुसऱ्या हातात तिकीट.
`माझी सीट आहे ही.’
चंद्रूचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तिच्याकडेच भान हरपून पाहत राहिला होता. धारवाडी काठा-पदराची साधी सुती साडी आणि लाल काचेच्या बांगड्या घातलेल्या निराभरण सुंदर युवतीनं त्याची ही गत केली होती!
`हा माझा बर्थ आहे.’ तिनं पुन्हा सांगितलं तेव्हा चंद्रू भानावर आला.
तिच्या बोलण्याचा अर्थ समजताच तो उत्तरला, `नाही. हा माझा बर्थ आहे- जी अठ्ठावीस!’
`नाही- हा पाहा- जी अठ्ठावीस-’ तिनं तिकीट दाखवत म्हटलं. त्याच कोकिळकंठी सुंदरीच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द त्याला पुन्हा गुंगवून गेले.
सुरेल स्वराची धनीण सुंदरही असली पाहिजे, असं काही नसतं. पण विनूचं सौंदर्यही स्वरांइतकंच अनुपम होतं.
दोघांनाही एकच बर्थ दिल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. ज्यानं ही चूक केली तो क्लार्क आता बेंगळूरात आपल्या घरी पांघरुण ओढून गाढ झोपला असेल! पण आता काय करायचं?
चंद्रू उठला आणि टी. सी. ला शोधायला गेला. विनू जी अठ्ठावीस बर्थवर मट्कन बसली.
चंद्रूबरोबर आलेल्या टी. सी.नं स्थितप्रज्ञ वृत्तीनं दोघांच्याही तिकिटांवर नजर टाकली आणि ही एक नेहमीचीच सर्वसामान्य घटना असल्याप्रमाणे म्हणाला, `विनिता - एफ - एकोणीस- जी अठ्ठावीस- आणि चंद्रशेखर - एम - चोवीस- जी अठ्ठावीस- दोघांनाही एकच नंबर दिलाय खरा! तूर्त काहीतरी अॅडजेस्ट करून घ्या. पुढच्या स्टेशनवर बघूया काय करता येईल ते!’
अशा प्रकारे काहीही निश्चित न सांगता, आडव्या भिंतीवर दिवा ठेवल्यागत बोलून तो निघून गेला. चंद्रूपुढे प्रश्न उभा राहिला- या देखण्या विनूबरोबर कसं `अॅडजेस्ट’ करायचं?
निरुपायानं चंद्रू म्हणाला, `तुम्ही बर्थवर झोपा. आत्ता तरी मी होल्डॉल खोलून खालीच झोपतो.’
विनिताही संकोचून म्हणाली, `माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास.’
Romance डॉलर बहू
-
- Pro Member
- Posts: 3161
- Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm
Romance डॉलर बहू
मेरी नशीली चितवन Running.....मेरी कामुकता का सफ़र Running.....गहरी साजिश Running.....काली घटा/ गुलशन नन्दा ..... तब से अब तक और आगे .....Chudasi (चुदासी ) ....पनौती (थ्रिलर) .....आशा (सामाजिक उपन्यास)complete .....लज़्ज़त का एहसास (मिसेस नादिरा ) चुदने को बेताब पड़ोसन .....आशा...(एक ड्रीमलेडी ).....Tu Hi Tu
-
- Pro Member
- Posts: 3161
- Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm
Re: Romance डॉलर बहू
`छे :! यात तुमचा काय दोष?’
पुढं काही न बोलता विनिता पलीकडे वळून झोपली. चंद्रूही होल्डॉल खोलून आडवा झाला. न राहवून त्याची तिच्याकडे नजर गेली. विनिताची जाड आणि लांबसडक नागवेणीही विसावलेली त्याला दिसली.
डोळे मिटले तरी गाण्याचे ते स्वर चंद्रूच्या कानात रुणझुणत होते. गाडी मंद लयीत हेलकावत होती. त्याच तंद्रीत चंद्रूला गाढ झोप लागली.
घाईघाईनं एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात कसाबसा गुंडाळलेला होल्डॉल घेऊन लुंगी नेसून स्टेशनवर उतरलेल्या चंद्रूला कुणाच्यातरी हास्याचा गडगडाट ऐकू आला.
हौशी आणि छान-छोकीनं राहणाऱ्या चंद्रूच्या दृष्टीनं हे अगदीच अपमानास्पद होतं.
स्टेशनवर येणाऱ्या किटीला कसं टेचात सामोरं जायचं याविषयी त्यानं बरंच काही ठरवलं होतं. इस्त्रीचे रुबाबदार कपडे- त्यावर सेंटचा घमघमाट- ऑफिसरच्याच थाटात स्टेशनवर उतरायचा घाट चंद्रूनं घातला होता. पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच!
रेल्वे अलिप्तपणे पुढच्या प्रवासासाठी धावू लागली. चंद्रूनं धारवाड स्टेशनावरून नजर फिरवली.
छोटंसं स्टेशन. बेंगळूरमधल्या मल्लेश्वरम स्टेशनसारखं. स्वच्छ स्टेशन. मोजकीच माणसं इथं-तिथं वावरत होती. रेल्वे निघून गेल्यावर स्टेशन आणखी शांत वाटू लागलं.
चंद्रूनं अपेक्षेनं भोवताली पाहिलं, पण ती कोकिळकंठी रूपसुंदरी कुठंही दिसली नाही. ती आणि तिच्या मैत्रिणी केव्हा निघून गेल्या होत्या कोण जाणे!
हातातलं सामान ठेवून लुंगी सावरत चंद्रूनं पाहिलं- समोरच किटी उभा होता.
त्यानंच खदाखदा हसत विचारलं, `हे काय रे चंद्रू? तू रेल्वेनं आलास की पायी चालत?’ पाठोपाठ त्यानं जुन्या सलगीनं पाठीवर थाप मारली. त्या सलगीच्या थापेसरशी चंद्रूची पाठ वाकलीच!
`सॉरी किटी! काय सांगू तुला- भयंकर झोप आली होती. टी. सी. नं `धारवाड आलं तुमचं! उठा -’ म्हणून जागं केलं तेव्हाच जागा झालो!’
`टी. सी. नं उठवलं नसतं तर तू बेळगावला किंवा मिरजेलाच गेला असतास सरळ!’- म्हणत किटीनं चंद्रूच्या सामानाला हात घातला.
`पाच मिनिटं थांब, किटी! मी अशा अवतारात येणार नाही. आता कपडे बदलून येतो-’ म्हणत चंद्रू वेटिंग रुमच्या दिशेनं गेला.
तो कपडे बदलून आला, तोवर सिटीबस निघून गेली होती. रिक्षावाल्याबरोबर किटी वाटाघाटी करत होता.
लुकड्या घोड्याचा टांगा बघून चंद्रू म्हणाला, `किटी, तुमच्या गावातल्या रथातून जायचं काय?’
दोघंही टांग्यात चढले. आळस झटकून नुकतंच जागं झालेलं धारवाड शहर मंद हसत होतं. टांग्यातून जाताना चंद्रू आश्चर्यानं त्याचं निरीक्षण करत होता.
उंच चढाच्या रस्त्यावर घोडं धापा टाकू लागलं. हे चंद्रूला पाहावेना. तो म्हणाला, `बाबा रे! मला स्वर्गाची काही कल्पना नाही! पण या घोड्याच्या नरक-यातना मला बघवत नाहीत.’
तो टांग्यातून खाली उतरला. पुन्हा उतार लागताच टांग्यात चढला. किटी मात्र याकडे नेहमीचीच गोष्ट असल्याप्रमाणे हसत बघत होता.
टांग्याचा आवाज ऐकून शांतम्मा बाहेर आल्या.
`ये चंद्रू, ये! बरा आहेस ना? कसा झाला प्रवास?’
`छान झाला.’ चंद्रू म्हणाला. सुरेल स्वरांची सोबत असल्यावर प्रवास उत्तम होणारच ना!
`चंद्रू, आज मी रजाच काढलीय! तुला धारवाड गाव दाखवतो.’ इडली खात किटीनं सांगितलं.
`ते राहू दे. आधी आपण घर बघूया.’
`अरे, असा काय करतोयस? इथंच आमच्या घरी का राहात नाहीस?’
`हा काही एक-दोन दिवसांचा प्रश्न नाही, किटी! इथं नोकरीसाठी मी जितके दिवस थांबेन, तितके दिवस मला खोली हवीच ना!’
`का रे? इथं येऊन कामावर हजर होण्याआधीच इथून जाण्याचा सूर काढतोयस!’
`तसं नव्हे रे! नाही म्हटलं तरी हे काही आपलं गाव- आपला प्रदेश नाही. इथं आपले कुणी मित्र नाहीत की कुणी नातेवाईक नाहीत. पहिलीच नोकरी सोडायची नाही म्हणून मी एवढ्या लांब आलोय. तिथंही दोन इंटरव्ह्यू देऊन आलोय. बेंगळूरमध्येच एखादी नोकरी मिळाली, पगार थोडा कमी असला तरी चालेल- पण मी लगोलग निघून जाईन हे मात्र नक्की!’
`बरं, तुझा आग्रहच असेल तर बघू या. चार जणांना सांगून ठेवू या. इथं लवकर घरं मिळतात. तुझ्या छोट्या ब्रह्मचाऱ्याच्या संसाराला एखादी छोटी खोलीही पुरेशी आहे.’ किटी म्हणाला.
एका दिवसात सारं धारवाड पाहून झालं. धारवाड विद्यापीठाचा परिसर, सोमेश्वराचं देऊळ आणि कित्तूर चन्नम्मा पार्कही पाहून संपलं.
`चंद्रू, मला तर धारवाडची फारच सवय झाली आहे. इथंच शिक्षण झालंय. गावभर भरपूर मित्र आहेत. काही कारणानं परगावी जावं लागलंच तर माझा श्वास कोंडल्यासारखा होतो.’
`खरंच! प्रत्येकाला आपापल्या गावाविषयी असंच वाटतं!’ चंद्रू उत्तरला.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरव्या रंगाचा महोत्सव चालला होता. शेकडो फुलांचे ढीग मनाला भुरळ घालत होते. धारवाडची तांबडी माती चपलांशी सलगी वाढवू पाहत होती. चाफ्याच्या सुगंधाबरोबर शेवंतीचं संमेलन चाललं होतं. धारवाडचं वातावरण कितीही अरसिक व्यक्ती असली तरी तिला रसिक करून टाकत होतं. धारवाडचा श्रावण मन मोहून टाकत होता.
किटीचा हा `स्वर्ग’ कितीही सुंदर असला तरी चंद्रूचा बेंगळूरवरचा मोह कणभरही कमी व्हायला तयार नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे - बेंगळूर म्हणजे नखरेल आकर्षक तरुणी तर धारवाड मुग्ध बालिश तरुणी!-
बेंगळूरहून येऊन तीन दिवस झाले होते. सकाळी शांतम्मा किटीला म्हणाल्या, `तू चंद्रूसाठी खोली पाहिजे म्हणून सांगितलं होतंस का? माळमड्डीवरच्या भीमण्णा देसायांची जागा भाड्यानं द्यायची आहे म्हणे. तुझा तो शानबाग आला होता सांगायला.’
लगोलग चंद्रू आणि किटी चढ-उतारावर वसलेल्या माळमड्डीकडे निघाले.
तारेचं कंपाउंड असलेल्या विस्तीर्ण बागेनं वेढलेलं जुनं घर. लाल कौलांनी शाकारलेलं. भोवतालची बाग भरपूर फुलझाडं-फळझाडांनी भरलेली. कितीतरी प्रकारची झाडं! नीट रांगेत लावलेली पेरूची, आंब्याची आणि फणसाची झाडं, केळ्याच्या झाडांचं बन, फुलांची मुबलक झुडुपं, चाफा, जुई- मोगरा, पारिजात- अगदी कौतुक वाटावं असं बकुळीचंही झाड! विविध रंगांची आणि आकारांची डेलियाची फुलं.
चंद्रूला वाटलं, किटी म्हणत होता- घराभोवती बाग आहे- इथं तर बागेमध्येच घर दिसतंय! त्यानं बेंगळूरमध्ये असं झाडांनी घेरलेलं घर पाहिलंच नव्हतं. तीस बाय चाळीस फुटांच्या साईटवर तीनमजली घरं बांधलेल्या `किष्किंधा नगरी’चीच त्याला सवय होती. मातीच्या कुंड्यांमधून रोपं लावून तयार केलेला बगिचाच त्यानं पाहिला होता. क्षयरोगग्रस्त मानव समूहानं व्यापलेल्या बेंगळूरमध्ये तो इतके दिवस राहिला होता. आता त्याच्यासमोर आरोग्यपूर्ण धारवाड उभं होतं. त्याला मनोमन हा फरक जाणवला.
घर दुमजली होतं. बहुतेक वरचा मजला भाड्यानं द्यायचा विचार आहे की काय कोण जाणे! चंद्रू मनोमन विचार करू लागला- `जागा केवढी असेल? आपल्याला परवडेल की नाही?’
किटीनं घराच्या दारावर थाप मारली.
दरवाजा उघडला गेला आणि चंद्रू अवाक् होऊन उभा राहिला.
घराचा दरवाजा रेल्वे-प्रवासात भेटलेल्या गानकोकिळा सुंदरी विनितानं उघडला होता.
विनितेच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव उमटले.
त्या दोघांच्याही प्रतिक्रियांकडे किटीचं लक्ष नव्हतं. त्यानं विचारलं, `आहेत काय भीमण्णा?’
विनितेनं स्वत:ला सावरत म्हटलं, `हो - आहेत. या. येतील एवढ्यात. बसा तुम्ही.’ आणि हरिणीच्या वेगानं ती आत दिसेनाशी झाली.
जुनाट सोफा आणि जुन्या खुर्च्या पाहाताच घराच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येत होती.
चंद्रूनं मनोमन ठरवलं, काही झालं तरी हीच खोली आपण भाड्यानं घ्यायची. त्यानं अकारणच आणखीही एक ठरवलं- गाडीतल्या विनितेच्या भेटीविषयी किटीला काहीच सांगायला नको.
भीमण्णांनी सांगितलेल्या सगळ्या अटी मान्य करून खोलीचं पक्कं करून तिथून निघताना चंद्रू उल्हसित झाला होता. किटीची मात्र भुणभूण चालली होती, `काही म्हण ! मला तरी भाडं जास्त वाटतंय! तू उगाच दडपणाखाली हो म्हणू नकोस. आणखी दोन दिवसांमध्ये याहून कमी भाड्यामध्ये याहून मोठं आणि नवं घर मिळू शकेल. आपण आणखी प्रयत्न करू या.’
पण चंद्रूनं मात्र नकारार्थी मान हलवली.
त्याची फार काही बोलायची इच्छा नव्हती. कारण विनितेनं त्याचं मन व्यापून टाकलं होतं. मनोमन तो उल्हसित झाला होता.
रोजच्यासारखाच सूर्योदय झाला. हातात पाण्याची बादली आणि झाडू घेऊन विनितानं दार उघडलं. एखादं दुर्मिळ दृश्य पाहावं तशी ती कौतुकानं सूर्योदयाचं निरीक्षण करू लागली. सोनेरी आकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, विविध फुलांच्या सुगंधाच्या मिश्रणातून हवेत पसरलेला विलक्षण सुगंध! त्यात पारिजातकाच्या सड्याची भर पडलेली! विनिताचं मन उत्साहानं उभारलं गेलं.
हे नेहमीचंच होतं. विनिताचा स्वभावच तसा होता. काहीही सुंदरतेनं भरलेलं समोर आलं की तिचं मन आनंदानं नाचायला सुरुवात करत होतं. त्याचंच प्रतिबिंब चेहऱ्यावर पडल्यामुळे तिचा चेहरा सतत आनंदी दिसत असे.
आज तरी वेगळं असं काय घडलं होतं? नेहमीसारखाच सूर्योदय ना? पण विनितेच्या दृष्टीनं इतकी साधी गोष्ट नव्हती. हा अनुपम सूर्योदय केवळ आपल्यासाठीच झाला आहे- या भावनेनं ती आनंदानं मोहरुन गेली होती.
साऱ्या बागेचा केर लोटत ती बकुळीच्या झाडापाशी आली. मंद पिवळ्या चंद्राप्रमाणे बकुळी आपलं अस्तित्व दर्शवत होती. हातातला झाडू बाजूला ठेवून विनिता हलकेच एकेक फुल गोळा करता-करता त्या गंधानं पुलकित होऊन गेली.
माडीवरच्या खिडकीतून चंद्रू विनिताचं फुलाबरोबर रमणं तिच्या न कळत पाहात होता. तिचं मात्र आणखी कुठंही लक्ष नव्हतं ती स्वत:च्या भावना-प्रपंचात मग्न होऊन गेली होती.
दूधवाला येताच विनिता आपल्या भाव-विश्वातून बाहेर आली. फुलं घेऊनच ती दुधाचं भांडं आणायला आत गेली.
भीमण्णा देसाई भरपूर बोलके गृहस्थ होते. गप्पांच्या आखाड्यात एकदा उतरले की कुणालाच ऐकत नसत. पण चंद्रूला त्यांच्या सरळ स्वभावाचाही अनुभव येत होता. चंद्रू राहायला आला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं,
`अजिबात संकोच वाटू देऊ नका! काही पाहिजे असेल तर खुशाल मागून घ्यायचं. हेही तुमचंच घर म्हणून समजा, समजलं की नाही?’
या घरात कोण-कोण राहतंय, त्यांचं परस्परांशी नातं काय याचा चंद्रूला काहीच खुलासा होत नव्हता. एक मात्र खरं- विनिता मात्र क्षणभराचीही उसंत न घेणारं सतत फिरणारं यंत्र झाली होती.
सकाळी दहा वाजता ऑफिसला जाऊन चंद्रू संध्याकाळी सहा वाजताच घरी परतत होता.
जाग आल्यापासून ऑफिसला जायला निघेपर्यंत सकाळच्या वेळी अनेकदा विनिताचं नाव त्याच्या कानांवर येत होतं.
`विनू, ताटं वाढलीस काय?’
`विनू, गिरणीला जाऊन आलीस ना?’
`विनू, धुतलेले कपडे कुठं ठेवलेस?’
`हे काय विनू! अजून फुलांचे गजरे केले नाहीस?’
`विनू, अगं, आमटीला खडाभर मीठ कमी पडलंय बघ!’
घरातली सगळ्या वयांची माणसं विनिताच्या नावाचा सतत जप करत होती. आणखीही एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती- प्रत्येकजण काही ना काही काम सांगण्यासाठीच तिला हाका मारत होतं!-
कोण आहे ही विनिता? या घरातली अनाथ मुलगी? घरातली कामवाली? सुरुवातीला चंद्रूला काहीच समजत नसे.
एक मात्र खरं- कॉलेजला जाते, म्हणजे ती घरातली मोलकरीण नसावी. भीमण्णांना ती `काका’ म्हणायची. म्हणजे अनाथही नसेल.
एका शनिवारचा दिवस. चंद्रू लवकरच ऑफिसमधून घरी येऊन झोपला होता. त्याच गंधर्व-गायनानं त्याला जाग आली. उठून खिडकीपाशी जाऊन त्यानं खाली पाहिलं. विनिता स्वत:च्याच नादात गाणं गुणगुणत झाडांना पाणी घालत होती.
कुणीतरी गर्दभ-स्वर त्यात मिसळून तिच्या गाण्यात खंड पाडला.
`हे काय गं? सतत गाणं म्हणत बागेतच राहिलीस तर इथली घरातली कामं कोण करणार? चल लवकर. परसात भांड्यांचा ढीग पडलाय! किती सांगायचं तुला? हे गाण्याचं वेड कमी होईल तर शपथ!’
त्या कर्कश आवाजासरशी विनितानं आपलं गाणं थांबवलं आणि ती आत गेली.
नाही म्हटलं तरी चंद्रू खिन्न झाला.
हा सुमधुर स्वर, ही गाण्यातली तन्मयता क्वचितच पाहायला मिळते.
चंद्रूनं सुरभीला- आपल्या लहान बहिणीला- अनेकदा सांगितलं होतं, `कितीही खर्च झाला तरी मी पैसे देईन. तू गाणं शिक!’ पण सुरभीनं तिकडे लक्षच दिलं नव्हतं. तिला आवाजाचीही देणगी नव्हती. शिवाय तिला त्याची आवडही नव्हती.
घरातल्या घुसमटून टाकणाऱ्या वातावरणातही विनिता पुन्हा-पुन्हा गात होती! कुणीही त्या गाण्याला प्रोत्साहन देत नव्हतं - कौतुकही करत नव्हतं. एवढंच नव्हे, गाणाऱ्याला मध्येच अडवू नये एवढंही भान त्या घरातल्या माणसांना असल्याचं चंद्रूला दिसत नव्हतं.
का कुणास ठाऊक, विनिताचे कष्ट बघून चंद्रू अस्वस्थ होत होता. कदाचित स्वत: विनिताही त्यामुळे एवढी कष्टी नसावी. कारण त्यानं पाहिलं- हसतमुखानं आणखी एक गाणं गुणगुणत विनिता आंब्याच्या झाडाखाली भांडी विसळत होती.
जसे जसे दिवस जात होते, तसं तसं त्याला त्या घरातल्या माणसांच्या परस्परांशी असलेल्या नात्याविषयी समजू लागलं. विनिताला आई-वडील नव्हते. रामक्का तिची सावत्र आई. त्याही विधवा. त्यांना एक मुलगा होता- शोधूनही सापडणार नाही एवढा ढ मुलगा! त्यामुळे रामक्कांना हुशार विनितेचा अकारण संताप येत होता.
घरात वृद्ध आजी सीतम्माही होत्या. थोरले काका भीमण्णा आणि त्यांच्या पत्नी तुळसक्का आपल्या चार मुलांसह तिथंच राहात होते. त्याशिवाय घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असे.
ते घर विनिताच्या आईचं होतं. वर्षापूर्वी विनिताचे वडील वारले होते. भीमण्णांची किरकोळ शेती होती. त्यावर जेमतेम पोट भरत होतं- तेवढंच. आता तेच या घराचे यजमान होते. एकूण पाहता आर्थिकदृष्टया त्यांचं घर सर्वसामान्य म्हटलं पाहिजे.

सगळ्यांनाच विनितेवर हुकूम चालवायला आवडत होतं. तिच्याच घरी आश्रय घेऊन राहणारे तिला हक्कानं कामं करायला सांगत. रामक्का तर सतत तिला धारेवर धरायच्या. पण भीमण्णा काकांचा मात्र विनितेवर खूपच जीव होता. दिवसभर वासराप्रमाणे स्वच्छंद हुंदडणाऱ्या आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन कामं करणाऱ्या वसंत-लक्ष्मी विनितेला ते दररोज रात्री गाणी म्हणायला लावत. दिवसभराची कामं संपली आणि रात्रीची जेवणं आटोपली की नंतरची झाकपाक करणाऱ्या विनितेला ते बाहेरच्या अंगणातील आंब्याच्या किंवा बकुळीच्या वृक्षाखाली ठेवलेल्या बाजल्यावर बोलावत आणि म्हणत, `विनू, हातातली कामं टाकून इथं ये बघू! आता इतरांना करू दे कामं. इथं बैस. एखादं पुरंदरदासाचं किंवा आणखी कुठल्यातरी दासाचं पद म्हण बघू!’
हा संवाद कानावर आला की माडीवरच्या चंद्रूचे कान आपोआप टवकारले जात. विनिता थोरल्या काकांपाशी बसून देवाची गाणी सुश्राव्य स्वरात गायला सुरुवात करायची. सारं वातावरणच भक्तिरसात बुडून जायचं.
भीमण्णांचा स्वभाव बोलका होता. त्यांच्याकडूनच चंद्रूला विनितेविषयी अधिकाधिक तपशील समजायचा. विनितेशी त्यानं गप्पा मारण्याचा प्रसंगच आला नव्हता. तिला तेवढा वेळही नव्हता. शिवाय अपरिचित तरुणाशी गप्पा तरी काय मारणार ती?
कर्नाटक कॉलेजमध्ये विनिता संगीत हा प्रमुख विषय घेऊन - त्यातही हिंदुस्थानी संगीत- बी.ए. च्या दुसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकत होती. अनेक संगीत-स्पर्धांमध्ये कॉलेजच्या वतीनं भाग घेऊन तिनं वेगवेगळ्या गावांमधून पुरस्कार मिळवून आणले होते. तूर्त तरी तिच्या लग्नाचा विचार कुणाच्याही मनात नव्हता. पैशाची व्यवस्था व्हायला हवी ना! बी. ए. झाल्यानंतर तिनं कुठं तरी नोकरी धरायला हवी, पैसे साठवायला हवेत- त्यानंतर लग्नाचा विचार करायचा. म्हणजे आणखी चार-पाच वर्षं तरी लग्नाचा विचार नव्हता.
पावसाळा संपून ऑक्टोबरचं कडक ऊन पडायला सुरुवात झाली होती. उन्हाळ्यात झाडावरून उतरवून, फोडून, चिंचोके काढून उन्हं दिलेली चिंच पावसाळ्यात दमट हवेमुळे ओलसर झाली होती. उन्हाचा कडाका वाढला तेव्हा ती चिंच एका टोपलीत घालून विनिता माडीवर निघाली. चंद्रूच्या खोलीलगतच गच्चीचं दार होतं. चिंचेची भली मोठी टोपली घेऊन विनिता माडीवर आली.
गच्चीत तट्ट्या अंथरुन त्यावर चिंच पसरत विनितेनं विचारलं, `इथं गच्चीत चिंच वाळत टाकली तर तुम्हाला त्रास नाही ना होणार?’
हे विनिताचं चंद्रूबरोबरचं पहिलं संभाषण!
ऑक्टोबरचं ऊन चटका देत होतं. आभाळ निरभ्र होतं. श्रावणातल्या फुलांनी निरोप घेतला असला तरी बकुळीला कुठला दुष्काळ? सदा सर्वदा सुगंधाचा स्रोत देणारा निरंतर प्रवाह तो! वर्षभर फुलांची उधळण करणारा वृक्ष-
एव्हाना चंद्रूला धारवाडच्या कन्नड भाषेतले अनेक शब्द समजू लागले होते. त्यामुळे विनिताच्या बोलण्यावर तोही धारवाडी ढंगात म्हणाला, `नाही. टाका तुम्ही वाळत. चिंच तुमची- गच्चीही तुमचीच!-’ त्याचं मन तर म्हणत होतं- विनिता, एवढंच काय! मीही तुझाच आहे!-
चंद्रूला तर तिच्याशी आणखी थोडं बोलायचं होतं. पण काय बोलायचं हे सुचेना. शेवटी एकदाचा चिंच वाळत घालण्याचा रूक्ष कार्यक्रमही संपला. आता ही टोपली घेऊन निघून जाईल हे लक्षात येऊन तोच म्हणाला, `फार सुरेख गाता तुम्ही!’ एवढंच नव्हे, तूही फार सुंदर आहेस! पण हे वाक्य त्याच्या मनातच राहिलं. सुरेख, सुशील, सतत उत्साहानं नाचणारं कारंजं-
विनितेच्या चेहऱ्यावर संकोच उमटला. ती उद्गारली, `थँक्स.’ त्यानं संभाषण वाढवण्याची संधी पकडत म्हटलं, `तुम्ही रेडिओवरही गाऊ शकाल!-’
`हो, गाते ना! खूप वर्षांपासून गाते मी रेडिओवर! तुम्ही ऐकलं नाही कधी?’
चंद्रू वरमला, `नाही! कधी नाही ऐकलं!’
`पुढच्या वेळी तुम्हाला आधीच सांगेन. आता वाट सोडता? जायचंय मला.’
स्वत:च्या नकळत तिच्या वाटेत आडवा उभा राहिलेला चंद्रू शरमून बाजूला झाला.
विनिता रिकामी टोपली घेऊन पायऱ्या उतरुन निघून गेली.
दिवस जात होते. चंद्रू धारवाड गावात आणि देसायाच्या घरात बऱ्यापैकी रुळला होता. अधून-मधून कधीतरी त्यांच्या घरी जेवायलाही जात होता. त्याही वेळी विनिता त्याच्याशी गप्पा मारत नसली तरी परिचयाचं स्मितहास्य तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहायला मिळत होतं.
चंद्रूच्या बँकेत अधून-मधून क्रिकेटचं वेड वर उसळून येत होतं. केवळ कॉमेंट्री ऐकण्यावर त्यांचा उत्साह न थांबता मैदानावर मॅचेसही होत. त्या दिवशी चंद्रूही गावसकरच्या थाटात खेळायला गेला आणि जखमी होऊन कण्हत- विव्हळत घरी परतला. एक वेगवान चेंडू मनगटावर जोरात आपटून हाड दुखावलं होतं. डॉक्टरांनी आठवड्याभरासाठी हाताला प्लॅस्टर घातलं होतं. चंद्रूनं किटीच्या घरी जायचा निर्णय घेतला. समोर भेटलेल्या विनितेला त्यानं ते सांगितलं.
हे ऐकताच भीमण्णा पटकन बाहेर आले आणि म्हणाले, `असं का म्हणता?’
`किटी मला बेंगळूरला पोहोचवण्याची व्यवस्था करेल.’
`अशा अवस्थेत तुम्ही परगावी जाण्याइतका प्रवास करू नये. नोकरीही अजून पक्की झालेली नाही तुमची! इथं आमच्या घरात माणसं राहात नाहीत काय? तुमच्या जेवणा-खाण्याकडे आम्ही बघू. तुम्ही ती काळजी करू नका!’
भीमण्णांनी दिलेला शब्द त्यांनी आणि त्यांच्या घरच्या माणसांनी शब्दश: पाळला. नंतर चंद्रूनंही किटीच्या घरी जायचा विचार पूर्णपणे सोडून दिला.
भीमण्णांनी आपल्या लाऊड-स्पीकरसारख्या आवाजात आज्ञा सोडली, `विनू, चंद्रशेखरांना वेळच्या वेळी जेवायला वाढायची जबाबदारी तुझी! त्यांना आपल्यासारखी भाजी-भाकरी वाढायची नाही. सार-भात वाढायचं. आणि हो- चहा नको- कॉफी द्यायची- समजलं?’
चंद्रूलाही जाणवलं, नाहीतरी आणखी कोण ही जबाबदारी अंगावर घेणं शक्य आहे या घरी? आधीच भरपूर कामांची जबाबदारी पेलत असणाऱ्या विनितेवर ही आणखी जबाबदारी!
इथं आल्यापासून चंद्रूचं विनितेवर लक्ष होतं. एवढ्या दिवसांत त्यानं एकदाही तिला रडताना, रागावताना किंवा दु:ख करताना पाहिलं नव्हतं. ही आपल्या सख्या बकुळ, पारिजात, मोगरा, जाई-जुई यांना पाणी घालताना अश्रूही ढाळून पुन्हा मंद-स्मिता होते की काय?
हिचं लग्न होऊन ही जेव्हा सासरी निघून जाईल, तेव्हाच घरातल्या सगळ्यांना हिचं महत्त्व कळेल!-
एवढ्यात विनिता कॉफीचा कप घेऊन माडीवर आली. तिला पाहताच चंद्रूला साऱ्याचा विसर पडला- मनात येणाऱ्या विचारांचाही!
सुट्टीमधल्या एके दिवशी दुपारच्या निवांत वेळी चंद्रूची वामकुक्षी चालली होती. डोळा लागत असतानाच काही मुलींच्या हसण्याचा किलकिलाट त्याच्या कानांवर आला आणि डोळ्यांवरची झोप पार उडालीच.
त्यानं बाहेर डोकावून पाहिलं- फणसाच्या सावलीत कांबळं अंथरुन त्यावर विनिताच्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होता. दिवाळीसाठी साडी खरेदी करण्याविषयी त्यांची चर्चा चालली असावी.
मैत्रिणी आपापल्या साड्यांविषयी सांगत होत्या. विनिताही म्हणाली, `मला जांभळा रंग भारी आवडतो बाई! मी तर काकांना जांभळ्या रंगाचीच साडी आणायला सांगणार आहे.’
तिच्या बोलण्यातला रंगाचा तपशील चंद्रूला समजला नाही. तो थोडा गोंधळला. कुठला रंग हिला आवडत असेल?
रात्री भीमण्णांनी सगळ्यांसाठी साड्या-लुगडी आणली असावीत. ते म्हणत होते, `विनू, जांभळी साडी खूप शोधली- पण मिळाली नाही. त्याऐवजी ही निळी आणलीय बघ! पुढच्या वर्षी जांभळी आणू या. चालेल ना?’
`न चालायला काय झालं, काका? निळा रंगही सुरेख आहे हा! आवडला हाही रंग!’
हे ऐकताना चंद्रूचं मन सखेद आश्चर्यानं भरून गेलं. त्याची बहीण सुरभी विनितेच्या बरोबरीचीच असेल. गेल्या महिन्यात तो बंगळूरला गेला होता. त्या वेळी तिनं चंद्रूला `मला डार्क ब्ल्यूला शॉकिंग पिंक बॉर्डर असलेलीच साडी हवी-’ म्हणून सांगत संपूर्ण दिवसभर चिक्कपेठेतल्या प्रत्येक दुकानातून घुमवलं होतं. तरी तसली साडी मिळालीच नाही. शेवटी दुसरे दिवशी कुठल्या तरी दुकानातून ती शोधून काढून, अव्वाच्या सव्वा किंमत देऊन तिनं ती विकत आणली होती. वर तिनं चंद्रूला साडी दाखवत विचारलं होतं, `कसं आहे माझं सिलेक्शन?’ खरं तर त्याच्या जिभेवर आलं होतं- `अतिशय वाईट! तुझ्या सावळ्या रंगाला हा रंग अजिबात रुचत नाही!’ पण त्यानं स्वत:ला आवरलं होतं.
हेही खरंच! त्याला धारवाडची रोखठोक बोलण्याची पद्धत अंगवळणी पडली नव्हती ना!
इथं मात्र विनिता मनाविरुद्ध घडणारी प्रत्येक घटना हसतमुखानं स्वीकारत होती. कदाचित परिस्थितीमुळे तिला तसं वागणं भाग पडत असावं- चंद्रूला वाटलं. सुरभीला पैसे देणारा आणि माया करणारा थोरला भाऊ आहे- एक नव्हे, दोन-दोन थोरले भाऊ! शिवाय आई-वडील आहेत. विनिताला कोण होतं? विनिता तारुण्यसुलभ भाव-भावना, हौशी आणि अपेक्षा सहजपणे हसत-हसत बाजूला सारत होती. तिच्या हसण्यातून सुखाची तृप्ती व्यक्त होण्याऐवजी विषादही व्यक्त होत असावा काय? कुणास ठाऊक! केवळ तीच याचं उत्तर देऊ शकेल.
दुसरे दिवशी संधी साधून चंद्रूनं तिला विचारलं, `जांभळा म्हणजे कुठला रंग?’
`जांभूळ म्हणजे तुमच्या बंगळूरच्या भाषेत `नेरळे!’ का बरं? का विचारलंत?’
`काही नाही- सहजच विचारलं.’ तो म्हणाला.
आपली एवढी सेवा जिनं केली, त्या विनितेला जांभळ्या रंगाची एक साडी घेऊन देणं त्याला मुळीच अशक्य नव्हतं. पण इथल्या संकुचित मनाच्या समाजात त्याचा चुकीचा अर्थ लावून विनितेला त्रास होईल याची जाणीव असल्यामुळे तो गप्प राहिला.
किटी अधूनमधून घरी यायचा. एकदा त्यानं म्हटलं तर सहज किंवा म्हटलं तर थट्टेनं विचारलं, `का रे चंद्रू! तू तर धारवाडशी चांगलाच मिळून-मिसळून गेलास! काय विशेष?’
`काही नाही रे! राहायला लागल्यावर मलाही हे गाव आवडायला लागलंय तुझ्यासारखंच!’
`एवढंच?’
`होय. का बरं?’
`काही नाही! म्हटलं, देसायांच्या घराचं काही खास आकर्षण नाही ना? विनिता उत्तम गाते ना?’
`तुला कसं ठाऊक?’
`कसं ठाऊक? अरे, धारवाडमध्ये सगळ्यांनाच ठाऊक आहे हे! ती रेडिओ-आर्टिस्ट आहे ना?’
`तुला का रे एवढा इंटरेस्ट?’
`नाही बाबा! अम्मानं माझ्यासाठी बेंगळूरची मुलगी ठरवली आहे. तुझं काय?’
चंद्रूनं लगोलग विषय बदलला.
बेंगळूरच्या `इस्रो’ कंपनीत नोकरी मिळाल्याची तार चंद्रूला मिळाली आणि चंद्रूला अनावर आनंद झाला.
आता तो पुन्हा आपल्या प्रिय बेंगळूरमध्ये राहू शकत होता. घरचं अन्न खात घरीच राहता येईल. शिवाय ती नोकरीही बदलीची नव्हती.
त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट त्या नोकरीत होती, ती म्हणजे, अमेरिकेत जाण्याची संधी!
चंद्रूच्या स्वप्नातला प्रदेश बेंगळूर नव्हता- तिथून कितीतरी लांब असलेला श्रीमंत देश अमेरिका!
शिक्षणही अमेरिकेत घ्यावं असं चंद्रूला कितीही वाटलं तरी ते शक्य नव्हतं. कारण त्याची घरची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे चंद्रू नोकरी शोधतानाच सावधपणे त्या देशात प्रवेश मिळवून देऊ शकेल अशाच नोकरीच्या शोधात होता.
`इस्रो’मधल्या मुलाखतीतही त्याला विचारलं होतं- `तुम्ही सिलेक्ट झालात तर अमेरिकेला जायची तयारी आहे ना? पासपोर्ट तयार ठेवा तुम्ही!’
धारवाडच्या बँकेतल्या नोकरीत ही शक्यता नाही. योग्य नोकरी मिळेपर्यंत काहीतरी करून पैसे मिळवत राहायचं म्हणून चंद्रूनं ही नोकरी पत्करली होती.
चंद्रूनं आनंदानं सामानाची बांधाबांध केली. इथं येऊन त्याला वर्ष झालं होतं. तो जाणार असल्याचं समजताच भीमण्णा आपण होऊन त्याच्या खोलीत आले.
`हे काय? तुम्ही तुमच्या गावी निघालात म्हणे! आणखी चांगली नोकरी मिळाली ना? जाऊन या! तुम्ही राहत होता तेव्हा काळजी नव्हती बघा! बरंय, जाऊन या तुम्ही.’
`हो ना!’
`पुन्हा या गावात आला तर आमच्याकडेच उतरायचं! समजलं? उगाच या त्या मित्राकडे जायचं नाही- आधीच सांगून ठेवतो!’
गावाला जाण्याआधी किटीच्या घरी आणि भीमण्णांच्या घरी आवर्जून जेवायला बोलवण्यात आलं. चंद्रूनंही भीमण्णांना आग्रहानं सांगितलं, `भीमण्णा, बेंगळूरला याल तेव्हा आमच्या घरी नक्की यायचं!’
`यायचं आहे खरं! राजाजीनगरला माझी धाकटी बहीण इंदूही राहते. तीही बोलावतेय कधीची! एकदा येऊ दोन्ही घरी!’
रात्री निघताना चंद्रूला विनितेची आठवण झाली. तिच्याशी काय बोलावं- काय द्यावं हे त्याला समजेनासं झालं. अखेर बेंद्रेंच्या गीतांचा संग्रह तिच्या हाती ठेवत तो म्हणाला, `हे तुमच्यासाठी! तुमचं रेडिओवरचं गाणं मी तर ऐकू शकलो नाही. आमच्या गावात धारवाड स्टेशन ऐकू येत नाही.’
विनिता हसली; पण त्यात खिन्नता होती.
साऱ्या घरात भीमण्णांपेक्षाही अधिक मनापासून तिचं गाणं ऐकणारा हा तरुण तिचा एकमेव श्रोता होता.
आता तोही निघून चालला आहे.
कदाचित ही त्याच्याबरोबरची अखेरची भेट असेल.
तो काही पुन्हा धारवाडला येणार नाही. आपल्याला तरी बेंगळूरला कशाला जायचा प्रसंग येतोय म्हणा!
याची जाणीव असल्यामुळेच तिच्या हसण्यामागे विषाद होता.
पण नशिबाचा खेळ कुणाला ठाऊक असतो? त्या दोघांनाही त्याची कल्पना नव्हती.
संस्कृतचे मास्तर शामण्णांची चंद्रशेखर, गिरीश आणि सुरभी ही तीन मुलं. पूर्वी कधीतरी त्यांनी जयनगरमध्ये तीस बाय चाळीसच्या प्लॉटवर एक छोटंसं साधं घर बांधलं होतं. घरासमोरच्या रिकाम्या जागेत छोटीशी बाग होती- पण खरं तर तिथं आणखी बांधकाम करून छोट्या घराचं बंगल्यात रूपांतर करायचं, असा गौरम्मांचा विचार होता. मुलं मोठी होऊन पगार मिळवू लागली की आपलं ते स्वप्न पुरं करून घ्यायचा त्यांचा विचार होता.
नवऱ्याच्या पगारात घराचं बांधकाम करण्याइतकी अनुकूलता गौरम्मांना मिळाली नव्हती. मोजका पगार, मुलांची शिक्षणं, वरकमाई नाही- अशा परिस्थितीत गौरम्मा मनातलं स्वप्न बाजूला सारून काटकसरीनं संसार करत होत्या.
शामण्णांचा स्वभाव मात्र शांत आणि समाधानी होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सारे त्यांच्याशी आदरानं वागत.
गौरम्मांनाही संसार चालवण्याचं शहाणपण भरपूर होतं. कुठंही कर्ज न करता, टुकीनं संसार करण्यात त्या वाकबगार होत्या. सारी कामं स्वत:च करून त्या मोलकरणीचे पैसेही वाचवत होत्या. स्वत:च्या किरकोळ हौसा-मौजा मारत आणि कष्ट करत त्यांनी आपली मुलं वाढवली होती. आता ती सुशिक्षित मुलंच त्यांची संपत्ती होती.
स्वत:ची कर्तव्यं करून संपली की, शामण्णांचं वागणं विरक्त माणसासारखं असे; पण गौरम्मांचं तसं नव्हतं. त्यांना संसारात बराच रस होता. काटकसरीच्या संसारात त्यांच्या अनेक आशा-आकांक्षा अर्धवट राहिल्या होत्या. ज्या आशा पुऱ्या झाल्या, त्यांचं प्रमाणही गौरम्मांच्या दृष्टीनं समाधानकारक नव्हतं. हळदी-कुंकवाच्या किंवा लग्नाकार्याच्या निमित्तानं स्नेही आणि नातेवाइकांच्या घरी गेलं की, त्यांचं मन भारी रेशमी साड्या, सोन्या-हिऱ्याचे चमकदार दागिने, नवी करकरीत गाडी याकडे ओढलं जात होतं. मनात येई,
`किती नशीबवान आहेत हे! एवढे मेले कष्ट करकरून थोडं बऱ्यापैकी लुगडं घ्यायचं म्हटलं तरी जमत नाही! आयुष्यात कधी तरी माझ्या वाट्याला हे ऐश्वर्य येईल काय?’
मुलं किरकोळ नोकऱ्या करत राहिली तरी, आपलं नष्टचर्य संपणार नाही, त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या धरल्या तरच हे शक्य आहे, हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीला कधीच समजलं होतं.
श्रीमंतीनं लगडलेली पुण्यभूमी अमेरिका त्यांच्या दृष्टीनं प्रत्यक्ष श्रीविष्णूच्या वैकुंठापेक्षाही परमश्रेष्ठ होती! जर आपली मुलं अमेरिकेत गेली तरच तिथला डॉलर मिळवून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त श्रीमंत होता येईल हे त्यांना ठाऊक झालं होतं.
आपली या जन्मीची आणि मागच्या जन्मीची पुण्याई असेल तर, का आपली मुलंही अमेरिकेला जाणार नाहीत? यक्षिणीच्या जादूच्या छडीप्रमाणे असलेला डॉलर देश त्यांच्या जीवनाचं परमध्येय झालं होतं.
अशा गौरम्मांचा थोरला आणि लाडका मुलगा चंद्रू! गव्हर्नमेंट कोट्यातली सीट मिळवून इंजिनियर झालेला हुशार मुलगा. वडिलांसारखा सावळ्या रंगाचा नव्हे, त्यानं आईचा गोरापान रंग उचलला होता. उंची थोडी बेताची असली तरी बुटका म्हणता येणार नाही अशी आकृती. गिरीशच्या तुलनेत याची उंची थोडी कमी वाटते- एवढंच!
चंद्रूनं आईच्या रंगाबरोबर तिचा महत्त्वाकांक्षी स्वभाव उचलला होता. त्यामुळे माय-लेकरांचं पटायचंही खूप!
गिरीशचं मात्र सगळंच याउलट होतं.
बोलणं बेताचं. सतत कुठल्या ना कुठल्या कामात गढून राहणं हा त्याच्या स्वभावाचाच एक भाग झाला होता. स्वभावत:च तो समाधानी होता. या बाबतीत तो अगदी वडिलांवर गेला होता.
बुद्धिमत्तेच्या बाबतीतही चंद्रूशी तुलना करता तो डावा होता. म्हणजे अगदी `ढ’ही नव्हता. दरवर्षी बऱ्या मार्कांनी पास होत त्यानं बी. कॉम. ची डिग्री मिळवली होती. बँकेत क्लार्क म्हणून बऱ्यापैकी नोकरीही त्यानं मिळवली होती. त्या नोकरीविषयी त्याला कुठल्याही प्रकारची खंत नव्हती. बँक सुटल्यावर तो सत्राशे साठ ठिकाणी भटकत असे. राघवेंद्र स्वामींच्या आराधनेचा तीन दिवसांचा उत्सव आला की, सुरुवातीपासूनच त्याचा त्यात पुढाकार असे. कुठली मयतीची बातमी आली तरी काळ-वेळ न म्हणता चार मित्रांना घेऊन तो मदतीसाठी हजर असे. परवाच त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा हा तिपटूरला केवळ नारळ आणण्यासाठी म्हणून गेला होता!
अशा माणसाला पैसे मिळवायला कसं काय जमणार?
गौरम्मांनी आपल्या या धाकट्या लेकराला हजारदा नाना परीनं व्यावहारिक जगताविषयी समजावून सांगितलं होतं. आई काही सांगू लागली की तो हसत म्हणायचा,
`अम्मा, अण्णांनीच सांगितलं नाही काय- `परोपकारं इदं शरीरं’ म्हणून?’
मुलापुढे निरुत्तर झालेल्या गौरम्मांचा संतापाचा रोख मग नवऱ्याकडे वळायचा, `तुम्हीच त्याला नाही ते शिकवलंय! तो कसा मोठा माणूस होईल!’
यावर शामण्णा म्हणायचे, `असू दे गं! तुझा चंद्रू मोठा माणूस होतोय ना? याला होऊ दे माझ्यासारखा- त्यालाही तुझ्यासारखी चांगली बायको मिळेल आणि त्याचाही संसार चांगला होईल.’
चंद्रूला `इस्रो’मधलं काम खूपच आवडलं. तोही केवळ बुद्धिवानच नव्हता, निष्ठेनं काम करणं हा त्याचा स्वभावच होता. त्यामुळे तिथल्या वरिष्ठांचीही त्यावर लवकरच मर्जी बसली.
दिसायला देखणा असलेल्या चंद्रूवर अनेक वधूपित्यांची नजर होती; पण चंद्रू आणि गौरम्मा यांचा एवढ्यात त्याचं लग्न करण्याचा विचार न करण्याचा निर्णय होता. एक-दोन वर्षं नोकरी करून थोडाफार पैसा साठवल्यानंतर घरापुढच्या जागेवर किंवा वरती बांधकाम करून घ्यायचा त्यांचा विचार होता. शिवाय अमेरिका! तेच त्या दोघांच्या जीवनाचं महत्त्वाचं ध्येय होतं. त्यामुळं चंद्रू चौकशीसाठी आलेल्या वधूपित्यांची निराशा करत होता.
शामण्णांची आणखी दोन वर्षं नोकरी राहिली होती. तेवढ्या अवधीत सुरभीचं लग्न उरकून घ्यायचा त्यांचा विचार होता.
गिरीशचा पगार बेताचाच होता. त्याचं कुणालाच फारसं कौतुक नव्हतं. जेमतेम पोटापाण्यापुरते पैसे त्याला मिळत. त्यामुळे घराचं बांधकाम आणि सुरभीचं लग्न या दोन्ही गोष्टी चंद्रूच्या पगारावर अवलंबून होत्या. यानंतर उत्तम आयुष्य जगायचं असेल तर चंद्रूच्याच सुकाणूची गरज असल्याबद्दल गौरम्मांना खात्री होती.
एक दिवस ती आनंदाची बातमी आली. इस्रो कंपनीनं चंद्रूला कंपनीच्या कामासाठी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात पाठवण्याचं ठरवलं.
बातमी ऐकताच गौरम्मांना अपरिमित आनंद झाला. तारुण्य माघारी यावं तसा त्यांच्या मनात उत्साह भरला. चंद्रू एका वर्षासाठी त्या कुबेराच्या देशात निघाला होता.
सुरभी तर हुरळून गेली होती. ती सारखी म्हणत होती, `चंद्रू, तू येशील तेव्हा माझ्यासाठी कमीत कमी सहा साड्या तरी आणल्याच पाहिजेत हं! आणि याशिवाय सिटीझन वॉच!’
गौरम्माही सांगत होत्या, `तिथं केशर, वेलदोडे, बदाम वगैरे चांगले मिळतात म्हणे. आणि सोनंही फार स्वस्त असतं ना? येताना आणायला विसरू नकोस.’
गिरीश आणि शामण्णा मात्र या बाबतीत मौन बाळगून होते.
गौरम्मा आणि चंद्रूची अनेक वर्षांची आशा फळाला आली होती. चंद्रूनं साऱ्या फॉर्मॅलिटिज् उरकून अमेरिकेच्या दिशेनं प्रयाण केलं.
चंद्रू अमेरिकेला उतरला. त्याच्या कल्पनेपेक्षा हा देश कितीतरी वेगळा होता!
क्षणाक्षणाला नवेपण आत्मसात करणारा आणि शिकवणारा, सतत श्री-संपत्तीची अनेकविध पद्धतीनं उधळण करणारा देश!
पाण्याचा दुष्काळ नाही, विजेची तक्रार नाही, घराची कटकट नाही! मानवाच्या मूलभूत गरजा पुऱ्या करण्यासाठी अति तत्पर असलेला देश!
आपला पाच हजार वर्षांचा पुरातन देश! चालुक्य-राष्ट्रकूटांचा... वगैरे वगैरे. कवींनी आपापल्या कवितांमधून ज्या देशाच्या ऐश्वर्याचं बेसुमार वर्णन केलंय, तो आज दारिद्र्य आणि अंधश्रद्धांमुळे पोकळ होऊन गेलेला आपला देश! असल्या जराजर्जर आणि असंख्य रोगांनी ग्रासलेल्या आपल्या देशाची तरुण-संपन्न अमेरिकेशी कशी तुलना होऊ शकेल! जमीन-अस्मानाची कधी तुलना होऊ शकते काय?
किती नेटका देश हा! कुणाचीही मदत नसताना इथं आपण घर शोधू शकतो. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधू शकतो.
मुख्य म्हणजे कुणीही घर-गाडी-फोन या सुखसोयी मिळवू शकतो. आपल्या भारतात मात्र केवळ श्रीमंत म्हणवणारेच या सुखसोयींचा उपभोग घेऊ शकतात.
प्रथम भेटीतच चंद्रू अमेरिकेवर मोहित होऊन गेला. किती भव्य देश हा! इथं राहणारे किती सुखी आहेत!
चंद्रूची नोकरीही चांगली होती. भारतात तो करत असलेल्या कामापेक्षा इथलं काम महत्त्वाचं होतं. केलेल्या कामाचा मोबदलाही चौपटीपेक्षाही जास्त होता! त्यामुळे हुशार आणि मुत्सद्दी चंद्रूनं नोकरीमध्ये यशाची कमान चढती ठेवली होती. कामाचं आणि त्यामुळं मिळणारं समाधान तो ओतप्रोत उपभोगत होता. त्याचा सारा दिवस उत्साहानं भरलेला असे.
संध्याकाळी घरी परतल्यावर मात्र घरच्या माणसांची आठवण होणं स्वाभाविक होतं. आईला पत्र लिहिताना अमेरिकेतला भाजीपाला, इथं मिळणारी फळं, फळांच्या रसाचे विविध प्रकार, आइस्क्रीमची समृद्धी यांविषयी आस्थेनं लिहित होता. इथं उपलब्ध असलेली छोटी-छोटी यंत्रॆ, गार्बेज कॅन- केराच्या बादल्या यांची वर्णनं त्याच्या पत्रात भरपूर होती. सामानाच्या काचेच्या बाटल्या रिकाम्या झाल्या की, त्याला न चुकता आईची आठवण यायची. तो लिहायचा, `अम्मा, तू इथं असतीस, तर त्या सुरेख बाटल्यांमध्ये लोणचं भरून ठेवलं असतंस!’
अमेरिकेत खाण्यापिण्याची कशी चंगळ आहे, इथली माणसं कशी प्रामाणिक आहेत, कसे पैसे टाकून पेपर घेऊन जातात- कसे बसमध्ये कंडक्टर नसतात- याविषयीही तो न थकता विस्तारानं लिहित होता.
इथल्या पैशाचा- डॉलरचा सगळ्यांनाच मोह पडतो. इथला एक डॉलर इतका बलवान आहे की, त्यासाठी आपल्याकडील चाळीस रुपये द्यावे लागतात! या डॉलरमध्ये एवढी मंत्रशक्ती आहे की डॉलर असेल तर जगात कुठंही जाता येतं! डॉलर असेल तर साऱ्या जगात मान मिळतो.
चंद्रूचं पत्र आलं की संपलंच! त्या दिवशी डाळ आणि भाजी हमखास कच्ची राहायची, भात करपून जायचा, कॉफीमध्ये दोन-दोनदा साखर पडून गोडमिट्ट होऊन जायची! सारामध्ये मीठ गायब असे आणि भाजीमध्ये ते दोनदा पडलेलं असे.
त्यामुळे शामण्णा आणि गिरीश जेवताना हमखास म्हणायचे, `आज चंद्रूचं पत्र आलेलं दिसतंय!’
पण गौरम्मांचं तिकडंही लक्ष नसे. त्या तर मनोमन अमेरिकेत जाऊन पोहोचलेल्या असत.
चंद्रूचं ट्रेनिंग संपत आलं होतं. आणखी दोन-तीन आठवड्यांनी भारतात परतून आपल्या ऑफिसमधील लोकांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी त्याला स्वीकारायची होती.
भारतात माघारी जाण्याच्या विचारानं चंद्रू अस्वस्थ होत होता. इथलं तंत्रज्ञान, आकर्षक देश- त्याहीपेक्षा इथल्या डॉलर शक्तीची त्याला प्रचंड भुरळ पडली होती.
इथं आल्यावर लवकरच त्याला आणखीही एक गोष्ट समजली होती. त्याच्या आधी इस्रोमधील चार-पाच तरुणांना अमेरिकेत येण्याची संधी मिळाली होती. ती पकडून ते इथं आले होते आणि संधी साधून इथल्या वेगळ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकऱ्या धरल्या होत्या. अशा प्रकारे `स्किपिंग’ करून कामाला हजर होणाऱ्या तरुणांना इथल्या नव्या कंपन्यांमध्ये सांगण्यात येई, `तुम्ही काही काळजी करू नका- तुम्हांला आम्ही आमच्या लॉयर्सच्या मदतीनं ग्रीनकार्ड मिळवून देऊ!’
ग्रीनकार्ड म्हणजे तिथं राहून हवं ते काम किंवा नोकरी करण्याचं परवानगी पत्र!
ग्रीनकार्ड हातात असलं की, देशात कुठंही काम करता येईल!
खरं तर अशा प्रकारे `स्किप’ करून अमेरिकेत स्थिरावणारे भारतातल्या आपल्या कंपनीलाही बाँड लिहून देऊनच आलेले असतात, हे चंद्रूला ठाऊक होतं. बाँडचा भंग केल्यामुळे मूळची कंपनी कोर्टात खेचू शकते, हे ठाऊक असूनही `त्या वेळी पाहता येईल काय करायचं ते!’ अशा प्रकारची मनोवृत्ती या `पुळपुट्यां’ची असल्याचंही तो पाहत होता.
इथं आलेल्या दिवसांपासून चंद्रूचं याकडे लक्ष गेलं होतं. त्याचा जवळचा मित्र राजीव आणि त्याचा मित्र श्रीकांत हे दोघेही अशा प्रकारे अमेरिकेत विरघळून गेले होते. इस्रो कंपनीला त्यानंही त्या दोघांचा ठाऊक असलेला पत्ता समजू दिला नव्हता.
एकदा ग्रीनकार्ड हातात पडलं की, त्यानंतर मात्र हे सारे परागंदा झालेले अज्ञातवासी पुन्हा प्रगट होतात, मातृभूमीकडे धाव घेतात, तिथली एखादी मुलगी पसंत करून लग्न करतात आणि परत येतात. अशा मुलांना श्रीमंत घरातल्या सुशिक्षित मुलीही मिळतात, हे चंद्रूही पाहत होता. मग तिथं त्यांचं `सुखी’ असं स्थिर जीवन सुरू होतं. मग ते त्याच डॉलर-भूमीचे प्रजाजन होऊन जातात.
ग्रीनकार्ड मिळण्यासाठी एक वर्ष लागेल- कदाचित दोन वर्षही लागतील. काही जणांच्या बाबतीत तर त्याहीपेक्षा जास्त वेळही लागायचा. ग्रीनकार्ड न मिळवता भारताला निघून गेलं की इथं पुन्हा येण्याचं दार बंद झालेलं असायचं!
एक ना एक दिवस आपल्याला ग्रीनकार्ड मिळेल याविषयी चंद्रूची खात्री होती. फक्त त्यासाठी शबरीनं रामाची वाट पाहिली, त्या निष्ठेनं वाट पाहिली पाहिजे एवढंच.
चंद्रू विचार करत होता. अगदी सुरुवातीला त्याचं मन गोंधळलं असलं तरी दिवस जातील तसे त्यालाही `स्किप’ होण्यात काही गैर नाही हे पटू लागलं. एवढ्या समृद्ध देशात राहायची त्याची जबरदस्त इच्छा होती. एकदा भारतात परतलं की, पुन्हा इथं येण्याची संधी मिळणार नाही कदाचित!

त्यानं आईला पत्र लिहून आपल्या मनातले विचार कळवले. अखेरीस लिहिलं, `तूर्त माझा इथंच राहायचा विचार आहे, हे घरी आणखी कुणाला सांगू नकोस. ग्रीनकार्ड हातात पडेपर्यंत मला भारतात यायला जमणार नाही.’
पत्र वाचताच गौरम्मांचा आनंद गगनात मावेना! आपला मुलगा यानंतर अमेरिकेत राहणार! डॉलरच्या रूपानं तो भरपूर पैसा मिळवेल आणि इथं पाठवेल! एक डॉलर म्हणजे चाळीस रुपये! आपणही मैत्रिणींपुढे `आमचा चंद्रू अमेरिकेत राहतो-’ असं अभिमानानं सांगू शकू!
चंद्रूचं लक्ष पेपरमधल्या एका जाहिरातीनं खेचून घेतलं. गवतांची कुरणं असलेल्या प्रदेशातल्या, अत्यंत कमी वस्ती असलेल्या, मिनिसोटामधल्या कंपनीनं जाहिरात दिली होती. त्यात कंपनीनं ग्रीनकार्ड मिळवून देण्याचीही जबाबदारी स्वत:कडे घेतली होती!
कुणीही जायला तयार नसलेला नीरस प्रदेश तो! हिवाळ्यामध्ये तर उणे त्रेपन्न फॅरनहिट इतकं कमी तापमान असलेला प्रदेश! जास्तीचा पगार दिला तरी, अशा प्रदेशात जायला माणसं तयार नसताना चंद्रूला मात्र हे योग्य स्थान आणि योग्य नोकरी आहे, असं तीव्रपणे वाटलं. अज्ञातवासासाठी हेच विराटनगर म्हणून योग्य होतं. फोनवर बोलणं झालं. इंटरव्ह्यूसाठी जाऊन आला. कुठल्याही खळखळीशिवाय काम झालं.
कुणालाही कळू न देता गाडी विकून, कंपनीनं दिलेल्या घरात रात्री दिवा लावून ठेवून चंद्रू तिथून बेपत्ता झाला.
दुसरे दिवशी चंद्रू कामावर आलाच नाही. घरी जाऊन पाहिलं तर दिवा जळत होता. आठवडा गेला, तरी चंद्रूचा पत्ता नव्हता. फ्लोरिडा ऑफिसच्या बॉसनं फोन केला. चंद्रूनं टेलिफोनचं पुढच्या आठवड्याचं जास्तीचं बिल भरून पोबारा केला होता.
अमेरिकेतील त्याचे ज्येष्ठ अधिकारी निराशेनं म्हणाले, `तो कुठंही गेलेला नाही. इथंच कुठंतरी स्किप झालाय! घाणेरडी माणसं ही! कशाचीच चाड नाही. आपल्या मातृभूमीला जाणं टाळण्यासाठी ही सगळी नाटकं करतात! देशप्रेम नाही- डॉलरच्या आशेपोटी असं वागतात. अशा लोकांना आपण दिलेलं ट्रेनिंग पूर्णपणे फुकट गेलं!’
त्यांनी मनोमन चंद्रू आणि चंद्रूसारख्यांना शापलं.
राजाजीनगरकडून विजयनगरकडे जाणारी बस गच्च भरून आली तेव्हा विनिताच्या छातीची धडधड आणखी वाढली.
ही बस चुकली तर शाळेत पोहोचायला तासभर उशीर होणार! लाल शाईचा शेरा! आधीच तात्पुरती नोकरी मिळाली होती. असे लाल शेरे पडले तर नोकरी कशी टिकेल?
विनितेनं सारं धैर्य एकवटलं आणि समरांगणात शत्रूवर तुटून पडणाऱ्या कित्तूर चन्नम्माप्रमाणे कंडक्टरच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून ती बसमध्ये घुसली. बसमध्ये प्रवेश मिळताच तिनं विजयी मुद्रेनं सभोवताली बघत सुस्कारा सोडला आणि आधारासाठी खांबाला टेकली.
कंडक्टरनं विचारलं, `कुठं जायचंय?’
`जयनगर-’
तिनं पर्स उघडली- आत फक्त एक शंभरची नोट होती. काल ट्यूशनच्या मुलानं दिलेली नोट. तिनं पर्समध्ये हात घालून शोधले, आजूबाजूच्या कप्प्यांच्या चेन उघडून पाहिलं- एक रुपयाही हाताला लागला नाही.
तिनं अपराधी भावनेनं ती नोट कंडक्टरपुढे धरली.
`पाच रुपयेही सुटे नाहीत. एवढे सुटे कुठून देऊ? असू दे, तुमचे यजमान काढताहेत.’
विनिता आश्चर्यचकित झाली- कोण हा माझा यजमान? या प्रौढ कंडक्टरनं नवा पैसाही खर्च न करता या क्षणी कुणाशी माझं लग्न लावलं?
तिनं वळून पाहिलं. मागं उभा असलेला उंच युवक हसत सुटे पैसे देत कंडक्टरला म्हणाला, `दोन जयनगर-’
`बघा! सुटे पैसे असून नाही म्हणताय!’ म्हणत कंडक्टरनं दोन जयनगरची तिकिटं विनितेच्या हातावर ठेवली.
हा कोण लागून गेलाय? स्वत:ला कोण समजतो? भूपती? राजा? माझं तिकीट यानं का काढावं?
संताप दर्शवत विनितानं सांगितलं, `मिस्टर! जयनगरला उतरल्यावर तुमचे पैसे परत करेन!’
`असू द्या हो.’
`तुम्हाला कदाचित हे चालेल! पण मी दुसऱ्यांचे पैसे घेत नसते!’
एवढ्यात विनिताला बसायला जागा मिळाली.
विनिता राजाजीनगरमध्ये आपल्या आत्याच्या घरी राहात होती. दररोज राजाजीनगरहून जयनगरपर्यंतचा खडतर प्रवास! जयनगरच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाल्यामुळे काही इलाजच नव्हता.
तिच्या जीवनातले धारवाडमधले रम्य दिवस कधीच निघून गेले होते. मायाबाजारातलं एखादं आकर्षक दृश्य नाहीसं व्हावं तसं झालं होतं.
थोरल्या काकांचा, भीमण्णांचा हृदयाघातानं अचानक मृत्यू झाला आणि त्या कुटुंबाचा आधारस्तंभच मोडून गेला.
तुळसक्का दावणगेरेमध्ये नोकरी करणाऱ्या आपल्या थोरल्या मुलाकडे निघून गेल्या.
रामक्का आपल्या सख्ख्या मुलाला सोबत घेऊन मासूरला आपल्या माहेरी निघून गेल्या.
तिथं फक्त आजी सीतम्मा आणि नात विनिता याच दोघी राहिल्या. सीतम्मांनी सगळ्या मुलांकडे थोडे-थोडे दिवस राहायचं असं ठरलं.
आता फक्त विनिताच राहिली.
तिची जबाबदारी कुणालाच नको होती. तिचं लग्न करायचं म्हटलं तर पैसे नव्हते. आता या वयात आलेल्या मुलीनं कुठं राहायचं हा एक प्रश्नच होता.
अखेर आत्या इंदक्का आणि तिचे पती रामराय यांनी मोठं मन करून तिला बेंगळूरला आणलं होतं. `मोठं गाव आहे- लवकर कुठं तरी नोकरी मिळेल. हातात नोकरी असली की लग्नही लवकर जमेल. लग्न ठरलं की धारवाडचं घर विकता येईल. तोच पैसा लग्नासाठी वापरता येईल-’ असा विचार साऱ्यांनीच केला. धारवाडच्या घराला कुलूप लावलं आणि माडी मात्र भाड्यानं दिली. तेवढाच झाडांची देखभाल करणाऱ्या माळ्याचा पगार निघेल.
धारवाडचं घर आणि बाग सोडून येताना विनितेला अत्यंत क्लेश झाले होते. तिनं आत्याला सांगितलं, `घर मात्र विकू नका. आईला तिच्या माहेरकडून आलंय ते. माझा तर या बागेत सारा जीव अडकलाय!’
`खरंय बाई! पटतंय तुझं. जर कुणी सरदार हुंड्याशिवाय तुझ्याशी लग्न करायला तयार झाला तरच तू म्हणतेस तसं घर राखता येईल!’
पण व्यवहारात हे कसं शक्य होईल?
व्यावहारिक जग कसंही असलं तरी विनितेचं मात्र ते घर आणि त्या बागेशी, बागेतल्या प्रत्येक झाडाशी, तिथल्या पाना-फुलाशी अव्यक्त असं गाढ नातं जडलं होतं. तिथलं प्रत्येक झाड तिचं सख्खं भावंडं होतं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. ही बाग आणि हे घर सोडून ती कशी राहील?
पण तिच्या मनाचा कोण विचार करणार? निरुपायानं शेवटी तिनं बागेतल्या प्रत्येक झाडा-झुडुपांवरन हात फिरवून त्यांचा निरोप घेतला. मन घट्ट करून ती जनारण्य असलेल्या बेंगळूरला आली होती.
मोठ्या गावाची सुख-दु:खंही वेगळी. घराजवळ नोकरी कुठून मिळणार? विनिता सकाळी घरातली कामं आवरुन, ट्यूशन उरकून जयनगरच्या शाळेत नोकरीसाठी येत-जात होती.
आता तिला प्रत्येक पैशाचं महत्त्व चांगलंच समजत होतं. त्यासाठी तिचे कष्ट चालले होते.
तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लोपलं नव्हतं. तेच तर तिचं वैशिष्ट्य होतं!
बस जयनगरला थांबली. सारे विचार मागं सारन विनिता बसमधून उतरली. तिच्या पाठोपाठ तो उंच तरुणही खाली उतरला.
तिनं त्याला हटकलं, `मिस्टर! थोडं थांबा. मी सुटे पैसे आणून देते.’
`गिरीश माझं नाव. कॅनरा बँकेत क्लर्क आहे-’ त्यानं स्वत:चा परिचय सांगितला.
`ते ठीक आहे! तुम्ही इथंच थांबा. आलेच मी सुटे पैसे घेऊन.’
एवढ्या पटकन शंभर रुपयांची चिल्लर मिळणार नाही, हे गिरीशला ठाऊक असलं तरी आता ही सुंदर, स्वाभिमानी तरुणी करते तरी काय हे पाहत तो उभा राहिला.
विनिता निराश होऊन परतली. एकदम तिला सुचलं, `तुम्ही बँकेतच नोकरी करता ना? मी संध्याकाळी बँकेत येऊन तुमच्याकडून सुटे पैसे घेईन!’ आणि तिनं ती शंभरची नोट गिरीशच्या हातावर ठेवली.
`तुमचं नाव?’
`विनिता देसाई. ती शाळा दिसते ना? तिथंच मी शिकवते. आता उशीर झाला. निघू?’
विनिता नमस्कार करून निघून गेली.
गिरीश ती गेलेल्या दिशेकडे पाहून हसला. वेगानं जाताना तिच्या जाड वेणीचा फटका त्याला बसल्याचं तिच्या लक्षात आलं नाही.
शाळेत जाऊन पोहोचल्यावर विनिताला भीती वाटू लागली. कोण हा गिरीश कोण जाणे! अशा अपरिचितावर विश्वास ठेवून मी तरी कशी शंभर रुपयांची नोट दिली? त्यानं फसवलं असेल तर? शंभर रुपये फुकापासरी गेलेच म्हणायचे! छे! वेडेपणाच झाला हा! महिनाभर केलेल्या कामाची कमाई होती ती.
पाठोपाठ विनितेला स्वत:ला वाटलेल्या भीतीचा रागही आला. जे झालं ते घडून गेलंय. त्यावर आता फार उलट-सुलट विचार करून काहीच उपयोग नाही.
संध्याकाळी ती मन घट्ट करून कॅनरा बँकेपाशी गेली. त्यानं नाव काय सांगितलं होतं? गिरीश की रमेश?
या विचारात ती तिथं पोहोचली तेव्हा तो बँकेच्या बाहेर तिची वाट पाहात उभा होता.
`वाटच बघत होतो. तुम्ही आला नसता तर तुमच्या शाळेत येऊन तुमचे पैसे द्यायचा विचार करत होतो.’
`शाळेत कुणी तुमच्या ओळखीचं आहे का?’
गिरीश मंद हसत म्हणाला, `तिथं शामण्णा नावाचे संस्कृतचे शिक्षक आहेत ना? त्यांची ओळख आहे.’
`होय? केव्हापासूनची ओळख आहे?’ विनितानं कुतूहलानं विचारलं.
`खूप वर्षांची ओळख आहे. मला यायला जमलं नसतं तरी मी त्यांच्याकडून पैसे पाठवले असते. हं, हे घ्या तुमचे पैसे-’ म्हणत त्यानं एक बंद लखोटा तिच्या हाती ठेवला.
`थँक्स-’ म्हणत तो घेऊन विनिता निघून गेली.
बसमध्ये बसल्यावर तिनं लखोटा खोलून पाहिला. त्यात शंभर रुपयांची चिल्लर होती. गिरीशनं बसचे पैसे त्यातून मोडून घेतले नव्हते.
विनिताला पाहिल्यावर आणि ती वडिलांच्या शाळेतच नोकरी करत असल्याचं समजल्यानंतर गिरीशच्या मनात प्रथमच स्वत:च्या लग्नाविषयी विचार आला.
गिरीशच्या लग्नाचा विचार गौरम्मांच्या मनात आला नव्हता. पण चंद्रूच्या पत्रामुळे अशा विचारांना तोंड फुटलं होतं.
त्यानं नुकतंच आईला पत्र लिहून कळवलं होतं, `मला ग्रीनकार्ड मिळायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. कदाचित आणखी दोन वर्षंही लागू शकतील. तुम्ही गिरीशचं लग्न करावं हे उत्तम!’
या पत्रानंतर गौरम्मांनी वधू-पित्यांना तसं कळवलं.
लग्नाचा विषय घरात गंभीरपणे चर्चिला जाऊ लागला तेव्हा गिरीशनं थोडं दुर्लक्षच केलं, त्यानंतर माञ त्यानं वडिलांनाच थेट विचारलं,
`अण्णा, तुमच्या शाळेत विनिता देसाई म्हणून शिक्षिका आहेत ना?’
`होय. अगदी मंगळागौरीसारखी आहे! फार चांगली मुलगी आहे. आपल्यापैकीच पण धारवाडची आहे ती.’
`आज मी त्यांना बसमध्ये पाहिलं.’

गिरीशचं मन जाणून शामण्णा तो नसताना गौरम्मांना म्हणाले, `गौरी, मी विनितेला ओळखतो. फार गुणी मुलगी आहे. तिला आई-वडील नाहीत. इथंच नातेवाईकांकडे राहते. आपल्या गिरीशचंही आता लग्नाचं वय आहे. आपण विचारायचं काय?’
`आपण होऊन मुलीच्या घरी जाऊन `तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या’ म्हणून तोंड वेंगाडायचं हे मला तरी पटत नाही. आपल्याकडेच काहीतरी खोट आहे, असं लोकांना वाटायचं. त्यांनी विचारलं तर बघू या-’ गौरम्मांनी वरमाईच्या थाटात म्हटलं. त्यांच्या मनात आलं होतं ते वेगळंच! आई-वडील नसलेल्या मुलीला माहेरपण कोण करणार? जावयाचं कोडकौतुक कोण करणार?
शामण्णांना गौरम्मांचा स्वभाव काही अपरिचित नव्हता. त्यांनी एक मध्यस्थ तयार करून त्यांच्याकरवी इंदक्कांना निरोप पाठवला आणि वधू-परीक्षेचं नाटकही ठरवलं.
रात्री कांदा चिरत इंदक्का म्हणाल्या,
`विनू, या रविवारी ट्यूशन ठेवू नकोस बरं!’
`का गं, आत्या?’
`रविवारी मुलाकडची माणसं तुला बघायला येणार आहेत. पण एक मात्र आधीच सांगते- ते काही आपल्या गावाकडचे नाहीत. इकडचे आहेत. तू काय म्हणतेस? चालेल ना तुला?’
`मुलगा ठीक असला की झालं! मग ते कुठले का असेनात!’ मध्येच रामराय म्हणाले.
विनिता म्हणजे त्यांच्या बायकोच्या भावाची मुलगी. लग्न होऊन सासरी गेली की खूप झालं! उगाच नाही तो चिकित्सकपणा कशाला दाखवत बसायचा?
रामरायांच्या मनातले विचार जाणून विनिताही म्हणाली, `अगदी खरंय तुमचं, मामा!’
तिलाही वाटलं होतं- माणसं ती माणसंच ना? बेंगळूरमध्ये चांगली माणसं असतात आणि धारवाडची कितीतरी बिघडलेली माणसं तिनं पाहिली होती. आपल्या शाळेतल्या शामण्णा मास्तरांसारखा माणूस जगात तरी शोधून सापडेल काय?
तिनं नि:श्वास सोडला- आपल्या नशिबात कसली माणसं आणि कसला नवरा आहे कोण जाणे!
`मुलगा बँकेत क्लर्क म्हणून नोकरीला आहे. खाऊन-पिऊन सुखी माणसं आहेत. फारशी गडगंज नाहीत. एक मुलगा अमेरिकेला आहे म्हणे. तो आणखी दोन वर्षांनी भारतात येणार आहे म्हणे. म्हणून आधी धाकट्याचं लग्न करणार आहेत. आणखी एक मुलगी आहे. तिचं लग्न झालं की जबाबदारी संपली. तुझी इंजिनियर-डॉक्टर किंवा ऑफिसरच पाहिजे अशी अट नाही ना?’
`नाही गं आत्या. तसं काहीही म्हणणं नाही. चार पैसे कमी मिळत असले तरी काही म्हणणं नाही- पण माणसं शांत आणि समाधानी असावीत. उगाच गोंधळ-कटकट मात्र असू नये. मीही नोकरी करेन. कष्टाला माझी ना नाही; पण मन प्रसन्न हवं.’
विनितेनं मनातलं मोकळेपणानं सांगितलं.
तो तिचा गाढ विश्वासही होता.
मनाविरुद्धच गिरीश मुलगी बघायला निघाला. वाटेत सुरभी म्हणाली,
`इतके दिवस घरात फक्त अण्णा तेवढेच टीचर होते- आता दोन टीचर होतील!’
`ते एवढ्यात कसं ठरेल? मी मुलगी पाहिल्याशिवाय लग्नाला कसा तयार होईन?’
`गिरी, ही मुलगी अण्णांच्याच शाळेत शिकवतेय म्हणे!’
`होय?’ गिरीश चमकला, `नाव काय मुलीचं?’
`तूच विचार ना तिथं गेल्यावर! नाहीतरी मुलगी बघायची म्हणजे नाव काय वगैरे विचारायचं असतं ना?’
`आधी तू मुकाट्यानं नाव सांग बघू!’
`विनिता देसाई!’
नाव ऐकताच गिरीशचं मन आनंदानं भरून गेलं. विनितेचा स्वाभिमान त्यानं पाहिला होता आणि त्याला तो फार आवडलाही होता. तिला पुन्हा भेटावं असं शंभरदा त्याच्या मनात येऊन गेलं होतं; पण त्यासाठी त्याला आधी राजाजीनगरमधल्या आपल्या मित्राकडे जायला हवं होतं, रात्री तिथं मुक्काम करून सकाळी नऊची बस पकडली पाहिजे होती तरच या मोहिनीची भेट होणं शक्य आहे!
त्याला आता विनितेची माहिती मिळाली होती; पण तरीही तीच आपली वाग्दत्त वधू असल्याची मात्र त्याला कल्पना नव्हती.
`विनिता, आतला ट्रे घेऊन ये बघू!’
खालच्या मानेनं ट्रे घेऊन येणाऱ्या विनितेकडे बघून गिरीशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं.
`बाळ, एखादं देवाचं गाणं म्हणशील काय?’ शामण्णांनी विचारलं तेव्हा तिनं मान वर करून पाहिलं. गिरीशवर नजर जाताच तिच्याही ओठांवर हसू उमटलं.
त्यानंतर तिनं एक देवाचं गाणं सुरेलपणे रंगून जाऊन म्हटलं. गौरम्मा आणि सुरभीलाही विनिता आवडली.
रामरायांनी शामण्णांना स्पष्टच सांगितलं, `धारवाडला तिच्या आईकडून तिला मिळालेलं घर आहे. ते आम्ही तिच्या लग्नासाठी म्हणून ठेवलंय. तुम्ही तुमचं मत सांगितलं तर आम्हांला ते विकण्याची व्यवस्था करता येईल. शक्यतो लवकर तुमचं मत कळवा.’
`आमच्या विनूविषयी आम्ही फार काही सांगत नाही. तुम्ही तिला दररोज शाळेत पाहताच. तुम्ही तुमचा निर्णय लवकर सांगाल तर बरं होईल!’ इंदक्का म्हणाल्या.
वरमाईच्या ठेक्यात गौरम्मा म्हणाल्या, `उद्या आम्ही तुम्हांला कळवू!’ आणि सगळे तिथून बाहेर पडले.
मिनिसोटामध्ये चंद्रू बऱ्यापैकी रुळला होता. ग्रीनकार्डसाठी त्यानं अर्ज दिला होता. तिथल्या वकिलांनी मोघम सांगितलं,
`काहीही सांगता येत नाही. कदाचित लगेच मिळून जाईल, किंवा बराच उशीरही लागेल कदाचित!’
त्यामुळे त्याची अवस्था त्रिशंकूसारखी होऊन बसली होती. आता कुठल्याही कारणासाठी भारतात गेलं तर परत येण्यासाठी व्हिसाचा प्रश्न होता. त्यामुळे घरी आणि आपल्या माणसांची कितीही आठवण झाली तरी त्याचा नाइलाज होता.
त्याच्या मित्रांपैकी काहीजणांना ग्रीनकार्ड मिळाल्याचं त्याला समजलं. ते मित्रा लग्न ठरवण्यासाठी म्हणून ढीगभर सामान घेऊन भारतात आपापल्या गावी गेले होते. तिथं तीन दिवसांत तीस मुली बघून, त्यांतली एक निवडायची आणि लग्न करून इथं यायचं असा त्यांचा प्लॅन होता. कुणी मुलीची व्हिडिओ कॅसेट पाहूनही लग्न ठरवलं होतं.
एवढे दिवस अमेरिकेत राहिल्यामुळे चंद्रूला तिथल्या सुख-साधनांची अपरपाई राहिली नव्हती. आता त्याची त्याला सवय होऊन गेली होती.
उलट आता त्याला तिथं एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. त्याच्या मनात अधूनमधून लग्नाचे विचारही डोकावून जात होते. आतापर्यंत डॉलर्स-अमेरिका-ग्रीनकार्ड यातच संपूर्णपणे बुडून गेल्यामुळे आणखी कुठल्याही विचारांनी मनात प्रवेश केला नव्हता. आता त्या साऱ्या अडचणी दूर होऊन जीवन नेहमीप्रमाणे झाल्यावर लग्नाचा विचार येणं स्वाभाविकच होतं म्हणा!
लग्नाचा विचार मनात येताच त्याला न चुकता विनिताची आठवण येत होती.
त्याला विनिता मनापासून आवडली होती. त्याचं तिच्यावर प्रेम होतं असंही म्हणता येणार नाही. जेव्हा लग्नाचा विचारच मनात नव्हता, तेव्हा तो तिला पूर्णपणे विसरून गेला होता. आता लग्नाच्या विचारानंतर तिची आठवण येत होती. त्यानं तिच्यापुढे कुठल्याही प्रकारे मनातली भावना व्यक्त केली नव्हती. शिवाय त्याला ती आवडली होती- तिला त्याच्याविषयी काय वाटत होतं, हेही त्याला ठाऊक नव्हतं.
एकदा आठवण झाल्यानंतर मात्र त्याला सारखं मनात येऊ लागलं- आता विनिता कशी असेल? तिचं लग्न झालं असेल काय? तिच्या घरची परिस्थिती पाहता एवढ्यात लग्न व्हायची शक्यता कमी आहे. ती कुठं तरी नोकरी करत असेल. ही शक्यता मात्र त्याला जास्त वाटली.
त्याला वाटलं, तिला पत्र लिहून आपल्या मनातली भावना व्यक्त का करू नये? पण मनात आशंका उमटली. विनितेला पत्र बघून काय वाटेल? तिला आवडेल की नाही? पुन्हा वाटलं- काय हरकत आहे? समोरासमोर भावना व्यक्त करण्यापेक्षा पत्र लिहायचा विचार केव्हाही चांगला! शिवाय आपण मनातली भावना व्यक्तच केली नाही, तर ती तिच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी?
अखेर विचार करकरुन त्यानं विनितेच्या नावे एक पत्र लिहिलं-
विनिता यांना,
माझं हे पत्र पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल; पण तुम्ही हे वाचून गैरसमज करून घेऊ नये.
मला अमेरिकेला येऊन अडीच वर्षं झाली आहेत. तुमच्या मनात असेल आणि आणखी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर तुम्ही माझी आणखी थोडी वाट पाहाल का? मला अजूनही ग्रीनकार्ड मिळालेलं नाही. त्यासाठी आणखी काही दिवस लागतील असं दिसतं.
तुमची यासाठी तयारी असेल तर पत्रामागे दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहा. तुमचा नकार असला तरी मला त्याचा राग नाही. तुमच्या निर्णयासाठी तुम्ही स्वतंञ आहात.
घरात थोरांना नमस्कार.
इति
चंद्रू