मधु त्या खुर्चीवर बसला. गॅलरीत तेथे बसुन राहिले की तेथुन खिडकीतुन त्याला हॉल दिसत होता. तर डावीकडे त्याच्या बेडरूमच्या खिडकीतुन त्याचा डबल बेडचा पलंग. खिडकी उघडीच असते. एक पडदा असतो पण तो बाजुला सारलेला असतो. त्याची बेड दिसते तिथे बसुन. तो बुट न काढता पाय लांब करुन खुर्चीत शांतपणे बसुन राहिला. कधीतरी रागिणी झोपेतुन उठली व किचनमधे गेली हे त्याला कळले.
डोअर बेलच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने हॉलमधे खिडकीतुन डोकाऊन पाहिले. रागिणीने दार उघडले व "सोन्या मी किचनमधे आहे" असे आत आलेल्या शशांकला सांगत ती लगबगीने परत किचनमधे गेली. शशांकने बाहेरचे दार बंद केले व तो आत गेला. त्याने त्याच्या बेडरूमधे जाऊन मोयाने एफएम रेडिओ लावला.
"अरे किती मोठ्याने लावला आहेस." रागिणीचा किचनमघुन त्याला आवाज दिला.
"मी आंघोळ करतो आहे" शशांकने ओरडुन उत्तर दिले.
"तुझ्या रेडिओचा आवाज जरा हळू कर." शशांकने काहीच उत्तरही दिले नाही व
आवाजही हळ केला नाही.
तिचे किचनमधले काम आटपुन रागिणी परत बेडरुममधे आली. आरशात पाहत तिने
अंबाडा सोडला व आपले लांब केस मोकळे करुन विंचरुन सारखे करु लागली.
टॉवेल लावुन ओल्या अंगाने केस पुसत शशांक आत आला. आता रेडीओचा आवाज बंद झाला होता.
"माझा 'चिकलेट' कसा आहेस? काय झाले आज कॉलेजमधे?" रागिणीने त्याला तिच्या सेक्सी आवाजात त्याला विचारले.