मतीमंद
लेखक:- विकी
परेश व त्याच्या आई वडीलांचा म्हणजे माझ्या विनोद दादा व नलिनी वहीनीचा अपघात होवुन दहा वर्षे झाली. तो अपघात इतका भयंकर होता की त्यांच्या गाडीचा अगदी चेंदा मेंदा झाला. गाडी चालवणारा दादा व त्याच्या बाजुला बसलेली वहिनी त्या अपघातात जागीच मृत्यु पावले. मागे बसलेल्या परेशचा जीव वाचला. दोन महीने बिचारा आय सी यु मधे कोमात होता. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला पण दोन महीने कोमात राहिल्याने बिचा-याच्या मेंदूवर परीणाम झाला. ८ वर्षाचा परेश म्हणजे माझा भाचा बिचारा मतीमंद झाला.
अपघात झाल्यापासुन माझे वडील म्हणजे त्याचे आजोबा माझ्या मदतीने त्याला संभाळत होते. परेश व माझ्यात फक्त ५ वर्षाचे अंतर आहे. तरी नात्याने मी त्याची आत्या आहे. हॉस्पिटल मधुन डिस्चार्ज देताना आम्हाला डॉक्टरांनी सांगीतले होते, परेशचे शारीरिक वय वाढेल पण त्याचे मानसीक वय आठ वर्षाचेच राहील. नशीब बिचान्याचे असे म्हणुन आम्ही वस्तुस्थीती स्विकारली. तेव्हा तो फक्त आठ वर्षाचा होता. त्याला संभाळताना मी माझे सर्वस्व विसरले. परेशच माझ्या जगाचा मध्यबिंदू बनला.
माझ नाव निलीमा. मी परेशची आत्या. वडिलांनी परेशला हॉस्पीटलमधुन घरी आणले तेव्हापासुन मीच त्याची आई व वडील झाली व त्याच्याकडे पहात आहे, संभाळते आहे. पाच वर्षापुर्वी मी बी कॉम ची फायनल इयरची परीक्षा दिली व त्याच वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यु झाला व माझे कॉलेज लाईफ संपले. तेव्हापासुन आम्ही दोघेच या जगात उरलो आहोत. मी त्याच्यामध्ये इतकी गुंतली आहे की त्याच्यासाठी अजुन स्वतःच्या लग्नाचा विचार करायलाही मला वेळ नाही.
परेशच्या वडिलांनी त्याच्या भविष्यासाठी भरपुर अॅसेट्स ठेवले होते. त्याहीपेक्षा जास्त संपत्ती माझ्या नावावर माझ्या वडिलानी ठेवली आहे. त्यामुळे मला माझे पुर्ण लक्ष परेशवर ठेवता येते. मी त्याच्यासाठी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले पण परेशच्या दुर्दैवाने सर्व डॉक्टरांचे आजपर्यंत एकमत झाले आहे. केवळ चमत्कारच परेशला बरा करु शकेल असेच सर्व म्हणतात.
डॉक्टरांनी मला सांगीतल्याप्रमाणे परेशचे शरीर निसर्गधर्माप्रमाणे वाढते आहे. त्याला कोणी पाहिला तर त्याच्यात प्रथमदर्शनी काहीच दोष दिसत नाही. पाऊणेसहा फूट उंची, हँडसम चेहरा, पिळदार शरीर. त्याचे शरीर नॉर्मल आहे. व्यवस्थीत वाढतय. फक्त त्याच्या मनाची वाढ बोनसाय झाडाप्रमाणे कुंठीत होवुन ते आठ वर्षाचे कायम राहिले आहे.
आम्ही आमच्या ठाण्याच्या भल्या मोठ्या बंगल्यात दोघेच मजेत रहातो. तो एखाद्या सर्वसाधारण आठ वर्षाच्या मुलासारखा तो खोडकर आहे, हट्टी आहे. तो मस्ती करतो तेव्हा मात्र तो भारी पडतो. कारण त्याच्या अंगातला जोर मात्र १८ वर्षाच्या तरुणाचा आहे. त्यामुळे मला त्याला खुप जपावे लागते. त्याला एकटा अजिबात सोडता येत नाही. तसे त्याला मित्र राहिले नाहियेत. मीच त्याची मैत्रीण होते. आम्ही पकडा पकडी खेळतो. मी त्याला पकडले तर लहान मुलासारखा तो मला बिलगतो. कधी तो लंगडी घालतो. कधी छापा पाणी खेळतो.