भुतीणमाता
लेखक:- विकी
हजारो वर्षापुर्वी भारतवर्षात राजगड नावाचे एक राज्य होते. आजही या राज्याचे जुने अवषेश तेथे पहायला मिळतात. या अवषेशात एक सुंदर कोरीव काम असलेले एक मंदिर उठून दिसते. तेथील स्थानिक त्या अप्रतिम मंदिराचा उल्लेख भुतीणीचे मंदीर असे करतात. असे मानले जाते की तिथल्या राजाने आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ हे मंदीर बनवले. या मंदिराचे विषेश म्हणजे त्यात एकही देव वा देवीची मुर्ती नाही. मंदीराच्या आतल्या व बाहेरच्या बाजुला भिंतीवर वेगवेगळ्या स्थितीत कामलीला करणाच्या स्त्री पुरूषांची उत्कृष्ठ शिल्पे आहेत.
स्थानिक दंतकथेप्रमाणे तेथे धर्मवीर नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राणीचे नाव होते नीलिमादेवी. त्यांना राघवेन्द्र नावाचा एकच पुत्र होता. लहान वयातच राजकुमार राघवेन्द्र कठोर परिश्रम घेवुन अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. वीस वर्षाचा राजबिंडा राजकुमार सडपातळ पण मजबुत अंगकाठीचा व तेजस्वी मुद्रेचा होता. पंचकोशीत धर्मशास्त्राचा एक गाढा विद्वान म्हणून ख्यातीप्राप्त होता.
राजकुमाराला युध्दशास्त्राची फारशी आवड नव्हती. त्यामुळे नेहमीच्या दरबारातील रिवाजाप्रमाणे महाराज धर्मवीरांनी त्याला सेनापती न करता दरबारात राजपुरोहीत म्हणुन नेमले. महाराज राघवेन्द्रला खास मान देत. राज्याच्या कारभारात प्रत्येक गोष्ट राजकुमाराला विचारुन करु लागले. राजकुमार महाराजांच्या शेजारी उच्चासनावर बसुन महाराजांना राज्यकारभारत मदत करु लागला. अल्पावधीतच राजकुमार दरबारात महाराजांच्याखालोखाल महत्वाची बलशाली व्यक्ती बनली.
दिवसभर राज्याचे काम बघुन राघवेन्द्र राजमहालातील मातेच्या देवळात ध्यान लावत व चिंतन करत. महाराज धर्मवीर व इतरांसाठी त्याचे दुहेरी व्यक्तीमत्व बनले होते. दरबारात राजपुरोहीत तर घरात लाडका पुत्र. त्याच्या सुंदर मातेच्या नाजुक ओठावर मात्र प्रेमाने मारलेली 'राजा' अशी हाकच कायम असे.
राजाचे वय जेमतेम वीस असताना दुर्दैवाने अचानक त्याच्यावरचे पितृछत्र हरपले. राजाचे आपल्या पित्यावर अतिशय प्रेम होते. महाराजांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांच्या देहावासानंतर राजपुत्राने राघवेन्द्रवर राज्याचा राजा व राजपुरोहित अशा दुहेरी जबाबदारी स्विकारली. राजदरबाराच्या रोजच्या कामकाजात तो विधवा राजमाता नीलिमादेवींचे सहाय्य घेत असे. ते दोघे नेहमी आचरण व नीतीमत्ता अशा गहन विषयावर चर्चा करत. बरेचदा ही चर्चा दरबारात होई.\