प्रणयतरंग- गढवाली अंजूभाभी
लेखक : सुधाकर एम.
मी निशिकांत चाफेकर. चाळीशी मागच्या वर्षीच ओलांडली. मात्र मनाने अजूनही विशीचा. तसं शरीराने सुध्दा वयापेक्षा पाच वर्षांनी लहानच वाटतो. सारं श्रेय गेली बावीस तेवीस वर्षे केलेल्या योगाभ्यासाला आणि उत्तम कामजीवनाला. चांगल्या पगाराची नोकरी, एक सुंदर पत्नी, दोन हुशार आज्ञाधारक मुले असा सुखाचा संसार आहे. | लहानपणी मी माझ्या आई बरोबर धारावीला चाळीत राहत होतो. वडील दुबईला असायचे. माझ्या लहानपणापासूनच क्रिकेट, कबड्डी खो-खो, फुटबॉल ह्या मैदानी खेळाबरोबरच कॅरम व बुध्दिबळ हे माझे आवडते खेळ होते. त्यातही क्रिकेट हा माझा सर्वात आवडता खेळ होता. माझी फलंदाजी तर उत्तम होतीच मात्र त्याहीपेक्षा माझी खरी ओळख यष्टीरक्षणामुळे होती. एरियातल्या कुठल्याही संघाची बाहेर मॅच असेल तर विकेटकिपर म्हणून ते मलाच घेऊन गय
| मी त्यावेळी दहावीला होतो तरी रोज संध्याकाळी साडेपाच वाजता माझी मैदानावर हजेरी लागायची. मी विकेटकिपींग करत असतांना क्वचितच चेंडू मागे जायचा. गणेशची गोलंदाजी सर्वात वेगवान होती. त्याला सारे गण्या म्हणायचे. मात्र कित्येकदा वेग असूनही लाईन व लेंग्थ बिघडली की लेग साईडला त्याचा चेंडू पकडतांना मला डाव्या बाजूला झेपावं लागत असे. | रामसिंग बिश्त काही महिन्यांपुर्वीच आमच्या एरियात राहायला आला होता. मोरेमामीच्या पडवीमध्ये तो पोटभाडेकरु म्हणून तो त्याच्या बायकोबरोबर राहत होता. तो जवळच्या एका मोठ्या इमारतीमध्ये रखवालीचं काम करत होता. आधी लोक त्याला नेपाळी गोरखा समजायचे. तो उत्तर प्रदेशातल्या (आता उत्तराखंड) गढवालचा राहणारा आहे हे सांगितल्यापासून त्या कुटुंबाला सारे गढवाली म्हणू लागले होते. तरूण पोरं रामसिंगच्या बायकोचा उल्लेख गढवाली नाही तर घडवाली असा करतात हे मला नंतर कळलं. ती खूपच सुंदर, उंच आणि वर्णाने गोरीपान अगदी पिवळीशार होती. संध्याकाळी नेहमी ती तिच्या उंबरठ्यावर बसून असायची. दरवाजा अर्धा उघडा असायचा. तिचा नवरा साडेसहाला घरी आला की मग घराचा दरवाजा बंद होत असे.
आम्ही ज्या मैदानावर अॅक्टीस करत होतो ते मैदान फारसे मोठे नव्हते. एकाच मैदानात दोन - तीन ठिकाणी स्टम्प्स लागलेले असायचे. मागे फारशी जागा नव्हती. विकेटकिपरकडून बॉल सुटला की तो मागे आडव्या चाळीतल्या मोरेमामीच्या किंवा गढवालीच्या घरात जायचा. आधी घरातली भांडी पडल्याचा आवाज यायचा आणि मग पाठोपाठ मोरेमामीच्या शिव्या. बरेचदा चेंडू परत आणायला आम्ही एखाद्या लहान मुलाला पाठवत असू. मोरेमामीच्या घरातला चेंडू किमान परत तरी मिळायचा; मात्र गढवालीच्या घरातला चेंडू परत आणायला जायला कुणाची हिंमतच होत नसे. चेंडू मागणा-या मुलाला फटकारुन लावत ती सरळ दरवाजा लावून घ्यायची.
त्या दिवशी गण्याचा एक चेंडू लेग साईडला टप्पा पडून खुप उडाला व माझ्या हाताला चाटून मागे गढवालीच्या घरात गेला. तिथे अवतीभवती कुणी लहान मुलगा नव्हता. मग मीच धीर करुन तिच्या दरवाजावर गेलो. ती उंबरठयावरच उभी होती.
“सॉरी मौसी! प्लीज बॉल दोगी ....
आधी तिच्या गो-या भालप्रदेशावर दोन आठ्या पडल्या मात्र मग ह-यावर भाव बदलले. तिने मला माझं नाव विचारलं. मी माझं नाव सांगितलं. ती हसली व हातातला चेंडू पुढे करत मला म्हणाली.
‘ये लो लेकिन फिर कभी मुझे मौसी ना कहना।
मी चेंडू घेऊन मैदानात फेकला. इतक्या सहजगत्या चेंडू परत मिळाला म्हणून सारेच खुश झाले. त्यानंतर मात्र चार पाच दिवस मी चेंडू मागे जाऊ दिला नव्हता, मात्र गण्याच्या गोलंदाजीवर तशी हमी देणे कठीण होतं. खुप वेगाने गोलंदाजी करतांना त्याचा लाईन व लेग्थवर कंट्रोल राहत नसे. मग कित्येकदा त्याचा वाईड चेंडू अडविण्यासाठी मला डावीकडे झेपावं लागत असे. असा चेंडू पकडला की सहज नगर मागे जायची. ती गढवाली गालात हसायची. मग एरवी सुध्दा अधूनमधून मी डाव्याबाजूला मागे पाहू लागलो. तेव्हा प्रत्येक वेळी नजरानजर होताच ती गालात हसू लागली. इतकी सुंदर स्त्री मला स्माईल देते ह्या गोष्टीने मी नकळत हुरळून जाऊन मग जरा अधिकच स्टाईलीश किपींग करत असे.
मग एके दिवशी मी मैदानावर गेलो तेव्हा खेळ बंद पडला होता. मी चौकशी केली तेव्हा गण्याने मला सारी हकीगत ऐकवली. चेंडू गढवालीला लागला होता व ती तो घरात घेऊन गेली होती. दरवाजा तिने बंद केला होता. एक लहान मुलगा दरवाजावर जाऊन आला होता, परंतु तिने दरवाजा उघडला नव्हता. मला बघून सगळ्यांना हुरुप आला होता व मी तो चेंडू परत आणावा अशी त्यांची इच्छा होती.