, स्वतःचे कपडे घातले. थोड्या वेळात
"सलील मी संध्याकाळी भेटते रे " असे सांगत ती निघुन गेली. ती जाताना सलील बर्मुडा वर होता त्याने तिला टाटा केला. त्याने त्या वेटर बरोबर जेवणाची ऑर्डर दिलि आणि दार बंद करून बेड वर बसला. संध्याकाळी रीतसर सगळ्या पॅसेंजर्स ना बोलावणे आले कि फ्लाईट तयार आहे आणि सगळ्याना घेऊन जाण्यास बस येणार आहे. सलील तयार होऊन बसला होता बस आलि आणि सर्वजण बाहेर पडले हवा मस्त होती आणि हॉटेलच्या वातावरणा पेक्षा त्या सर्वाना बाहेरचे मोकळे वातावरण बरे वाटले. बस ने ते सर्वजण विमानतळावर गेले बार्सिलोना एक विस्तीर्ण विमानतळ आहे तिथली प्रत्येक व्यवस्था अगदी उत्तम आणि अत्याधुनिक आहे नुकतेच ओलंपिक गेमस झाले असल्याने सगळे विमानतळ लक्ख होते. सेक्युरिटि गेट मधे गेल्यावर त्याचे डोळे अगोदर सुकन्याला शोधायला लागले. ती त्यांच्या बरोबरच सेक्युरिटि मधून पास झालि आणि त्याच्याकडे येऊन म्हणालि
" जेवलास कारे सलील "
" जेवलो पण पोट नाही भरलं "
" मग आता काय म्हणत आहे तुझे पोट"
तेवढ्यात कॉल आला आणि ते गेट मधुन चेक होऊन बाहेर पडले. सरळ विमानात जाऊन बसले इतर सर्व पॅसेंजर्सना देखील त्याच क्रमाने बसायला मदत करत सुकन्या आपल्या सीटवर जाऊन बसली रीतसर अॅनाउंसमेंट झाली आणि बरोबर ३० मिनिटानी विमानाने आकाशात झेप घेतली. आता अॅमस्टरडॅमच्या अवाढव्य विमान तळावर ते अजून ३ तासाने उतरणार होते. बरोबर एक तासाने जेव्हा जेवणाची वेळ झालि तेव्हा सुकन्याने सलीलला येउन विचारले ।
" सलु तु माझ्या बरोबर जेवणार का भूक लागली मझ्या शोन्याला...? "
" नाही अजून लागली मी तुझ्या हातानी जेवणार मला तुच भरव."
" मग थांब माझे झाले सगळयाना देऊन कि मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी काढून
ठेवीन मग आपण बसु जेवायला. चालेलना सोन्या? " त्याला चालू झालेली स्पेशल ट्रीटमेंट पाहून त्याच्या बाजुच्या सीटवर असलेला पॅसेंजर म्हणाला
" Dude you have good caretaker, is she your first love...?"
"Yes any objection... ?"
"Not at all go ahead pal"
" Thank you"
तो उठून तिच्या केबिन मधे जाऊन बसला उगीच कुणाची दृष्ट लागायला नको. एवढ्यात तिचे झालेच होते तिने दोन थाळया आणुन ठेवल्या होत्या. वेजच पण छान होते जेवण तिने कोणाच्या न कळत त्याला आपणहून दोन घास आपल्या ओठांनी भरवले. हात धुवून तो तिच्या केबिन मधून उठून आपल्या सीट वर येऊन बसला.
शेजारचा सोटया आता शांत झोपला होता. सलीलला देखिल आता झोप येत होती. कारण त्याला आता अॅम्स्टरडॅमचे वेध लागले होते म्हणुन झोपायलाच हवे होते. तो जागा झाला तेव्हा सुकन्या त्याला उठवत होति
" सलु अरे उठ आपल्याला आता उतरायच नं सोन्या."
तिने त्याचे केबिन लगेज अगोदरच काढुन तयार ठेवले होते. एक बरं होतं कि अजु बाजुला कुणालाच त्यांचे बोलणे कळत नव्हते. ती पुढे म्हणालि.
" अपण खुप मजा करायची नं माझ्या खोलीवर येणार नं उठ राजा ."