/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

Marathi thriller-खुनी कोण आहे

User avatar
Rohit Kapoor
Pro Member
Posts: 2821
Joined: Mon Mar 16, 2015 1:46 pm

Marathi thriller-खुनी कोण आहे

Post by Rohit Kapoor »

Marathi thriller-खुनी कोण आहे

फोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला.

" Hello !! ",

"Hello… अभी…" तिने महेशचा आवाज ओळखला. " अरे महेश, अभी झोपला आहे अजून… ",

"उठवं ना त्याला जरा …. urgent … ",

"हो… हो , थांब." तिने अभीला जागं केलं.

अभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला.

" Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.",

"urgent होता म्हणून लावला ना call…",

"मग मोबाईल वर लावायचा ना, इथे घरच्या फोनवर कशाला लावलास. मम्मी-पप्पा पण जागे झाले असतील आता… ",

"अरे माणसा…. मोबाईल चेक कर जरा… बंद आहे म्हणून लावला इथे." ,

"हो का… बघतो नंतर. काय काम होतं urgent ",

"हा…. लवकर पोहोचं, पोलिस स्टेशनमध्ये …. एक वेगळीच केस आली आहे." ,

"OK… ठीक आहे, येतो पटकन." अभिषेकने फोन ठेवला आणि आंघोळीसाठी गेला.

२० मिनिटात inspector अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला. महेश नुकताच पोहोचला होता.

"काय रे, सुट्टीच्या दिवशी तरी झोपायला द्या माणसाला… "अभी, डॉक्टर महेशला बोलला.

" काय करणार यार…. मला तर ५.३० ला call आलेला सरांचा…. त्यामुळे तू माझ्यापेक्षा अर्धा तास जास्त झोपलास… तक्रार मी केली पाहिजे मग." अभी हसायला लागला त्यावर.

"अरे, पण सर कुठे आहेत… फसवलं नाही ना त्यांनी आपल्याला." ,

"येतील रे." दोघे सरांची वाट बघू लागले. पोलिस स्टेशन मध्ये हळूहळू बाकीचे कर्मचारी येऊ लागलेले. ७ वाजता त्यांचे मोठे सर आले, तसे दोघे उभे राहिले.

"हम्म… " सरांनी त्यांच्याकडे पाहिलं." चला… माझ्या केबिनमध्ये बसू… ","एस सर… " दोघे त्यांच्या मागून आत गेले. inspector अभिषेक आणि forensic expert असलेला त्याचा मित्र डॉक्टर महेश, यांची जोडी तशी फ़ेमसच होती. कितीतरी कठीण केसेस त्यांनी मिळून सोडवल्या होत्या. फक्त मुंबईच नाही तर बाहेरच्या केसेस सुद्धा त्यांच्याकडे येत होत्या. तशीच एक केस आता आलेली होती.

" अभी आणि महेश, तुम्हाला जरा त्रास दिला…. सुट्टीच्या दिवशी, तेही एवढ्या लवकर बोलावलं… झोपमोड झाली असेल ना… ",

"असं काही नाही सर… बोला तुम्ही, कोणती केस आहे… "महेश बोलला.

" तुम्हा दोघांना नाशिकला निघायचे आहे. ",

"कधी ?",

"आत्ता, लगेच…. ",

"कोणती केस आहे, एवढी urgent… " ,

"गेल्या आठवड्यात म्हणजेच ७ दिवसात ८ खून झाले आहेत नाशिकला. तिथेच जायचे आहे तुम्हाला.… ",

"पण ती तर तिकडची केस आहे ना… मग आम्ही ?",

"तुम्हा दोघांचं खूप नावं झालं आहे सध्या…. शिवाय तिथल्या स्थानिक पोलिसांना ,खून कोणी केला,याचा तपास करण्यात अपयश आले आहे. मिडीयाचा दबाव वाढत आहे. त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून हि केस मुंबई पोलिसांकडे आली आहे. त्यात मला कमिशनर सरांनी तुमची नावं सुचवली.…. म्हणून, तिथे तुम्हाला inspector म्हात्रे मदत करतील. तिथे तेच केस handle करत आहेत. तर, तुम्ही आजच निघा…. and best of luck. ","thanks sir" म्हणत दोघे बाहेर आले आणि निघायची तयारी करण्यासाठी घरी गेले.

तयारी करून दोघे निघाले. नाशिकला पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. दोघांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केलेली होती. थोडावेळ आराम करून दोघांनी कामाला सुरुवात केली. दोघांनी तिथल्या पोलिस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. तसे दोघे पोहोचले. बघतो तर काय !! inspector म्हात्रे जागेवर नाहीत.

" हे म्हात्रे कूठे गेले ? " महेशने एका हवालदाराला विचारलं.

" ते ना… म्हात्रे सर आत्ताच घरी गेले.",

"घरी ? आम्ही येणार ते माहित नाही का त्यांना… ",

"नाही सर… कोणालाच माहिती नाही, शिवाय ते २ दिवस घरी गेलेच नव्हते म्हणून आम्हीच त्यांना आराम करण्यासाठी घरी जायला सांगितले.",

"ठीक आहे… उद्या येतील ना ते… ",

"हो सर… ",

"नक्की ना… नाहीतर त्यांना फोन करून सांगा… आम्ही येतो उद्या सकाळी. " अभी बोलला आणि दोघेही हॉटेलवर आले.

सकाळी पुन्हा ते पोलिस स्टेशनला आले, तेव्हा मात्र inspector म्हात्रे हजर होते. " Welcome sir " म्हणत inspector म्हात्रे पुढे आले.

"sorry सर, काल जरा लवकर गेलेलो घरी… आणि मला सांगितलंही नाही कि तुम्ही येणार ते." ,

"हा… राहू दे… असं काही नाही, कळलं मला, तुम्ही २ दिवस घरी गेला नव्हता म्हणून…किती काम असते ते माहित आहे मला. त्यामुळे आता तुम्ही tension घेऊ नका… आता आम्ही आलो आहोत ना, तुमचं स्ट्रेस कमी होईल. " अभी बोलला तसे तिघेही हसले.

" चला, मग कामाला लागू आपण… " महेश बोलला. तिघेही एका टेबलवर जाऊन बसले.

" तुम्ही, तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी." महेश बोलला.

" ते सांगतो मी, पण आधी एक प्रश्न आहे… विचारू का… " inspector म्हात्रेनी विचारलं.

" हा विचारा… " ,

"तुम्हा दोघांचे खूप नावं ऐकलं आहे मी… त्यात तुमच्या विषयी सुद्धा ऐकलं आहे. " म्हात्रे ,महेशकडे पाहत म्हणाले. "तर तुम्ही forensic expert आहात ना… तरी तुम्ही या तपासात अभिषेक सरांबरोबर असतात ना… म्हणजे मला बोलायचे आहे कि इतर डॉक्टर फक्त त्याचं काम करत असतात. ते कधी तपासात भाग घेत नाहीत. मग तुम्ही ? " महेश हसला त्यावर.

"त्याचं काय आहे ना… मला डॉक्टर व्हायचे नव्हते. मी तुमच्याच ड्रेसमध्ये दिसलो असतो. फक्त माझी उंची कमी पडली ना जरा… नाहीतर मी पण असाच ड्रेस घातला असता, उंचीमुळे निवड झाली नाही माझी. आणि हा अभी, माझाच मित्र… तो बोलला, तू forensic expert होऊ शकतोस. त्याचं ऐकून डॉक्टर झालो आणि पोलिस department जॉईन केलं.… एक बर आहे… हा घेऊन जातो मला प्रत्येक केसला म्हणून… नाहीतर मला कोणी विचारलं असतं." अभी हसायला लागला.

"Thanks sir…. चला, मग सुरु करू का… ",

"हो.",

"एकंदर ८ खून झाले.",

"हो, ते माहित आहे, पण एक प्रश्न आहे." अभी बोलला.

" कोणता प्रश्न सर ?",

"तुम्ही एकटेच कसे या केसेसला handle करत आहात… म्हणजे अजून कोणीतरी हवं ना सोबत तुमच्या, किती धावपळ झाली असेल तुमची" अभी बोलला.

" हो ना सर, आमची टीम आहे सोबत, तरीसुद्धा इतक्या झटपट झालं ना सगळं… काही सुचत नव्हतं. पहिल्या दिवशी दोन खून झाले…. त्यांचा तपास सुरु केला तर दुसऱ्या दिवशी अजून एक खून झाला. त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा…. कूठे लक्ष देऊ तेच कळत नव्हतं. माझी टीम तरी काय करणार ना… त्यात ते media वाले… त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही… ",

"हो… media तसंच समजते… " महेश मधेच बोलला.

" ठीक आहे. आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा… बाकीच आम्ही बघतो." अभी बोलला.

" असं करूया… तुम्ही सगळी माहिती… जेवढी तुम्ही जमवली आहेत तेवढी…. ती आता मला द्या…. महेश, तू postmortem आणि बाकीचे रिपोर्ट चेक कर… " ,

" ठीक आहे, मी निघतो मग." महेश म्हणाला.

" पाटील… महेश सरांना आपल्या forensic expert team कडे घेऊन जा. " म्हात्रे म्हणाले. महेश त्या हवालदारासोबत निघून गेला.

"OK, आता तुम्ही आणि तुमची टीम मला लागेल. कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये… ",

" मी , दोन sub-inspector आणि सहा हवालदार आहेत, अजून पाहिजे तर तशी व्यवस्था करू शकतो मी. ",

" चालेल ठीक आहे… ते sub-inspector कूठे आहेत… एकही दिसत नाही. " अभी आजूबाजूला पाहत म्हणाला.

" एक sub-inspector…सावंत, ते परवा झालेल्या खूनाच्या स्पॉट वर आहेत. आणि दुसरे , sub-inspector कदम, ते आज सुट्टीवर आहेत… ते सुद्धा खूप दिवस धावपळ करत आहेत. म्हणून मीच सुट्टी दिली त्यांना… ",

"ठीक आहे… उद्या बोलावून घ्या त्यांना. मी आज सगळ्या केसेसची study करतो. महेश ते रिपोर्ट घेऊन येईल. तुम्ही उद्याची तयारी करा, उद्या सकाळी आपण पहिल्या स्पॉटवर जाऊ… ",

" OK सर… " आणि सगळे पेपर्स, फोटो घेऊन अभी हॉटेलवर आला.

थोड्यावेळाने महेश , बाकीचे रिपोर्ट घेऊन रूमवर आला. दोघे ते पेपर्स , माहिती वाचू लागले. बरेच फोटो काढले होते. त्यावरून एक नजर टाकली. खूप वेळाने महेश बोलला.

" या सगळ्यांमध्ये एक नातं होतं, माहिती आहे का तुला ? ",

" नाही, म्हात्रे तसं काही बोलला नाही.… विसरला असेल, may be… ",

" असेल किंवा त्याला माहित नसेल… ",

"सांग काय ते… ? ",

" हे आठ जण, नातेवाईक होते…",

"म्हणजे… ",

" एक संपूर्ण कुटुंब आहे ते… ",

" सविस्तर सांग जरा महेश… " ,

" हे सगळे रिपोर्ट्स बघ… आणि म्हात्रेने सुद्धा ती माहिती जमवली असेल बघ. त्यांच्या नावावरून सुद्धा कळेल तुला… पवार कुटुंब आहे ते… ",

" हो, बरोबर बोलतोस तू… " अभी ते पेपर्स बघत म्हणाला. " अजून काही माहिती मिळाली का तुला… त्या postmortem रिपोर्ट्स वरून… ",

"नाही रे… अजून पूर्ण वाचले नाहीत मी… वाचून सांगतो तुला… " महेश म्हणाला.

" तरी काय अंदाज आहे… " ,

" अंदाज म्हणजे…एकाच कुटुंबाचे आहेत सगळे… असेल काहीतरी… कोणाला बदला वगैरे घेयाचा असेल… नाहीतर कोण कशाला मारेल ना… ",

" हम्म… " अभी विचार करत म्हणाला. " ठीक आहे मग, उद्या सकाळी पहिल्या ठिकाणी जाऊ… तिथे अजून काही माहिती मिळू शकते. तू पण बघ जरा, त्या रिपोर्ट्समध्ये काय मिळते का… " महेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. अभी रात्री उशिरापर्यंत ते केस पेपर्स वाचत होता.

सकाळी ठरल्याप्रमाणे, महेश आणि अभी पोलिस स्टेशनमध्ये आले. अभीने सांगितल्याप्रमाणे, सगळी टीम तयार होती. सगळे हजर होते, फक्त sub-inspector कदम सोडून. अभीच्या लक्षात आलं ते. अभीने सगळ्यांवर एक नजर टाकली. " म्हात्रे… आता पहिल्या स्पॉट वर जाऊ… चला. " तसे सगळे निघाले. दोन गाड्यांमध्ये बसले सगळे. गाडी सुरु करणार इतक्यात sub-inspector कदम धावत धावत आले. " Sorry… Sorry sir, उशीर झाला." अभीने त्यांच्याकडे एकदा पाहिलं. " लवकर आलात तुम्ही… चला, बसा पटकन गाडीत." अभी जरा रागातच बोलला. कदम गाडीत बसले आणि दोन्ही गाड्या निघाल्या पहिल्या खुनाच्या जागी.

ती जागा सील केलेली होती. एका मोठ्या सोसायटीमध्ये ती रूम होती. अभी सगळीकडे बघत होता. " अभी, मी बाहेर चौकशी करतो… शेजारी, watchman कडे… " महेश म्हणाला. अभीने होकारार्थी मान हलवली. आणि म्हात्रेला हाक मारली," म्हात्रे… या पुढे… " तसे inspector म्हात्रे पुढे आले.

" एस सर ? ",

"काय काय सापडलं इथे तुम्हाला… ",

" हा सर… २ मृतदेह… Mr. and Ms. पवार, दोघांचा कोणत्यातरी धारदार हत्याराने खून झाला.",

"कोणतं हत्यार ? ",

" sorry सर, सापडलं नाही ते… " ,

"हम्म…. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल… पुढे सांगा. ",

" फिंगर प्रिंट्स मिळाले… ",

"मिळाले ? ",

" हा म्हणजे… ५ जणांचे फिंगर प्रिंट्स आहेत. त्यातले २ या दोघांचे आहेत, पवारांचे… उरलेल्या ३ पैकी एक आरोपीचा असू शकतो.",

" किती वाजता झालं हे सगळं… ",

"साधारण रात्री १० ते १०.३० दरम्यान…",

"आणि तुम्हाला कसं कळलं ? " ,

" सोसायटीच्या सेक्रेटरीने फोन केला होता.",

" बोलवा जरा त्याला. " एका हवालदाराला सेक्रेटरीला बोलवायला पाठवले.

अभी त्या रुमच्या बाल्कनीत आला. पाचवा मजला…. खाली वाकून पाहिलं त्याने. महेश होता खाली watchman बरोबर बोलत. आजूबाजूला नजर फिरवली. हम्म्म… उंची तर आहे या बाल्कनीपर्यंत. शिवाय इथपर्यंत चढून येणं सोप्पं नाही. अभी विचार करत होता. थोड्यावेळाने सेक्रेटरी आला.

" नमस्कार सर… " , त्याने बाहेरूनच नमस्कार केला.

" या आत या. " अभीने बाल्कनीत बोलावून घेतलं त्यांना. " मी शेजाऱ्यांशी चौकशी केली… ते म्हणतात कि कोणताच आवाज झाला नाही… या रूम काय sound proof आहेत का… ",

"तसं काही नाही. तरीदेखील त्यांना कसलाच आवाज आला नाही, का ते मलाही कळत नाही… ",

"ठीक आहे… बरं, तुम्हाला कसं कळलं हे… ",

"कचरा गोळा करणारा रघु आहे ना… त्याला कळलं पहिलं हे, त्यानंतर त्याने मला येऊन सांगितलं हे… ",

"हम्म्म… तुम्ही जाऊ नका… बाहेरच थांबा, आणि त्या रघुला बोलावून घ्या… " रघु आला थोड्यावेळाने. तोपर्यंत महेश आलेला वर.

" हा रघु… काय झालं ते सांग… न घाबरता… ",

" हा सर.… त्या दिवशी मी कचरा गोळा करत करत इकडे आलो. यांचा कचऱ्याचा डब्बा आधीच बाहेर ठेवलेला असतो.… दोघेच जण… कचरा कमीच असतो. त्यादिवशी डब्बा दिसला नाही बाहेर म्हणून दारावरची बेल वाजवली मी.… तीन-चारदा वाजवली…. दरवाजा वाजवला तर उघडाच होता.… तेव्हा जरा विचित्र वाटलं…. सेक्रेटरी साहेबाना सांगितलं लगेच… तेव्हा आत गेलो आम्ही तर या दोघांना…. " रघु थांबला बोलता बोलता.

" ह्म्म्म… कळलं पुढे काय ते. तू जा बाहेर… " रघु बाहेर गेला आणि अभी, महेश बोलू लागले.

" काय माहिती मिळाली तुला महेश… " अभीने विचारलं.

" शेजारी बोलतात, आवाज आला नाही… ते जरा बघावं लागेल… पुन्हा सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत… त्यातून कोण कोण इथे आलेलं ते कळेल… " महेशने माहिती पुरवली. तेवढ्यात खालून फोन आला. " हा, येतो खाली… " अभी म्हणाला आणि महेशला घेऊन खाली निघाला. " खुनाच्या दिवशी, रात्री… ज्यांची duty होती, त्यांना बोलावलं होतं मी. तो आला आहे खाली." अभीने महेशला सांगितलं.

"सलाम साहेब. " ,

" हा, ठीक आहे.,…. त्यादिवशी रात्री कोण आलेलं, आहे का लक्षात… ",

"हो साहेब… आम्ही ते लिहून ठेवतो ना…. कोण आलेलं , कोणाकडे आलेलं… ",

" जरा बघून सांगता का मला.",

"हो साहेब… " त्याने ते रजिस्टर उघडलं.

" रात्री १० नंतर कोण आलेलं पवारांकडे… ",

"१० नंतर पवारांकडे काय… या सोसायटी मध्येच entry नाही कोणाला… " अभी महेशकडे बघू लागला.

" हा पण, ९ वाजता एक जण आलेला, पवारांकडे…. " अभी चमकला.

"कोण… नावं वगैरे… " ,

" मंदार देशपांडे … तोच आलेला ९ वाजता… ",

"त्याला बघितलंसं का नीट तू… ओळखशील त्याला… ",

"हो साहेब… चांगलाच लक्षात राहिला तो… ",

" तो कसा ",

" त्याने गेट समोरच गाडी पार्क केलेली ना साहेब… म्हणून जरा आवाज चढला होता… ",

" का… गाडी आत पार्क करू शकत नाही का… ",

" आहे ना साहेब, पण गेट समोर कोणी गाडी लावते का सांगा मला… मग मला बाकीच्या लोकांचा ओरडा मिळाला असता… म्हणून ओरडलो त्याला… ",

"मग पुढे… ",

" पुढे काय… गाडी मागे घेऊन गेला कूठेतरी आणि आला परत. ",

" OK… थेट वरती पवारांकडे गेला का…",

"हो…. आणि १०.१५ ला निघून गेला.",

" छान माहिती दिलीत तुम्ही… आता, एक काम करा…. त्याचं वर्णन सांगा, त्याचं चित्र काढता येईल मग… आणि त्या गाडीचे सुद्धा वर्णन सांगा. "

"सांगतो… पण ती गाडी तर तिथे बाहेरच उभी आहे , रस्त्यावर… " ,

"काय ?", अभीला आच्शर्य वाटलं. तसे ते सगळे गाडीजवळ आले.

" ही कार आहे का ",

"हो साहेब हीच… ",

"ठीक आहे… तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जा, त्याचं स्केच बनवा… आणि म्हात्रे, या गाडीची तपासणी करा… फिंगर प्रिंट्स वगैरे मिळतील ते बघा… आणि गाडी कोणच्या नावावर आहे ते चेक करा." म्हात्रे लगेच कामाला लागले.

आणखी माहिती गोळा करून महेश, अभी हॉटेलच्या रूम वर आले. तोपर्यंत "मंदार देशपांडे" चे स्केच तयार झालेलं होतं. CCTV चे video म्हात्रे घेऊन येणार होता. महेश पुन्हा postmortem चे रिपोर्ट्स वाचत बसला होता.

" शेजाऱ्यांना आवाज कसा गेला नाही ते कळलं मला." महेश म्हणाला.

" ते जागेच नसतील त्यांना मारलं तेव्हा… ",

"म्हणजे ? ",

"postmortem मध्ये आहे…. आठही dead body मध्ये, गुंगीचे औषध होतं, त्यामुळे आरोपीने त्यांना आधी बेशुद्ध केलं , त्यानंतर खून केला… " महेश म्हणाला.

" पण एक गोष्ट… गाडी ठेवून कसा जाऊ शकतो तो… ",

" may be…. घाईघाईत गाडी टाकून पळून गेला असेल तो… " ,

"असेलही… पण याला शोधायचं कूठे आता… " अभी स्केच बघत म्हणाला. इतक्यात म्हात्रे आले.

" good evening sir….",

"या , या म्हात्रे… बसा. " म्हात्रे शेजारी बसले.

"सर, ते video भेटले आहेत, चालू करू का… ",

" हो, करूया… पण आधी सांगा… ती गाडी, गेला आठवडाभर तिथेच होती…. तुम्हाला एकदाही वाटलं नाही कि ती कोणाची आहे ते चेक करू… ",

"सर वेळच नाही मिळाला आम्हाला… कारण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरा खून झालेला ना… मग कदमांना इथे ठेऊन, मी नवीन स्पॉट वर गेलेलो.",

"ठीक आहे. तो video चालू करा." ते तिघेही तो video काळजीपूर्वक बघू लागले.

"pause करा म्हात्रे जरा… " महेशने स्केच समोर धरलं. "चेहरा एकदम clear दिसतो… स्केचशी मिळता-जुळता… उंची साधारण ६ फुट किंवा जरा जास्त… अंगाने धडधाकट… दणकट शरीरयष्टी, साधारण पोशाख आणि हातात एक ब्रीफकेस… अगदी बरोबर वर्णन केलं. " अभीने सगळं ऐकून घेतलं. " म्हात्रे…चालू करा video, बघू किती वाजता तो बाहेर गेला ते." तेही बरोबर होतं watchman च. रात्री १०.१५ वाजता तो सोसायटी बाहेर गेला.

video संपला. " म्हात्रे… गाडीबद्दल काय माहिती ? ",

" हो सर… गाडी rent वर घेतलेली… त्यांचा पत्ता मिळाला आम्हाला…. गाडी,"मंदार देशपांडे" यांच्या नावावर घेतली होती. गाडी rent वर घेताना दिलेला पत्ता आणि फोन नंबर खोटा आहे. तेही कळलं आम्हाला. गाडीत काही फिंगर प्रिंट्स मिळाले. त्यातला एक , पवारांच्या घरी मिळालेल्या फिंगर प्रिंट्स बरोबर जुळतात. ",

"म्हणजे ते त्या आरोपीचे असतील.",सगळेच थोडावेळ शांत बसले.

" OK. माझ्या डोक्यात काही आलं आहे." अभी म्हणाला.

" बोल", महेश.

" म्हात्रे… त्या सावंत आणि कदम, दोघांना आता बोलावून घ्या, लगेच. ","एस सर" म्हात्रे त्यांना call लावायला निघून गेले. " मला वाटते ना महेश… तो आरोपी, हा त्यांच्या ओळखीचा असणार." अभी म्हणाला. "असं का ?",

" बघ ना, तो सोसायटीमध्ये ९ वाजता आला. आणि १०.१५ ला बाहेर गेला. सव्वा तास…. कोणी अनोळखी व्यक्ती सव्वा तास कोणाच्या घरात बसून राहू शकत नाही ना. शिवाय, त्याला खूनच करायचा होता तर ते ५ मिनिटांचे काम… जास्तीत जास्त १० मिनिटे पकडू… सव्वा तास कशाला बसून राहील त्यांच्याकडे." अभी म्हणाला." point आहे तुझ्या बोलण्यात." तोपर्यंत सावंत आणि कदम आले.

" हा कदम, तुम्ही एक काम करा… उरलेल्या ६ खुनाच्या ठिकाणी… त्या खुनाच्या वेळेत कोण कोण आलेले… त्यांचे eyewitness असतील तर, त्या व्यक्तीला कोणी पाहिलं असेल तर त्याचे स्केच तयार करा. इकडे कार सापडली तसं काही मिळते का ते बघा…. CCTV video असतील तर तेही गोळा करा.… कळलं ना तुम्हाला, काय काय करायचे ते." कदमांनी मान डोलावली.

" सावंत… तुम्ही, या सगळ्या कुटुंबाची माहिती काढा. त्यांचे शेवटचे call कोणाला गेलेले… कोणाचे call आलेले… त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का अजून ते चेक करा…. असतील तर त्यांचेही फिंगर प्रिंट्स गोळा करा, पुढे उपयोगी पडतील. जमल तर फोटोसुद्धा काढून ठेवा.… जेवढी माहिती गोळा करता येईल तुम्हा दोघांना, तेवढी मिळवा.… आताच निघा दोघेही… हो आणि उद्या…. आपण दुसऱ्या खुनाच्या ठिकाणी भेटूया, सकाळी, ठीक १० वाजता." अभी कदमांकडे बघत बोलला. " तुम्ही कदम, वेळेत या जरा… निघा आता सगळ्यांनी… चांगला आराम करा, Fresh mind ने या उद्या. " सगळे आपापल्या घरी निघून गेले. महेश त्याच्या रूम मध्ये गेला. अभी ते पेपर्स वाचत बसला.

दुसऱ्या दिवशी, सकाळीच अभी आणि महेश, म्हात्रेला घेऊन दुसऱ्या स्पॉटवर पोहोचले. म्हात्रेनी माहिती सांगायला सुरुवात केली.

" सुरेश पवार… हा त्या दोघांचा मुलगा…. ",

"OK , OK…. आई-वडिलांनंतर मुलाला मारलं.… पुढे.",

"सकाळी साधारण ११.३० वाजता मला या खुनाची माहिती मिळाली. तसा लगेच पोहोचलो मी. खून साधारण सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान झाला.… या हॉटेलच्या मालकाने मला call केलेला." ,

" आणि फिंगर प्रिंट्स वगैरे… " ,

" हो सर, मिळाले आहेत.",

"मग ते काल सापडलेल्या sample बरोबर match होतात का ते बघा. " अभी आजूबाजूला बघू लागला.

" म्हात्रे… ते कदम आले नाहीत का" अभीने विचारलं…

" आहेत ना सर… तो तर सकाळी ९ वाजताच हजर झालेला इथे. खाली security सोबत आहे तो.",

"ठीक आहे.…. महेश, तू बघ जरा इथे काय मिळते ते, मी खाली जाऊन येतो."

अभी खाली security guard जवळ आला. " त्या दिवशी कोण होतं इथे…", अभीने विचारलं.

" हा सर, मी होतो… सकाळची duty होती माझी.",

"खून झालेल्या दिवशी …. सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान कोण कोण आलेलं ते सांगू शकता का तुम्ही… "

" ते नाही सांगू शकत सर… कारण हे हॉटेल आहे ना… सकाळपासून लोकं येत असतात. एकच चेहरा सांगू शकत नाही असा… " … तेही बरोबर आहे याचं… एवढ्या लोकांचे चेहरे तो तरी कसा लक्षात ठेवणार… अभी मनातल्या मनात बोलला.

" आमच्या CCTV मध्ये कोणी आलं असेल तर ते कळेल तुम्हाला सर आणि reception वर त्यांची entry असेल, तिथे नावं द्यावं लागते. ",

" तुमचं काय एवढंच काम आहे का… गेट उघडा आणि बंद करा… " अभी जरा नाराजीच्या स्वरात बोलला. "नाही सर, इकडे येणाऱ्या गाड्यांची पार्किंग करून घेतो ना आम्ही. " तेच तर पाहिजे होतं ना अभीला.

" हा, मग… अशी एखादी गाडी… जी ८.३० ते ९.३० च्या सुमारास आलेली. तिचा नंबर वगैरे."

" हा लिस्ट बघून सांगतो." watchman लिस्ट बघू लागला. " हा सर, ४ गाड्या आलेल्या… ह्या बघा… त्यांचे नंबर आणि कोण गाडी घेऊन आलेलं त्यांची नावं " अभीने ते नंबर आणि नावं चेक केली. त्यात एक नावं होतं,"मंदार देशपांडे" …

" कदम… हा गाडीचा नंबर नीट लिहून घ्या आणि कोणाच्या नावावर आहे ते लगेच चेक करा… "

" हो सर… " कदमांनी नंबर लिहून घेतला आणि तडक निघाले.

अभी आता हॉटेलच्या reception वर आला. " हा म्हात्रे… जरा manager ला बोलवा, मी इकडेच आहे reception वर. त्याला घेऊन या इथे." म्हात्रे निघून गेले." हा तर… तुम्ही होतात इथे, त्यादिवशी… नावं काय तुमचं… " अभीने reception वर असेलेल्या मुलीला विचारलं.

" माझं नावं संयुक्ता… मीच होते त्या दिवशी इथे",

" छान… त्या दिवशी कोणी 'मंदार देशपांडे' नावाचा व्यक्ती आलेला… अशी नोंद असेल ना… ",

" हो आहे सर… " ,

" good… त्याचा चेहरा लक्षात आहे का तुमच्या…",

"हो ना… चांगलाच लक्षात राहिला… ",

"आणि तो कसा काय ? म्हणजे इतकी लोकं येतात इथे… त्याचाच चेहरा कसा आठवतो तुला… " ,

"भांडण… , मी सकाळी ८.३० ला येते इथे. त्या दिवशी सुद्धा वेळेत आली आणि तोच पहिला आलेला… त्या पवार सरांकडे आलेला, एवढ्या सकाळी-सकाळी …. झोपेची वेळ… त्यात हा माणूस मागे लागलेला… त्यांना फोन लावून द्या… urgent भेटायचे आहे… सारखं सारखं तेच… मी त्यांना बोलले कि ते झोपले आहेत, काही मेसेज असेल तर मला सांगा, मी नंतर सांगते. तरी तेच… शेवटी manager सरांनी त्याची समजूत काढली.",

" OK OK, तुम्ही थोड्यावेळाने पोलिस स्टेशनला या… स्केच काढू आपण त्याचं… " manager आले.

" काही प्रश्न नाही विचारत. फक्त त्यादिवशी काय झालं ते सांगा. यांनी बरीच माहिती सांगितली आहे…. मंदार देशपांडे च काय झालं ते सांगा.",

"त्यांना पवार सरांना भेटायचे होते… त्यामुळे हीच आणि त्याच भांडण झालं होतं. पवार सर, आमच्या हॉटेलमध्ये वरचेवर येत असतात राहायला.",

"त्याचं घर आहे ना… मग इथे… " ,

" त्यांच्या मीटिंग असल्या कि ते एक दिवस आधी इथे येऊन राहतात. आमच्या हॉटेलच्या conference room मधेच त्यांच्या मीटिंग चालू असतात. साधारण ५-६ वर्ष झाली असतील. त्यांना ओळखतो मी. त्यामुळे त्यांच्या सवयी माहिती आहेत इथल्या सगळ्यांना.…सकाळी ९.३० ला जागे होतात ते… आणि हा मनुष्य, ८.३० ला आला होता. "

"मग पुढे… ",

"मला वाटलं काही urgent काम असेल म्हणून मी पवार सरांना फोन लावला… ते सुद्धा वैतागले होते. पण काही बिझनेसचे काम असेल म्हणून त्यांनी त्याला रुममध्ये पाठवायला सांगितलं.",

"हम्म… मग तो किती वाजता गेला ?",

" सकाळी ९.२० ची वेळ आहे सर, या लिस्ट मध्ये." अभी विचार करू लागला.

"CCTV चालू आहेत ना… त्यांचे video ,लवकरात लवकर पाठवून द्या… म्हात्रे, ते video घेऊन पोलिस स्टेशनला या…. " अभी आता वर, रूमवर आला. महेश तिथेच तपासणी करत होता.

" काय रे… महेश, काय सापडलं का ",

"तसं काही नाही… फिंगर प्रिंट्स तर घेतले आहेत आधीच, बाकी काही सामानाची उलटा-पालट केलेली नाही…. चोरीचं प्रकरण नाही… यावेळीही त्याने गुंगीचे औषध असलेलं काही देऊन त्याला मारलं. " अभी पुन्हा विचार करू लागला.

थोडयावेळाने सगळेच निघाले. तिसऱ्या खूनाच्या ठिकाणी… अर्ध्या तासाने पोहोचले तिथे. पुन्हा एक सोसायटी, लहानशी होती. दोनच इमारती, त्यातल्या एका इमारतीत, सुरेश पवारचे काका राहायचे. त्यांनाही तसंच मारलं होतं. त्या इमारतीत आत जाणार, तर कदम पुढे आले आणि म्हणाले,

" सर, watchman सांगत होता कि एक बाईक, ज्या दिवशी खून झाला तेव्हा पासून उभी आहे बाहेर… ",

"कूठे ? ", सगळेच बाहेर आले. watchman होता सोबत. गेटपासून थोडयाच अंतरावर 'ती' बाईक उभी होती. अभी निरखून बघत होता.

" कोणी आलंच नाही इतके दिवस…. बाईक घेऊन जायला. ",

" नही साहब … " ,

" तो इतने दिन इधर है ये बाईक, किसिने complaint नही की… " अभी रागातच बोलला. तेव्हा watchman थोडा घाबरला.

" इधर इतना पार्किंग होता है… मुझे लगा, कोई भूल गया होगा " अभी अजून रागातच होता.

" कदम… जप्त करा गाडी…. कोणाची आहे ते बघा. " आणि सगळे पुन्हा सोसायटी मध्ये आले.

कदमांनी गाडी जप्त करून एका हवालदाराला माहिती गोळा करण्यासाठी पाठवलं. म्हात्रे त्या हॉटेलवर थांबलेले म्हणून कदमांनी माहिती सांगायला सुरुवात केली.

" सकाळी call आलेला पोलिस स्टेशनला…. १० वाजता ",

" सकाळी १० वाजता… ",

"हो… खून साधारण सकाळी ७ ते ८ दरम्यान झालेला… ",

"हम्म… यांच्या मिसेस… त्या कूठे आहेत ? ",

" त्या २ वर्षापूर्वी वारल्या.",

"ठीक आहे… काही सापडलं का इथे ? ",

"तसं काही विशेष नाही… फिंगर प्रिंट्स सापडले. आणि हो… watchman जवळ काही माहिती आहे.… महत्त्वाची… " महेशला काही मिळते का ते बघायला सांगून अभी खाली आला. तोपर्यंत सोसायटीचा सेक्रेटरी खाली आलेला. watchman समोरच उभा होता.

" तुमच्या सोसायटीमध्ये …. कोणीही बाहेरचा व्यक्ती, कधीही येऊ शकतो का… ",

"तसं नाही सर… ",सेक्रेटरी म्हणाला.

" मग, खून काय सोसायटी मधल्या लोकांपैकी कोणी केला आहे का… " अभी बोलला तसा सेक्रेटरी गप्प झाला.

"नही साहब… वो सर नेही बताया था ।" watchman मधेच बोलला.

" क्या बताया था ? ",
User avatar
Rohit Kapoor
Pro Member
Posts: 2821
Joined: Mon Mar 16, 2015 1:46 pm

Re: Marathi thriller-खुनी कोण आहे

Post by Rohit Kapoor »

" पवारांनी मला , आदल्या रात्रीच सांगितलं होतं कि उदया सकाळी, कोणीतरी भेटायला येणार आहे. तो आला कि लगेच त्याला माझ्याकडे पाठवा.", सेक्रेटरी म्हणाला.

" हा साहब… वो आया था… ये देखो, उसका नाम लिखा है इस register book मै " अभीने नावं पाहिलं… पुन्हा, "मंदार देशपांडे"… येण्याची वेळ सकाळी ६.३०, जाण्याची वेळ सकाळी ७.४५…

" तुम्ही पाहिलंत का त्याला ? ", अभीने सेक्रेटरीला विचारलं.

" नाही , पण याने बघितलं त्याला…. शिवाय CCTV कॅमेरे आहेत ना, त्यात सुद्धा दिसेल तो… " अभीने watchman कडे पाहिलं.

" हा साहब, याद है मुझे… और वो, दुधवाले को भी याद होगा। " अभीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह…

" क्यू… उसे क्यू ? ",

"वो जल्दी मै था ना… तो दुधवाले को टकरा गया था… सारा दुध गिर गया था। ",

" OK, कदम… या watchman आणि त्या दूधवाल्याला घेऊन त्याच स्केच बनवा. "

महेश तोपर्यंत खाली आलेला. " अभी…. वरती तसचं आहे सगळं, बाकीच्या घरी सापडलं तसं… फक्त दोन कप मिळाले आहेत, चहाचे… ते घेतले आहेत मी, testing साठी.","चालेल. " त्याने घड्याळात बघितले. संध्याकाळचे ५ वाजत होते. महेश पण दमला होता. अभीने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला.

"कदम… तुम्ही सगळी माहिती गोळा करून माझ्या हॉटेलच्या रूमवर पाठवा. आणि हो… म्हात्रे आणि सावंतांना तेच सांगा. video, कागदपत्र… जे काही असेल ते सगळं मला रूमवर पाठवा. आज मीटिंग नको." अभी म्हणाला.

" काय झालं सर… तब्येत ठीक आहे ना… " कदमांनी विचारलं.

" हा… जरा डोकं जड झालं आहे. जाऊन झोपतो आता. उद्या सकाळी नवीन स्पॉट वर भेटू. म्हात्रेना इन्फोर्म करा." असं म्हणत अभी आणि महेश हॉटेलच्या रूमवर आले. थोडयावेळाने म्हात्रे आणि सावंत video आणि इतर काही घेऊन आले. ते तसंच ठेवून अभी आज लवकर झोपला.

दुसऱ्या दिवशी, सकाळी लवकर जाग आली त्याला. तसाच उठून ते पेपर्स, ते स्केचेस बघू लागला. थोडयावेळाने तयारी करून पुढच्या खूनाच्या ठिकाणी पोहोचला. महेश आधीच आलेला. सोबत बाकीची टीम होती. अभिषेक निरीक्षण करू लागला. बंगला… हम्म, चारही बाजूंना भिंती… साधारण ४ फुट तरी उंच असेल… त्याच्यावरून कोणालाही जाणे शक्य आहे… आजूबाजूला इतर बंगलेच… पण हा जरा मोठा, दुमजली… दोन गेट, एक मागच्या बाजूला…watchman ला बोलावून घेतलं. शेजारच्या बंगल्यातील लोकांना बोलावून घेतलं. चौकशी सुरु झाली. महेशने आधीच माहिती काढली होती. तीच तो अभीला सांगू लागला.

" यशवंत पवार… आणि त्यांची मिसेस, हे यांचे तिसरे भाऊ,… म्हणजे पहिला खून झालेला ते , त्यानंतर काल आपण गेलेलो ते आणि हे… तीन भाऊ… ",

"हम्म … अजून काही माहिती. ",

"हे दोन्ही खून… रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास झाले. सगळं बाकीच्या खुनासारखं आहे, चोरीचा कोणताच प्रयन्त नाही. किंवा झटपटीची चिन्ह नाहीत, सगळं कसं जागच्या जागी आहे." अभी आजूबाजूला बघू लागला. दरवाज्याजवळ कॅमेरा होता. त्यातला video काढून घेयाला सांगून अभी शेजाऱ्याकडे वळला.

" त्यादिवशी… तुम्हाला काही वेगळं दिसलं का इथे …. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी ",

"हो… त्यांच्याकडे जे गृहस्थ आले होते, त्यांनी आमच्या घरासमोर गाडी पार्क केली होती.",

"मग ",

"मग मी आलेलो बाहेर… त्यांना सांगायला, तर ते ऐकतचं नव्हते.…. मी इकडेच गाडी लावणार म्हणून…. कितीवेळ चालू होतं आमचं दोघांचे… शेवटी तो watchman आला म्हणून… नाहीतर चांगलंचं भांडण झालं असता.",

" तुम्ही त्याचं स्केच बनवू शकता का ? ",

"हो…", आता watchman कडे वळला अभी.

" तुम्ही इकडेच असता का दिवसभर…. आणि एकटेच आहत का security साठी." ,

" नाही सर… सकाळचा वेगळा duty असतो. मी संध्याकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ असा duty वर असतो. ",

"त्यादिवशी तुम्हीच होतात ना… जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा.",

"हो सर… ते सर रात्री ८ वाजता आलेले आणि गाडी पार्किंग वरून भांडण झालं. ",

"मग नंतर गाडी कूठे पार्क केली. ",

"हि काय… आतमध्ये… पवार सरांनी सांगितलं होतं मला कि हे सर येणार आहेत ते, म्हणून त्यांना गाडी आत पार्क करायला सांगितली मी",

"गाडी इथेच कशी मग ? आणि किती वाजता गेले ते ",

"१०.४५ झाले असतील. ते बाहेर आले आणि बोलले कि मी जरा बाहेर जाऊन येतो.… गाडी राहू दे इथेच… ते गेले ते आलेच नाही परत… मग रात्री १२ वाजले तरी घरातल्या लाईट चालू होत्या म्हणून मी बघायला गेलो तर… " watchman थांबला बोलता बोलता.

" तुम्ही त्याचं वर्णन करू शकता ना… ते पोलिस स्टेशनला येऊन सांगा.… आणि त्याचे काही नाव वगैरे सांगितलं का…. ",

"नाही सर. ",

" चालेल. कदम यां सगळ्यांचे statement लिहून घ्या." गाडी जप्त केली गेली. video घेतला आणि बंगला सील करून सगळे पोलिस स्टेशनला आले. स्केच बनवायचे काम सुरु होतं. सावंतानी तोपर्यंत त्यांचे मोबाईल चेक करून अजून माहिती काढली होती. हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली.

अभी आणि महेशला , नाशिकमध्ये येऊन आता ५ दिवस झालेले. खूनीची माहिती अद्याप नव्हती. अभी, महेश जवळच एका हॉटेलमध्ये राहत होते. आणि आज अभी सकाळपासून ते ती सगळी कागदपत्र, video पुन्हा पुन्हा बघत होता. महेश आला,

" काय रे… असा का बसला आहेस डोक्याला हात लावून. " महेशने आल्या आल्या विचारलं.

"बरं झालं आलास ते, बसं … सांगतो काय झालं ते. ", महेश बसला बेडवर.

" आतापर्यंत आपण मर्डर स्पॉट बघितले.… चार ठिकाणी सहा खून , ते कसे झाले ते तुला माहित आहे." अभीने महेशला विचारलं.

" हो म्हणजे… आरोपीने त्यांना आधी गुंगीचे औषध दिलं . नंतर त्यांना आरामात मारलं.… कश्याने मारलं ते हत्यार सापडलं नाही… ",

"हा… आणि हि स्केच… चार ठिकाणी, ३ वेगवेगळी स्केचस… शिवाय ते conform हि आहे, CCTV च्या video मधून… म्हणजेच जे eyewitness होते, त्यांनी जसं वर्णन केलं, तसंच त्या video मध्ये दिसलं.… ती व्यक्तिरेखा… ",

"त्याबद्दल काय… ",

"हे बघ… ", अभीने सगळी कागदपत्र आणि स्केचेस वेगवेगळी करून समोर ठेवली. " केस पहिली, दोन खून… त्या वेळेला आलेली व्यक्ती. तीच वर्णन आणि दुसरी केस, त्यांच्या मुलगा, त्या ठिकाणचं वर्णन सेम आहे. तिसरी केस, दुसरा भाऊ… तिथे शेवटची व्यक्ती आलेली तीच वर्णन वेगळं आहे.…. आणि आता तिसरी केस, तिसरा भाऊ… तिथे जो माणूस आलेला शेवटचा… त्याचं वर्णन वेगळं आहे.… तीन वेगवेगळ्या व्यक्ती… नाव एकचं,… "मंदार देशपांडे".

" हा मग… अभी,… आजकाल किती प्रकार आहेत, चेहरा लपवायचे.… मेकअप वगैरे… त्यात काय एवढं… एकचं माणूस असेल ना तो. ",

" तरीही वेगळं आहे त्यात काही. ",

" काय वेगळं ? ",

" पहिलं वर्णन घे… दाढीधारी चेहरा, रंग गोरा, उंची ६ फुट किंवा जास्त, घारे डोळे,मजबूत शरीरयष्टी… दुसरं वर्णन, पुन्हा दाढीधारी चेहरा, रंग सावळा , काळे डोळे,उंची साधारण ५ फुट, बारीक शरीरयष्टीचा…. आणि कालच वर्णन , तिसरं… पुन्हा दाढीधारी चेहरा, रंग काळा, निळे रंगाचे डोळे,उंची साधारण साडे ५ फुट, मध्यम शरीरयष्टीचा… शिवाय एक वेगळी गोष्ट, डोक्यावर केस नाही. बाकी दोन्ही वेळेस केस होते डोक्यावर… पहिल्यांदा ग्रे शेड असलेले केस,नंतर काळे केस आणि शेवटी टक्कल.…. तू जर म्हणतोस तो एकच व्यक्ती आहे, तर त्याची उंची कमी-जास्त कशी होऊ शकते…चेहरा, शरीरयष्टी ठीक आहे… मेकअप करू शकतो. पण उंची कशी काय adjust करणार… video मध्ये सुद्धा अगदी तसाच दिसतो ना ती अगदी. " अभी म्हणाला. महेश त्यावर विचार करू लागला.

" आणखी एक गोष्ट… ",

"कोणती ? " ,

" अजून आपल्याला दोन खुनांचा तपास करायचा आहे.… पण इतर ठिकाणीही काही गोष्टी खटकल्या मला.",

"काय नक्की ? " , महेशने विचारलं.

" स्वतःचा बचाव… तो त्याने केलाच नाही… एकदाही.…. "मंदार देशपांडे" नाव ना त्याचं… ते खरं का माहित नाही मला… पण आतापर्यंत सहा खून झालेल्या ठिकाणी, मेलेल्या व्यक्तींचे मोबाईल चेक केले… चार स्पॉट… चार वेगवेगळे मोबाईल नंबर…. शेवटचा call त्यांचाच… त्याच्याच नावावर ते नंबर register आहेत… ",

" हो, मग त्यावरून काय कळते ? ",

" तेच तर… त्याला जर खून करायचे आहेत, ते पण आठ खून… तर मग असे पुरावे का सोडतो आहे मागे.…. " महेश विचारात पडला. " म्हणजे बघ… हे call चे सांगितलं तुला… प्रत्येक ठिकाणी गाडी भेटली, rent वर घेतलेली. त्यावर त्याचचं नावं ,"मंदार देशपांडे"…. एकही गाडी तो घेऊन गेला नाही…. मुद्दाम ठेवून दिली त्याने… त्यानंतर फिगर प्रिंट्स, ते सुद्धा चारही ठिकाणी आहेत, सगळीकडे एकाचेच आहेत.… असा कोणताच प्रयन्त नाही कि बोटांचे ठसे दिसू नयेत.… त्यानंतर CCTV कॅमेरे… ते नमूद केलसं का, प्रत्येक वेळेस तो कॅमेरासमोर, कमीत कमी १.३० ते २ मिनिटापर्यंत आहेच… चेहरा स्पष्ट दिसतो अगदी.… शेवटी राहिले ते eyewitness… ",

" त्याचं काय ? ", खूप वेळाने महेश बोलला.

" आता मला सांग… तुला खून करायचा असेल तर तू गुपचूप, कोणालाही न दिसता, असा करशील ना…. मग हा, "मंदार देशपांडे"… एवढे eyewitness कशाला गोळा करतो आहे." ,

"म्हणजे clear सांग मला. ",

" पहिले दोन खून… तिथे watchman बरोबर भांडण… मुद्दाम गेट समोर गाडी पार्क करून भांडण, दुसरा स्पॉट… त्या हॉटेलच्या receptionist बरोबर भांडण…manager सोबत वाद, तिसरा स्पॉट, तिथे त्या दूधवाल्याबरोबर भांडण… तो दूधवाला सांगत होता कि तो मुद्दाम त्याला येऊन धडकला. आणि कालचा स्पॉट… शेजाऱ्याच्या बंगल्यासमोर उगाचच गाडी पार्क केलेली… त्यावरून त्यांच्याबरोबर वाद… आपला चेहरा लक्षात राहावा असंच काहीतरी केलं त्याने प्रत्येकवेळेला…. म्हणजे कळलं का तुला महेश ? ", अभिने महेशला विचारलं

"हो कळलं, त्याला लपून असं काही करायचे नव्हते… कालच्या बंगल्यात सुद्धा दोन गेट होते. शिवाय बंगल्याच्या भिंती फक्त चार फुट उंचीच्या… तो त्या दुसऱ्या गेटने जाऊ शकत होता किंवा भिंतीवरून उडी मारून जाऊ शकत होता… तरीही तो त्या गेटने, watchman समोरून गेला." महेश म्हणाला.

" म्हणजेच त्याला सगळ्यांदेखत हे करायचे होते… पोलिसांना गुंत्यात टाकायचा प्रयत्न असेल त्याचा. शिवाय तो इतका वेळ थांबायचं त्यांच्या घरी म्हणजे तो कोणी ओळखीचा असेल … " अभी म्हणाला.

"पण सावंतानी काढलेल्या माहिती नुसार, देशपांडे नावाचा कोणीही नातेवाईक नाही त्यांचा… मग हा कोण आहे ? " महेश बोलला.

" तेच तर…. त्याचंच नाव, प्रत्येक register list मध्ये, मोबाईल नंबर त्याचं नावावर, गाड्या त्याचं नावावर, फिगर प्रिंट्स मिळाले.… सगळ्यासमोर मुद्दाम येतो…. " मंदार देशपांडे"…… कोण आहे…कोण आहे हा मंदार देशपांडे ? "




पुढच्या दिवशी, सगळी टीम शेवटच्या स्पॉटवर गेली. तिथे सुद्धा जवळपास तसच होतं. बोटांचे ठसे, एक कार सापडली होती. चोरीचा कोणताच उद्देश नाही. अभिने ते सगळं महेशला बघायला सांगितलं. तो watchman ला शोधत होता. "मंदार देशपांडे" ला कोणी पाहिलं होतं का ते शोधत होता तो. वर महेश, त्या स्पॉटवर काही शोधत होता. inspector म्हात्रे खाली अभी सोबत होता. म्हणून Sub - inspector कदम, महेश ला माहिती सांगत होते."हे यशवंत पवार म्हणजे कालच्या स्पॉटचे , त्यांचा मुलगा आणि सून… " महेश ऐकतच सगळीकडे बघत होता.



मोठी सोसायटी होती. एकंदर तीन गेट होते सोसायटीला. प्रत्येक गेटसमोर watchman होता. तीन गेटमुळे inspector अभिषेकच जरा गोंधळाला. त्याने रात्रीच्या watchman ला बोलावून घेतलं होतं, तसे ते सगळे आलेले होते. शिवाय सोसायटीचा सेक्रेटरीही हजर झाला होता.

" रात्री झाले ना खून… त्यावेळी कोणी आलेलं का… " अभीने तिन्ही watchman ला विचारलं.

" हा सर… त्यावेळी म्हणजे ९ वाजता एक जण आलेला… " अभीने लगेच तिन्ही स्केचेस मागवली. त्यातलं एक watchman ने ओळखलं.

" हा सर… हाच आलेला… ",

"आणि किती वाजता गेला ? ",

" ते माहित नाही मला…. म्हणजे आम्ही ती नोंद करत नाही ना… ",

"असा का ….?",

"सर, इथे ३ गेट आहेत… आलेले पाहुणे, कोणत्याही गेटने बाहेर जातात… मग आमचीच पंचाईत होते. म्हणून ती नोंद नाही करत.",

"ok, आणि काही सांगू शकता का ?",

"हा… त्याच्या हातात एक छोटी bag होती… जरा घाईतच होता तो. ",

"मग तुम्ही असं direct आत सोडता का कोणालाही… " ,

"नाही सर, आम्ही आधी call करतो ,ज्या घरी पाहुण्यांना जायचे असते…. जर त्यांनी सांगितलं तरच आम्ही त्यांना वर सोडतो.",

" इकडेही सांगितलं का तुम्हाला त्यांनी… ",

"हो….मीच सांगितलं कि मंदार देशपांडे आले आहेत… तर ते बोलले कि लगेच पाठवून दे वर… " अभी पुन्हा विचारात पडला.



सगळे पोलिस स्टेशनला आले. सर्व स्पॉट बघून झालेले होते आता. जे काही पुरावे मिळाले होते, ते सर्व समोर होते. तरी महेश काहीतरी शोधत होता. अजून थोडावेळ पोलिस स्टेशन मध्ये बसून महेश,अभी हॉटेलच्या रूमवर आले. अभी अजून विचारात होता. महेश त्याच्याकडे बघत होता.

"कसला विचार चालू आहे एवढा ? ".

" हा… हो, मला वाटते काहीतरी मिसिंग आहे…. काय नक्की ते आठवत नाही… "अभी पुन्हा सगळं पाहू लागला. अचानक अभी ओरडला… " अरे हो… आपण बाकी सगळीकडे चेक केलं, पण सुरेश पवार…. त्याच्या घरी तर चेकच केलं नाही आपण काही… कारण तो तर हॉटेलवर होता ना. त्याची माहिती तर अपूर्ण राहिली. त्याच्या घरी जायला पाहिजे. तिथे काही माहिती मिळू शकते." अभी बोलला.

" हा, उद्या जाऊया सकाळी." महेश जरा त्रासिक आवाजात म्हणाला.

"काय रे… ?" अभीने विचारलं.

"जरा अंग दुखते आहे रे… झोपतो मी… " ,

"हो… आणि आजारी पडू नकोस हा… मला मदत कोण करणार मग… ?" ,

"अरे …. आहे ना तो म्हात्रे… करेल ना तो मदत. ",

"तो कसला मदत करतोय… स्वतःच सैरभैर असतो… सगळी माहिती, आपण सांगितलं तेव्हा गोळा केली. पहिली केस असली म्हणून काय झालं, असं घाबरून चालते का पोलिसांनी… " ,

" पहिली केस म्हणजे ?", महेशने प्रश्न काढला.

"अरे तो कदम सांगत होता, या म्हात्रेची पहिलीच केस आहे ते. नुकतीच बदली झाली इथे आणि लगेच हि केस समोर आली. मला वाटते म्हणून असा बावरला आहे तो. " अभी म्हणाला.

"कमाल आहे यार… एवढी मोठी केस, कोणत्यातरी अनुभवी ऑफिसरला देयाची ना…. म्हणून तर, त्याला अजून कळत नाही, कोणत्या प्रसंगाला काय करायचे ते." महेश बोलला.

" जाऊदे ते… तू झोप जा आणि उद्या तयार रहा. आपण दोघेच जाऊ, त्याच्या रूमवर. " म्हणत अभी त्याच्या रूम मध्ये आला.



सकाळीच दोघे जण "सुरेश पवार" यांच्या राहत्या घरी, काही माहिती मिळते का ते बघायला गेले. मोठ्ठा flat होता. दरवाजाची बेल वाजवताच नोकराने दार उघडलं. या दोघांबरोबर दोन हवालदार आणखी आलेले होते. महेशने त्या दोघांना सोबत घेऊन लगेचच तपासाला सुरुवात केली. अभी असाच इकडे तिकडे पाहत होता. एका भिंतीवर त्याला एक फोटो दिसला. जवळ जाऊन बघतो तर सुरेश पवार यांचा लग्नातला फोटो, त्यांच्या पत्नी बरोबर. अभिने हाताने खूण करूनच नोकराला बोलावलं.

" या कोण ? ",

"या madam आमच्या… ",

" मग ,त्या दिसल्या नाहीत ते एवढे दिवसात…. त्यांना माहित आहे ना, इकडे काय चाललय ते…कूठे बाहेर गावी असतात का त्या ? " अभीने विचारलं.

" नाही साहेब… त्या या जगात नाही आता.",

"म्हणजे काय नक्की ? " अभी आश्चर्यचकित झाला.

" अहो साहेब…. माहित नाही का तुम्हाला… तुमच्याच पोलिस स्टेशन मध्ये तर complaint नोंदवली आहे कि, त्यांनी आत्महत्या केली ना…. " अभिला हे माहितच नव्हतं. तितक्यात महेश बाहेर आला.

" काय झालं अभी ? " महेशने अभिला tension मध्ये बघून विचारलं.

" अरे याचं लग्न झालेलं… ",

" हो… ते कळलं मला, आत फोटो सापडले काही…. ",

" हा, मग त्याच्या बायकोने आत्महत्या केलेली ते कळलं का तुला ? " महेशने नकारार्थी मान हलवली. " तेच तर… आणि हा सांगतो कि आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये complaint नोंदवली आहे …. म्हात्रे कूठे काय बोलला या बाबत आपल्याला. " अभी म्हणाला.

" हा म्हात्रे पण ना…. काय करावं त्याचं कळत नाही." महेशही बोलला शेवटी.

" साहेब मी बोलू का ?" एका हवालदाराने मधेच तोंड उघडलं.

" हम्म … बोल " अभी म्हणाला.

" म्हात्रे सर तर आताच रुजू झाले आहेत ना त्यामुळे त्यांना माहिती नसेल या केसची… ",

" हा मग , कोणीतरी handle करत असेल ना हि केस…",

" हो सर , आधीचे सर होते ना, त्यांच्याकडे होती हि केस… सावंत सरांना माहिती आहे ते. " अभीला राग आला होता, त्याने दाखवला नाही तो. " ठीक आहे चला पोलिस स्टेशन मध्ये. तिकडे बघू काय ते." तसे सगळे निघाले.



पोलिस स्टेशन मध्ये आले तर inspector म्हात्रे आणि sub inspector कदम दोघेही नव्हते. ते बघून अभीचा पारा अजून चढला. sub inspector सावंत तेवढे जागेवर होते. " सावंत केबिनमध्ये या लवकर." अभी जरा रागातच म्हणाला. महेशने सावंतला हळूच सांगितलं कि अभी रागात आहे ते. जरा सांभाळून घे. सावंत जरा भीतभीतच केबिनमध्ये गेले. हाताने खूण करून त्याने बसायला सांगितलं सावंतला.

" inspector म्हात्रे आणि कदम कूठे आहेत ? " पहिला प्रश्न.

" मला वाटते ते एखाद्या स्पॉटवर गेले असतील." सावंत म्हणाले.

" वाटते म्हणजे तुम्हाला माहित नाही का ? ",

" नाही सर. मी आत्ताच आलो ना, मी येण्याआधीच ते निघाले होते. " अभी तर रागाने लालबुंद झाला होता.

" आताच्या आता त्यांना call करा आणि विचारा कूठे आहेत ते… आणि तुम्हीही लगेच या पुन्हा केबिनमध्ये…. "

" हो हो सर… " म्हणत सावंत लगबगीने बाहेर गेले.



महेश ऐकत होता ते सगळं बाहेरून. सावंत बाहेर गेल्यावर तो केबिनमध्ये गेला.

" कशाला रागावतोस एवढा… शांत हो जरा, काही कामासाठीच गेले असतील ना… " महेश त्याला समजावत म्हणाला.

" हो, ठीक आहे, पण कुणालाच माहित नाही कूठे आहेत ते दोघे… म्हणजे एवढं काम असताना, कोणी कुणाचच follow up ठेवत नाही, याला काय अर्थ आहे. " अभी म्हणाला. तोपर्यंत सावंत पुन्हा केबिनमध्ये आले.

" सर ते म्हात्रे सर, त्या हॉटेलमध्ये आहेत… काही तपासासाठी. जिथे सुरेश पवार यांचा खून झाला होता. आणि sub inspector कदम, ते गाड्या मिळाल्या ना त्यांची आणखी चोकशी करायला गेले आहेत. " ,

" म्हात्रेला कोणी सांगितलं त्या हॉटेलवर जायला." महेश म्हणाला.

" या म्हात्रेचं काय चालू असते ना, त्यालाच माहिती…. जाऊदे तो… " अभी त्रासिक आवाजात म्हणाला. आता त्याने सावंत कडे लक्ष दिलं.

" सावंत… सुरेश पवार यांच्या पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली… हे तुम्हाला माहित होतं… " ,

" हो सर",

" मग सांगितलं नाही ते मला तुम्ही…. मी जेव्हा पवार कुटुंबाचे कोणी नातेवाईक आहेत का ते बघा असं सांगितलं. तेव्हाही तुम्ही मला सांगितलं नाही हे…. :",

" हा सर, सांगणार होतो… ",

" कधी ते… आणि या म्हात्रेला तरी माहिती आहे का हि केस ? ",

" नाही सर, ते आले, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे सगळे खून सुरु झालेले." अभी आता रागाने येरझाऱ्या घालत होता.



" किती वर्ष झाली तुम्हाला सावंत इथे ?",

" २ वर्ष सर ",

" आणि कदमला ? ",

" त्यालाही २ वर्ष झाली. ",

" मग एवढी अक्कल नाही का तुम्हाला, एखादी केस कशी handle करायची ते… " अभी ओरडला सावंत वर. सावंत मान खाली सगळं ऐकत होता. महेशच मध्ये पडला मग.

" अभी… शांत हो रे… तो पण tension मधेच असतो ना… cool यार…" महेशने अभिला एका बाजूला जाऊन बसायला सांगितलं. तसा अभी शेजारी जाऊन बसला. सावंत तसेच बसून होते. " सावंत, तो जरा तापला आहे. म्हणून ओरडला. त्याला असं कामाविषयी केलेलं आवडत नाही. म्हणून ओरडला. मनावर घेऊ नको… " , महेश म्हणाला.

" हो सर, तरी माझीच चूक होती… मला आधीच सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला पण आणि म्हात्रे सरला सुद्धा… sorry. " सावंत हळू आवाजात म्हणाला.

" ते जाऊ दे आता, मी काय विचारतो ते सांग आता. " म्हणत महेश सावंतच्या बाजूला जाऊन बसला.



" हे , आत्महत्या चे प्रकरण कधी झालं… " महेशचा पहिला प्रश्न.

" आतापासून २ महिन्यापूर्वी…. लक्ष्मी पवार यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली.",

" ok, मग ती केस कोण handle करत होतं.",

" पहिले सर होते ना, पटवर्धन सर… त्यांच्याकडे होती केस. ",

" मग केस चा निकाल काय लागला ? ",

" चालू होती केस… ",

" मग ते पटवर्धन सर कूठे आहेत… त्यांची कूठे बदली झाली… ?",

" तेच तर कळत नाही. मीच त्यांना या केसमध्ये मदत करत होतो आणि केसही चांगली चालू होती.… काय झालं काय माहित, एका रात्री, मला call आला त्यांच्या. म्हणाले कि मी बदली करून घेतली आहे, माझ्या ऐवजी दुसरा inspector येईल, त्याला ही केस दे.",

" मग ? " , अभी दुरूनच ते सगळं ऐकत होता, त्यानेच प्रश्न केला.

" मग दुसऱ्यादिवशी यासाठीच मी त्याच्या घरी गेलो तर घर बंद. watchman ने सांगितलं कि रात्रीच सगळं सामान घेऊन ते निघून गेले." सावंत म्हणाले.

" आणि त्या केसचे पेपर्स ? ",

" ते सुद्धा बरोबर घेऊन गेले ते. त्यानंतर २ दिवसांनी हे म्हात्रे सर आले, त्यांची बदली म्हणून.… त्यांना या केसचं सांगणार होतो तर हे सगळं सुरु झालं.",

" बऱ, ठीक आहे…. तू आता बाहेर जाऊन बस. " अभिने सावंतला बाहेर पाठवलं.



" हे जरा विचित्र आहे ना रे… " अभी महेशला म्हणाला.

" हम्म… inspector पटवर्धनच नक्की काहीतरी झालं असेल, म्हणूनच ते तडकाफडकी निघून गेले. मला वाटते ना आपल्याला या केसची details काढायला पाहिजे." महेश बोलला.

" हो, एक काम करूया… तू त्या inspector पटवर्धनची माहिती मिळवं. मी लक्ष्मी पवार यांची अधिक माहिती मिळते का ते बघतो." अभी विचार करून महेशला बोलला. तसे दोघे झटपट कामाला लागले.
User avatar
Rohit Kapoor
Pro Member
Posts: 2821
Joined: Mon Mar 16, 2015 1:46 pm

Re: Marathi thriller-खुनी कोण आहे

Post by Rohit Kapoor »

महेशने लगेच inspector पटवर्धन ची माहिती जमवायला सुरुवात केली. अभी ,लक्ष्मी पवार यांची माहिती साठी फिरू लागला. पवार कुटुंबाचे तर कोणीच राहिले नव्हते, त्यामुळे लक्ष्मी पवार बाबत माहिती मिळणे कठीणच होते. बाकी सर्व टीमला अभीने त्या खुनांच्या स्पॉटवर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. तसही ती केस पुढे जाण्यास काहीच नव्हते हातात. त्यामुळे अभी सुद्धा महेशला मदत करायला लागला. प्रथम ते त्याच्या राहत्या घरी गेले. सोबत sub-inspector सावंत होतेच. सगळे त्यांच्या घरी पोहोचले.

" तुम्ही किती वर्ष एकत्र काम केलंत ? तुम्ही आणि पटवर्धननी… " अभीने सावंतला विचारलं.

" आम्ही, एकच वर्ष एकत्र होतो सर… ",

"आणि स्वभावाला कसे होते ते ? ",

" शांत… कोणाला असे कधी ओरडले नाहीत ते…. शिवाय काम सुद्धा चोख…. त्यामुळे तसे ते सगळ्यांना आवडायचे. ",

" मग अचानक जाण्याचे कारण काय असेल ? " अभी विचार करत म्हणाला. महेश होता सोबतच. नोकर होता बाजूला. पटवर्धन गेल्यापासून त्यांचे घर बंदच होते. चावी त्याच्याकडे होती, त्यामूळे त्याला बोलावून घेतलं. आता अभीने नोकराला विचारायला सुरुवात केली.

" जाताना काही म्हणाले का तुला पटवर्धन सर ? ", अभिचा पहिला प्रश्न.

" नाही, काही सांगितलंच नाही.… अचानक बोलले कि सामान भरायला लाग, इवढंच बोलणं आमचं." ,

" पण काही अंदाज आहे का ते कूठे गेले असतील ? " ,अभिचा दुसरा प्रश्न.

" मला वाटते ते त्यांच्या कुटुंबाकडे गेले असतील… ",

" म्हणजे त्यांची family इकडे नसते का ?",

" नाही, इथे ते एकटेच राहायचे. त्यांची family तिथे नागपूरला असते.",

" ok, कळलं, फक्त नोकरीसाठी ते इथे राहायचे. पण असं काय झालं नक्की कि ते अचानक निघून गेले." अभीने पुन्हा विचारलं. " त्या दिवशी काय झालं नक्की, सांगशिल का मला.",

" हा, त्यारात्री मी नेहमीप्रमाणे माझं काम संपवून झोपायला गेलो. ",

" म्हणजे इकडेच राहतोस का तू ?".

" हो, गेटजवळच खोली आहे ना, तिथेच राहतो मी.",

" ok, पुढे मग… " ,

" मी झोपायला आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. आणि झोपणार तर लगेच सरांनी बोलावून घेतलं. लगेच सामानाची बांधा-बांधा सुरु करायला सांगितली. तसं मी बांधून दिलं. आणि ते दोघे निघून गेले. ",

" एक मिनिट…. एक मिनिट, दोघे म्हणजे कोण ?",

" त्यादिवशी एक साहेब आलेले…",

"कोण… किती वाजता ? " ,

" ते कोण होते ते माहित नाही मला…. आणि मला वाटते कि मी झोपायला आलो तेव्हाच ते आले असतील. ",

" मग एकत्रच गेले ते… त्यांचा चेहरा वगैरे पाहिलास का तू ? ",

" नाही, मी सामान बांधत होतो ना म्हणून…",

" हम्म, ठीक आहे, पटवर्धन सरांचा नागपूरचा पत्ता आहे का तुझाकडे ? " ,

" माझ्याकडे नाही आहे सर, पण नागपूरच्या main branch मध्ये मिळेल तुम्हाला.".

"चालेल…. " म्हणत अभी त्या घराबाहेर पडला.



तिथून ते ,"लक्ष्मी पवार" संबंधी माहिती गोळा करायला पुन्हा त्यांच्या राहत्या घरी गेले. खूप शोधलं त्यांनी. काहीच सापडलं नाही त्यांना. अभी तर वैतागला होता अगदी. महेशसुद्धा असाच विचार करत बसला होता. अभी विचार करत त्या रूममध्ये येरझाऱ्या घालत होता. बाजूलाच एक लग्नपत्रिका पडली होती. महेश ती उचलून वाचू लागला.

"काय आहे ते ?" अभीने विचारलं.

"अरे हि, या दोघांची लग्नपत्रिका आहे." महेश म्हणाला. "बघू." अभीने पत्रिका हातात घेतली. वाचून झाली तशी बाजूला ठेऊन दिली. "चल निघू. " महेश अभीला बोलला तसे सगळे निघाले. गाडीत येऊन बसले. तसं अभीला अचानक काहीतरी आठवलं. गाडीतून झटपट उतरला. पुन्हा त्या रूममध्ये गेला. महेश, बाकीचे हवालदार यांना काहीच कळेना. ५ मिनिटांनी अभी पुन्हा गाडीत येऊन बसला. हातात तीच लग्नपत्रिका.

"आता हि लग्नपत्रिका कशाला ? ". महेशचा प्रश्न.

"सांगतो." अभी म्हणाला. पत्रिका सावंतकडे देत म्हणाला." सावंत… हा लग्नाचा हॉल कुथे आहे ते माहित आहे का तुला ? ", सावंतानी पत्रिका वाचली.

"हो सर… ",

" छान… मग आता या हॉलला जा आणि लक्ष्मी पवार यांचा माहेरचा पत्ता घेऊन ये." अभी सावंतला म्हणाला.

" मला सांगशील का , नक्की काय चाललाय ?" महेशने विचारलं.

" तुला अजून कळलं नाही, अरे…. लग्न करण्याच्या वेळी, त्या हॉलवर दोन्हीकडचे , आपल्या राहत्या घरचा पत्ता नोंदवून ठेवतात. मग…. लक्ष्मी पवारच्या माहेरचा पत्ता नक्की असेल तिथे… " अभी म्हणाला.

" क्या बात है… " महेशने अभिच्या पाठीवर शाबासकी दिली.

" शाबासकी काय रे…. ते महत्त्वाचं आहे सध्या, चल लवकर…. पटवर्धनच्या घरी जायला पाहिजे… त्या आधी नागपूर main branch ला जायला पाहिजे. खूप कामं आहेत." पोलिस स्टेशनला येऊन सगळेच कामात गुंतले. सावंतनी लक्ष्मी पवारचा पत्ता आणला. तोही नागपूरचाच पत्ता…

" बर झालं… म्हणजे जास्त पळापळ करावी लागणार नाही मला. " अभी म्हणाला.

" मी येऊ का सोबत ?" महेशने विचारलं.

" नको…. एक काम करू… इकडे तसं पण कोणीतरी लक्ष देयालाच पाहिजे. असं करू, तू या सगळ्यांवर लक्ष ठेव आणि अजून काही त्या 'मंदार देशपांडे'च मिळते ते बघ. मी जाऊन येतो, हा. ",

" हो चालेल. "



दुसऱ्या दिवशी, पहाटेच अभी नागपूरला निघाला. महेश सांगितल्याप्रमाणे, त्या केसची अधिक माहिती गोळा करत होता. अभी प्रथम, लक्ष्मी पवारच्या माहेरी पोहोचला. तिथे तर त्याला अपेक्षेप्रमाणे वेगळीच माहिती मिळाली. गांगरून गेला तो. योग्य ती माहिती मिळवून अभी तडक पटवर्धन यांच्या घरी निघाला. वेळेत पोहोचला. तिथून वेगळी माहिती, सर्वकाही अनपेक्षित माहिती त्याला मिळाली होती. finally, नागपूरच्या main branch ला जाऊन चौकशी केली. अभी अजून २ दिवस तिथे थांबला. तिसऱ्या दिवशी त्याला महेशचा फोन आला.

" हेल्लो… आहेस कूठे ? ",

" इकडेच आहे अजून… ",

" आणि माहिती मिळाली का ?",

'' हो… खूप माहिती जमवली आहे मी.…. call का केलेला तू ",

"अरे हो, म्हात्रेला सुट्टी पाहिजे होती… त्याला गावाला जायचे आहे.… अर्जंट… घरी काहीतरी प्रोब्लेम झाला म्हणून… ",

" नको, नको… अजिबात नको… केस solve झाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही… आणि त्याला कशाला सांगितलं , मी नागपूरला आहे ते…. ",

" नाही, मी फक्त बोललो, तू बाहेर गेला आहेस म्हणून …. ",

"ok, मी येतो २ दिवसात, सुट्टी कोणालाच नाही हा… " अभीने आपलं काम संपवलं आणि निघाला पुन्हा नाशिकला.



नाशिकला आल्याबरोबर त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यापूर्वी त्याने म्हात्रेला बोलावून घेतलं.

" काय म्हात्रे… आधीच सांगितलं होतं ना, केस संपेपर्यंत कोणी सुट्टी घेयाची नाही म्हणून… ",

" हो सर, पण आईची तब्येत बिघडली म्हणून… " म्हात्रे बोलला.

" ठीक आहे… आज रात्री एक मिटिंग घेऊ. ती मिटिंग झाली कि बघू , तुला सुट्टी देयाची कि नाही ते.",

" हो, चालेल सर,"

" आणि सावंत, आज सगळ्या टीमला सांगा, मिटिंगला यायला… माझ्या रूमवर मिटिंग घेऊ. आणि हो, आज सगळी हत्यारं, guns , revolver's… साफसफाई साठी जमा करा… म्हणजे उद्या पर्यंत मिळतील आपल्याला… तशी order आली आहे मोठ्या सरांची…. कळलं का सगळ्यांना… तर रात्री ठीक ८ वाजता, सगळ्यांनी माझ्या रूमवर यायचे… नॉर्मल ड्रेसिंग करून आलात तरी चालेल… uniform नसेल तरी चालेल. " म्हणत अभीने सगळे पेपर्स गोळा केले आणि त्यांच्या हॉटेलच्या रूमवर आला.



सोबत महेश होताच. त्याला जरा हे विचित्र वाटलं.

" अरे काय झालं नागपूरला… ते तर सांग आधी ." महेश उत्सुकतेने म्हणाला.

" मी रात्री सांगेन ते… " अभी शांतपणे म्हणाला.

" आणि हे काय मधेच… हत्यारांची साफसफाई… हे कूठून आलं मधेच… ",

" तसं पण मी बघितलं इकडच…. सगळी weapons जुनी आहेत…. साफ करायला होती ती , म्हणून मीच आपल्या सरांकडून परमिशन आणली. शिवाय या ब्रांचच्या संबंधी माहिती काढायला गेलेलो main branch ला… तिथूनही परमिशन मिळाली. " अभी म्हणाला. आणि दोघे रूमवर आले.



रात्री बरोबर ८ वाजता, सगळे अभिषेक राहत असलेल्या हॉटेलच्या रूमवर जमा झाले. महेश आधीच आलेला, सगळ्यांना आलेलं बघून अभी उभा राहिला.

" अरे… या …. या सगळे, वेळेवर आलात हा… बसा, पटकन मिटिंग चालू करू. " तसं सगळ्यांनी आपापल्या जागा पकडून घेतल्या. " चला, बसले का सगळे. " अभी सगळ्यांकडे बघत म्हणाला.

" हा रे… बसले सगळे… तू मिटिंग चालू कर… आणि आधी सांग, काय माहिती मिळाली ते… " महेश वैतागत म्हणाला.

" हो रे… Cool Down… सांगतो रे. " अभी sub inspector सावंतकडे बघत म्हणाला. " सावंत, आता पहिल्यापासून सुरु करू… तू सांगतोस का माहिती. ",

" हो सर… सांगतो. " सावंत म्हणाला. " आठ खून झाले… एका मागोमाग एक असे, एकाच कुटुंबातले सगळे… आरोपीचे स्केच तयार आहेत, फिंगर प्रिंट्स सारखेच मिळाले, नाव मंदार देशपांडे…. त्याच्या नावाने मोबाईल नंबर होते, गाड्या भाड्याने घेतलेल्या… एवढी माहिती मिळाली सर… " सावंत थांबले बोलायचे.

"very good…. तर आता तुम्हा सगळ्यांना विचारतो मी…तुम्हाला काय वाटते, हा मंदार देशपांडे खरा असेल का ? " अभी सगळ्याकडे पाहत म्हणाला.



" काय प्रश्न आहे अभी तुझा…. साहजिकच तो खोटा असणार " महेश म्हणाला.

"असो… मला खूप माहिती मिळाली,…. ती मी आता share करू इच्छितो… " अभी आता सर्वांसमोर बसला होता. " मलाही खूप प्रश्न पडले. चक्रावून टाकलं त्या आरोपीने. त्यात इकडचं व्यवस्थापन जरा ढिसाळच आहे… बरोबर ना… " अभी ,sub inspector कदम कडे पाहत म्हणाला. कदम गप्प होते. " त्यात नवीन माहिती मिळाली कि संजय पवार यांच्या पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली होती. ती केस काय झाली म्हात्रे ? " ,अभी inspector म्हात्रे कडे बघत म्हणाला.

" मला कसं ठावूक असणार ते …. मी तर नवीन… " म्हात्रे म्हणाला.

" नवीन असला तरी मागच्या केसेची माहिती घेण्याचा एक प्रोटोकॉल असतो, तेही माहित नाही तुला… " म्हात्रे त्यावर काही बोलला नाही. " तुझी आधीची ब्रांच कोणती…? " तेव्हा ही म्हात्रे गप्पच. " असो… या आधी एक पटवर्धन नावाचे inspector हि केस handle करत होते. ते सुद्धा हि केस अर्धवट सोडून गेले. ते जरा नवलं वाटलं मला. त्यात मी लक्ष्मी पवार याच्या माहेरी जाऊन आलो. तिथे कळलं कि त्या अनाथ होत्या. एक मानलेला भाऊ होता , तो सुद्धा अनाथ… दोघेच राहायचे. त्याचा पत्ता तर मिळालाच नाही. तिचा भाऊ, फोटोग्राफर आणि मेकअपमन…. त्यानेच फोटो काढलेले लग्नातले …. काय करावे तेच कळत नव्हतं." अभी सांगत होता.



सगळेच लक्ष देऊन ऐकत होते. फक्त कदमांची चलबिचल चालू होती. ते अभिच्या नजरेतून सुटलं नाही.

" काय झालं कदम ? " ,

"क… काहीनाही, जरा अस्वत्थ वाटते आहे." कदम म्हणाले.

"अचानक…. काय झालं नक्की.",

" माहित नाही सर… ",

" घाबरू नकोस… आपल्याकडे डॉक्टर आहे…. महेश बघ जरा त्याला… " अभी म्हणाला.

" न… नको सर… ठीक आहे, तुम्ही सुरु करा तुमचं. " कदम घाम पुसत म्हणाला.

"sure ना…. " अभीने विचारलं.

" हो " कदम म्हणाले.

" तर मी पटवर्धनच्या घरी गेलो. तर तिथे कळलं कि ते घरी पोहोचलेच नाहीत. तिकडेच गडबड वाटली मला. मी लगेच नागपूरच्या main branch गाठली. तेव्हा तिथे सगळी माहिती मिळाली. " अभीने आता सगळे पेपर्स वगैरे बाजूला ठेवले आणि दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. रूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला.

" सगळ्यांना 'मंदार देशपांडे' माहित असेल…. तीन वर्णन आहेत ना त्याची…. आतापर्यंत सगळ्यांना त्याचं वर्णन पाठ झालं असेल ना…. " सगळेच " हो " म्हणाले. " सगळ्यांना तो खोटा आहे असंच वाटत असेल ना… तर मी सांगतो आता… "मंदार देशपांडे" नावाचा व्यक्ती Actually अस्तित्वात आहे. " अभी म्हणाला.

" काय ? "महेश मोठ्याने ओरडला.

" हो, नागपूरला लक्ष्मी पवारांची माहिती काढताना मला हि माहिती मिळाली. पण हा मंदार देशपांडे वेगळाच आहे, त्याचा या खुनांशी काही एक संबंध नाही… मंदार, हा पवार कुटुंबाचा वकील आहे. त्यानेच तर ते लग्न लावून दिलं होतं. आता तो दिल्लीला आहे…. त्याला या खुनांविषयी काही माहितीच नाही… मी त्याला सांगितलं तसा तो लगेचच मला भेटायला आला… आरोपीने, त्याचं नाव वापरून खून केले."अभिने पूर्ण माहिती सांगितली. "असं होय, खरंच ग्रेट आहे तो खुनी… मानलं पाहिजे त्याला…. पण आता पुढे काय ? " महेशने प्रश्न केला.



" पुढे म्हणजे कळलचं नाही तुम्हाला…. "मंदार देशपांडे" नावाचा व्यक्ती आहे, पण……. पण "म्हात्रे" नावाचा कोणी व्यक्तीच नाही इकडे अस्तित्वात…. " यावर सगळे चक्रावून inspector म्हात्रे कडे बघू लागले.

" काय सर…. मस्करी करता काय गरीबाची…. " म्हात्रे हसत हसत उभा राहिला. अभी सुद्धा हसू लागला. तसे सगळेच हसू लागले.

"तू पण ना अभी, एवढं सिरीयस वातावरण झालेलं…मस्करी कसली करतोस …. " महेश म्हणाला.

"अरे असचं…. जरा relax केलं सगळ्यांना… " अभीने म्हात्रेला खाली बसायला सांगितलं. " चला… पुन्हा केस कडे येऊ…. नागपूर main branch ला गेलो तेव्हा कळलं, कि पटवर्धनची transfer झालीच नाही…आणि इकडे नाशिकला आल्यावर conform केलं मी ते…. जर inspector पटवर्धनची transfer झालीच नाही, तर…. तर मग म्हात्रे…. बदली inspector म्हणून कसा येऊ शकतो… " ते ऐकून म्हात्रे पटकन उभा राहिला आणि पळू लागला. अभिने चपळाई करून त्याला घट्ट पकडलं. " पकडा रे याला… " अभी ओरडला, तसे बाकीच्यांनी म्हात्रेला पकडलं. आणि पकडून खुर्चीवर बसवलं. महेशला अजून कळत नव्हतं कि नक्की काय चालू आहे ते.

"अभी… पुन्हा मस्करी करतो आहेस ना तू…. " महेश बोलला.

" नाही, यावेळी मस्करी नाही, खर बोलतो आहे मी.…. म्हात्रे नावाचा कोणी inspector च नाही आहे , ज्याची बदली या ब्रांचला झाली आहे…. बरोबर ना…. म्हात्रे उर्फ राकेश पवार… " अभी, म्हात्रे कडे बघत म्हणाला. म्हात्रे स्वतःला सोडवायचा प्रयन्त करत होता. पण त्याला ते जमलं नाही…. महेश, अजून प्रश्नार्थक… इतर जमलेले सुद्धा…

" सांगतो, मी लक्ष्मी पवारांच्या माहेरी गेलो होतो तेव्हा कळलं कि माहेरचं आडनाव सुद्धा 'पवारच'… लक्ष्मी अनाथ… त्यांचा फक्त एक मानलेला भाऊ…. लग्नात त्यानेच फोटो काढलेले, त्यामुळे त्याचा स्वतःचा असा फोटो नव्हता कूठे, पण एका फोटोत, जो family फोटो होता…. सगळ्या पवारांचा family फोटो, त्यात त्याचा सापडला. तो फोटो बघूनच सगळं कळलं मला. तो दुसरा- तिसरा कोणी नसून, इतके दिवस आपल्या सोबत inspector म्हात्रे म्हणून वावरणारा राकेश पवारच आहे… हा बघा फोटो. " सगळे फोटो बघून अवाक झाले.



" अरे पण आपण याला का पकडतो आहे…. " महेशने विचारलं.

" याला का पकडलं ते हाच सांगेल… काय मिस्टर राकेश उर्फ inspector म्हात्रे…. आणि उर्फ मंदार देशपांडे…. " आता सगळेच अभीकडे पाहू लागले.

" म्हणजे यांनी खून केलेत सगळे…. " sub inspector सावंत म्हणाले.

" हो… मला अगदी पहिल्या दिवसापासूनच गडबड वाटत होती. आम्ही दोघे आलो तेव्हा म्हात्रे सुट्टीवर होता… म्हणजे एवढे खून झाले आणि याने सुट्टी घेतली होती. त्यानंतर एकाही केसची व्यवस्थित तपासणी नाही, कि पुरावे गोळा करणे नाही… सगळा अजागळपणा… एका inspector ला मी एवढा अव्यवस्थित कधीच पाहिला नाही. त्यात त्यादिवशी, कोणालाही न विचारता, हॉटेलवर चौकशी करायला गेलेला. तेव्हाच actually फसला हा. कारण मीच सांगितलं होतं, कि कोणालाच माझ्या permission शिवाय त्या रूममध्ये सोडू नये… तेव्हा वाटलं, यात नक्की काहीतरी गडबड आहे…. आणि सर्वात महत्त्वाचं, सावंत… " अभी सावंतकडे बघत म्हणाला. " तुला तरी माहित आहे ना…. एखाद्या senior inspector ची बदली होत असेल तर त्याला किती कालावधी लागतो ? ",

" हो सर, १५ दिवस तरी लागतात कमीत कमी, बदलीला…. त्यानंतर नवीन अधिकारी येतात. " sub inspector सावंत म्हणाले. :

" तेच तर… कमीत कमी १५ दिवस आणि तू म्हणाला होतास कि , पटवर्धन गेल्यानंतर दोन दिवसांनी म्हात्रे आलेला…. मग नक्की झालं कि म्हात्रे खोटं बोलत आहे ते. त्याची माहिती काढली आणि आता ती सगळी समोर आहे. " अभी राकेश कडे बघत म्हणाला. " राकेश… आता तू inspector नाहीस, त्यामुळे तुला म्हात्रे बोलणार नाही मी… तर तू सांगतोस का हे काय आहे सगळं आणि का केलंस ? " अभी थांबला बोलायचा.



राकेश शांत होता. स्वतःला सोडवायचा प्रयन्त त्याने कधीच थांबवला होता. थोड्यावेळाने का होईना, तो बोलू लागला…

" मीच लक्ष्मीचा मानलेला भाऊ आणि मीच त्या सगळ्यांना मारलं…. " राकेश म्हणाला.

" बरं, आणि का असं केलंस ते पण सांगशील तर बरं होईल. " महेश म्हणाला.

" आणि हो, पटवर्धनचं काय केलंस ते सुद्धा सांग. " अभी म्हणाला.

" म्हणजे? पटवर्धन…. " कदम म्हणाला.

" हो, पटवर्धन च्या घरी पुन्हा गेलेलो मी, त्याच्या नोकराने नाही पाहिलं त्याला, पण त्याच्या watchman ने राकेशला बघितलं होतं , ओळखला त्याने फोटो राकेशचा. म्हणजे त्या रात्री हा होता त्याच्या घरी. सांग राकेश, पटवर्धनच काय केलंस .?" अभी मोठ्या आवाजात म्हणाला.

" त्या पटवर्धनला पण मारलं मी, ऐकतच नव्हता…. " राकेश रागातच म्हणाला.

" अरे पण का मारलं त्यांना ? " सावंत म्हणाले.

" माझ्या बहिणीची केस handle करत होता… मला मदतच करत नव्हता… म्हणून मारून टाकलं त्याला." राकेश बोलतच होता.

" सविस्तर सांग, तुझ्या बहिणीने आत्महत्या केली होती ना… " अभी म्हणाला.

" आत्महत्या…. छे… तो खून होता, खून… एवढं छळायाचे तिला, रोज मला फोन करून सांगायची…. मारतात, त्रास देतात. सगळं त्या पैशासाठी…. हुंडा पाहिजे होता त्यांना…. लग्नात तर काही बोलले नाहीत, लग्न झाल्यानंतर तिला त्रास देयाला सुरुवात केली… एवढे मोठे लोकं, श्रीमंत… तरी त्यांना हुंडा पाहिजे होता… किती पैसे दिले तरी कमीच त्यांना, लक्ष्मीचा नवरा संजय बोलला, बिजनेस साठी ५ लाख दे नाहीतर बहिणीला घरी घेऊन जा. कसेबसे जमवले… पुन्हा तेच… वर ३ लाख अजून दिले, माझं घर गहाण ठेऊन…. तरी तिचा त्रास चालूच होता. " राकेश शांतपणे सांगत होता.



" शेवटी तीच बोलली…. मला त्रास झाला तरी चालेल, पण तुला पुन्हा त्रास होऊ देणार नाही… तेच शेवटचं बोलणं…. गळफास लावून घेतला तिने आणि त्यांनी आत्महत्या नावं दिलं त्याला.…. सांगितलं कि तिच्या डोक्यावर परिणाम झालेला म्हणून तिने गळफास लावला.… मी किती सांगायचा प्रयत्न केला त्या पटवर्धनला…. तो पण आमच्याच गावाचा…. तिला होणारा त्रास मी त्याला सांगितला , तरी ऎकेना , शेवटी केस बंद करणार होता…. तेव्हा मीच ठरवलं, याचीच केस close करायची… त्याला धमकावलं, त्याच्या कुटुंबाला त्रास देऊन त्याच्याकडून सगळी कागदपत्र गोळा केली. transfer चं खोटा सांगायला सांगितलं त्याला मी…. त्याला नागपूरला परत घेऊन येण्याचे म्हणून त्याच्या सोबत निघालो आणि वाटेतच त्याला संपवलं. त्याच्याकडूनच मला पवार कुटुंबाचे पत्ते मिळाले सगळे.… एकेकाला वेळ मिळाला तसं मारलं. " ,

" पण मंदार देशपांडे हे नाव का घेतलंस तू ? " , महेश मधेच म्हणाला.

" त्यालाही मारणार होतो मी, पहिला नंबर त्याचाच होता, त्याच्यामुळे हे लग्न झालं आणि माझी बहिण दूर गेली…. पण ऐनवेळी तो दिल्लीला गेला म्हणून वाचला. मग मी इकडे येण्यासाठी पटवर्धन च्या जागी बदली inspector म्हणून दाखल झालो… या कोणालाच कळलं नाही ते. मग प्रत्येकाला "मंदार देशपांडे" च्या नावाने call केले, त्यांचाच वकील ना तो, जवळचा अगदी…family मधला अगदी, त्यामुळे त्याला त्यांच्या घरी कधीही सहजच entry होती…. त्याचाच फायदा झाला मला.… सगळ्यांना संपवलं…. खूप आनंद वाटतो आहे आता… " ,

" त्यांना मारलस कसं ? " , अभीने विचारलं.

" मी सोबत काहीतरी घेऊनच जायचो, खाण्यासाठी…. त्यातच गुंगीचे औषध मिसळलं होतं मी…. मंदारच्या ऐवजी मी कसा आलो, हा प्रश्न सगळ्यांना पडायचा…. पण लक्ष्मीचा भाऊ भेटायला आला म्हणून ते मी दिलेले खायचे, मूर्ख लोकं…" राकेश हसला. " हळूहळू शुद्ध हरपली कि माझं काम सोप्पं होयाचे… एक सुरा घेतला होता मी खास या कामासाठीच…. " राकेश पुन्हा हसला.



किती विकृत होता तो. अगदी सहज सांगत होता. तरी अभीने पुन्हा विचारलं त्याला,

" पण तू तर मेकअप करून जायचा ना… मग ते कसे ओळखायचे तुला…. आणि तुझी उंची कमी -जास्त कशी व्हायची मग… " ,

" मी मेकअपमन सुद्धा आहे , विसरलास वाटते inspector अभिषेक…. खोटी दाढी आणि केस काढायला किती वेळ लागतो… प्रत्येकाच्या घरात प्रवेश करताना तेच करायचो मी…. आणि माझं काम झालं कि पुन्हा आरामात बसून मेकअप करायचो. …आणि माझ्या उंचीच…. ते तर अगदी सोप्पं… पायात स्टिक लावल्या कि झालं… पाहिजे तितकी उंची वाढवता येते.…. confused केलं ना सगळ्यांना…. मला तसंच confused करायचं होतं पोलिसांना…. म्हणून माझा चेहरा लक्षात राहावा म्हणून मुद्दाम कोणाबरोबर तरी वादावादी करायचो…. मला वाटलचं नव्हतं कि मी कधी पकडला जाईन…. पण inspector अभिषेक…. hats off to you…कसला हुशार निघालास तू …. great ". राकेश उत्साहात म्हणाला.



शांतता,… राकेशचं बोलणं संपलं. महेशला अजून काही प्रश्न होते.

" पण अभी, तुला कसं कळलं कि म्हात्रे ऊर्फ राकेशच खुनी आहे ते… " महेशने लगेच प्रश्न केला.

" शेवटचा स्पॉट आठवतो ना तुला…. मोठी सोसायटी, ३ गेट… " ,

" हो, त्याचं काय ? ",

" तिथे मीच confused झालो होतो… राकेशचं सुद्धा तेच झालं , त्याने entry एका गेटमधून केली. पण जाताना, मला वाटते तो गोंधळाला असेल… ३ नंबर गेट मधून तो बाहेर गेला.…. त्यात भर म्हणून शेवटचा खून केल्याच्या आनंदात तो दाढी लावायचा विसरला बहुदा. " अभी म्हणाला.

" हे तुला कसं कळलं ? ",

" त्या watchman ने मला त्याच दिवशी सांगितलं होतं, जेव्हा आपण चौकशीला गेलो होतो. तेव्हा त्याने म्हात्रे उर्फ राकेशला ओळखलं होतं. मला खूप नंतर त्या watchman ने सांगितलं कि म्हात्रे सर त्या रात्री आले होते. तेव्हा मला वाटलं कि त्याचं काही चुकते आहे, पण नंतर जेव्हा राकेश बद्दल कळलं तेव्हा मी सुद्धा काही शोध घेतला…. हा राकेश उर्फ म्हात्रे जेव्हा खून व्हायचे तेव्हा पोलिस स्टेशन असो वा त्याचं पोलिस क्वार्टस मधली रूम , दोन्ही ठिकाणी नसायचा. हे मी शोधून काढलं. शिवाय या गाड्या ,ज्या याने सोडल्या होत्या… त्यातली एक गाडी घेताना हा म्हात्रेच्या मेकअप मध्ये म्हणजे जसा त्याच्या नॉर्मल लुक आहे तसा गेला होता. मी तिथेच नक्की केलं कि हे सगळं म्हात्रे उर्फ राकेशच हे करत आहे. खोटा पोलिस अधिकारी बनून आला आणि खून करून जाणार होता. इतक्यात आपण इथे आलो. ते कोणाला माहित नव्हतं म्हणून बरं झालं… नाहीतर हा कधीच पसार झाला असता…. आपण आलो म्हणून राकेश अडकला आणि स्वतःच केलेल्या खुनात आपल्याला मदत करायला लागला. आताही मी इथे नाही बघून पळत होता, आईच कारण सांगून …. पण मला खरं कळलं होतं, म्हणून हि मिटिंग घेतली. त्यासाठी आपल्या पिस्तुल, गन्स… ची साफसफाई च नाटकं केलं. राकेश मला ह्त्याराशिवाय पाहिजे होता समोर, नाहीतर इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. " अभी राकेशकडे पाहत म्हणाला. " राकेश, planning खूप चांगलं होतं. पण आरोपी असाच लपून राहत नाही… कळलं. " राकेश हसतच होता,

" आता मला कोणतीही शिक्षा करा…मला पर्वा नाही त्याची… मी माझ्या ताईला न्याय मिळवून दिला… " आणि राकेश मोठयाने हसू लागला.



अभिने " त्याला घेऊन जा " असं सांगितलं. सावंतला त्याची केस फाईल बनवायला सांगितलं. अभी, महेश सोडून बाकीचे सगळे पोलिस स्टेशनला परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळे पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये जमले. एका नवीन पोलिस अधिकारीची तत्काळ नियुक्ती त्या ब्रांचवर करण्यात आली. योग्य ते पेपर्स आणि माहिती गोळा करून राकेशच्या नावावर केस उभी केली गेली. संध्याकाळ पर्यंत अभी, महेश मोकळे झाले. आता मुंबई जाण्यास मोकळे दोघेही… अभी त्याचं सामान भरून तयार होता. हॉटेलच्या गेट जवळ महेशची वाट बघत होता. ५ मिनिटांनी महेश आला. आता दोघेही त्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागले. दोघेही गप्पगप्पच होते.



महेशने विषय काढला.

" किती किळसवाणा प्रकार ना… फक्त त्याच्या बहिणीची केस बंद केली म्हणून पटवर्धन सहित पूर्ण कुटुंबाला संपवलं त्याने… ",

" ह्म्म्म…. actually, हे मी सांगितलं नाही कोणासमोर, तुला सांगतो… राकेश काय बोलला आपल्याला, त्याच्या बहिणीला मानसिक आजार होता असं ठरवून ती केस close करत होते ना… " ,

" हो , बरोबर… " महेश उत्तरला.

" पण राकेशच मानसिक रोगी होता… " त्यावर महेश चाट पडला. " हो, मी जेव्हा त्याच्या नागपूरच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा मला त्याच्या शेजाऱ्याकडून हि माहिती मिळाली. शिवाय गेली दोन वर्ष ,तिथे त्याची treatment चालू आहे. तो सुधारत होता… इतक्यात त्याच्या बहिणीनी आत्महत्या केली. ज्याची या जगात फक्त एक बहिणचं होती… त्याला ती सोडून गेल्यावर काय वाटलं असेल…. या पवार कुटुंबाचे सुद्धा कळलं मला…. राकेशने किती पैसे दिले होते त्यांना, हुंडा म्हणून… मग त्याचा हा राग स्वाभाविकच होता, फक्त मार्ग चुकीचा निवडला त्याने.… पटवर्धनचं वाईट वाटते…. हकनाक त्याचा बळी गेला यात. " अभीने बोलणं पूर्ण केलं.

" हो, हुंडाबळी अश्याच असतात…. दोन्ही घरं उद्ध्वस्त होतात. " महेश म्हणाला. तितक्यात गाडी आली.

" चलो, खूप डोकं फिरवलं त्याने…. planning मस्त होती ना… " अभी गाडीत बसत म्हणाला.

" planning perfect होती…. पण तुझ्यासमोर कसं चालणार त्याचं… hats off to you, inspector अभिषेक… " महेश हसत म्हणाला… अभीही हसू लागला ते ऐकून. आणि गाडी सुरु झाली , दोघे निघाले पुन्हा मुंबईच्या वाटेवर.




- समाप्त -

Return to “Marathi Stories”