/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

सिल्क स्मिता आणि मर्लिन मन्रो

User avatar
rangila
Super member
Posts: 5702
Joined: Mon Aug 17, 2015 11:20 am

सिल्क स्मिता आणि मर्लिन मन्रो

Post by rangila »

सिल्क स्मिता आणि मर्लिन मन्रो

सातासमुद्रापल्याडची हॉलीवूडची सिनेतारका र्मलिन मन्रो आणि भारतातील व्हँप चंचला सिल्क-स्मिता म्हणजे सिनेरसिकांच्या दिल की नशिली धडकन होत्या. आत्ताच्या विशी-तिशीतील तरुण पिढीला या दोघींची माहिती असण्याचं काही कारण नाही; पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एकता कपूर निर्माती असणार्‍या आणि आजवर घरंदाज, सोज्वळ भूमिका करणार्‍या विद्या बालनने आपली वस्त्रे उतरवत धिटाईने साकारलेल्या ‘डर्टी पिक्चर’मधील ‘सिल्क’च्या भूमिकेमुळे सिल्क-स्मिताची याद तरो-ताजा झाली आहे. सिल्क-स्मिता ही ऐंशी-नव्वदच्या दशकांमधील तमिळ चित्रपटातील प्रचंड सेक्स अपिल अस णारी मदनिका. १९६0 च्या डिसेंबरमध्ये ती जन्माला आली आणि १९९६ च्या सप्टेंबरमध्ये वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी मद्रासमधील (आजचे चेन्नई) स्वत:च्या अपार्टमेंटमध्ये फास घेऊन ही रंगीत दुनिया सोडून कायमची चालती झाली. सिल्क स्मिताचं खरं नाव विजयालक्ष्मी. आंध्र प्रदेशातील चेलरू या गावात ती जन्मली. घरात प्रचंड दारिद्रय़. पैश्याअभावी इयत्ता चौथीतच तिला शाळेला रामराम ठोकावा लागला. तिच्या रुपड्यावर भाळलेले पुरुष तिच्याभोवती पिंगा घालू लागले म्हणून कमी वयातच आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं; पण नवर्‍यानं आणि सासरच्या मंडळींनी तिला फार छळलं. त्यामुळे विजयालक्ष्मी घरातून पळून चेन्नईला तिच्या मावशीकडे राहायला आली. तिच्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात एक्स्ट्राँच्या गर्दीत उभं राहूनच झाली. बी-ग्रेडच्या छोट्या भूमिका तिला मिळू लागल्या. मग फिल्ममध्ये असतो तस्साच टर्न तिच्याही आयुष्यात आला. चक्क पिठाच्या गिरणीवर बिनू चक्रवर्ती या सिनेदिग्दर्शकाने तिला हेरले आणि स्मिता असे तिचे नामकरण केले. चक्रवर्तीच्या बायकोने स्मिताला इंग्लिश शिकवले. नंतर स्मिता नृत्यही शिकली आणि १९७९ मध्ये एका मल्याळम फिल्ममधून तिनं स्वत:ला पूर्ण एक्स्पोज करून तिच्यातील मदनमंजिरीचे दर्शन आम पब्लिकला घडविले. तेव्हापासून कॅब्रे डान्सर या कॅटेगरीतील भूमिका तिनं साकारायला सुरुवात केली. १९७९ च्या एका तमिळ फिल्ममध्ये तिच्या व्यक्तिरेखेचं नाव ‘सिल्क’ होते. अखेरीस विजयालक्ष्मी या सुरवंटाचे सिल्क-स्मिता या फुलपाखरात रूपांतर झाले. तेलगू, मल्याळम, कन्नड आणि ‘रेश्मा की जवानी’सारख्या हिंदी चित्रपटातून तिनं बेदरकारपणे केलेल्या देहप्रदर्शनामुळे तिला ‘सॉफ्ट पॉर्न अँक्ट्रेस’ असे संबोधले जाऊ लागले. अनेक भिक्कार सिनेमे जे कायमचे डब्यात गंजत पडले असते त्यांना सिल्क स्मिताच्या उत्तान नृत्याचा स्पर्श होऊन ते बॉक्सऑफिसवर हिट झाले. एकूण साडेचारशे चित्रपटांतून आपल्या मादक अदाकारीने तमाम दक्षिण भारतीय जनतेला घायाळ करत तिने सतरा वर्षं चंदेरी पडद्यावर राज्य केले. बहुसंख्य ‘नीतिमान’ मध्यमवर्गीयांनी आपले संसार एकपत्नी व्रत पाळत सांभाळले असले, तरी त्यांच्या फँटसीच्या दुनियेत ‘शयनेषू रंभा’ सिल्कच होती. अत्यंत बंडखोरपणे या प्रमत्त प्रमदेने स्वत:चा देह कॅमेरापुढे पेश केला. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातही तिनं सार्‍याच परंपरांना ठोकरलं आणि बंडखोरीची किंमत मृत्यूला कवटाळून अदा केली. एकदा स्टुडिओमध्ये शिवाजी गणेशन अचानक आले होते. तमिळ सिनेमाचे दैवत आल्यावर सार्‍यांनीच उठून त्यांना मानवंदना दिली. पायावर पाय टाकून बेदरकारपणे बसून राहिली ती फक्त सिल्कच! नंतर तिला विचारल्यावर तिची प्रतिक्रिया खांदे उडवत ‘सो व्हॉट’ अशीच, एवढीच होती. १९५0-६0 च्या दशकात अशीच एक मिठी छुरी सिनेरसिकांना घायाळ करत होती. तिचं नाव होतं र्मलिन मन्रो. प्लेबॉयपासून ते लाईफपर्यंतच्या मासिकांच्या कव्हरवर आपले न्यूड आणि हाफन्यूड फोटो बिनदिक्कतपणे देऊन चित्रपटात बिकीनीमध्ये वावरून तिनं तहलका मचवला होता. नोबेल पुरस्कार विजेते नाटककार ऑर्थर मिलरपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीपर्यंतच्या पुरुषोत्तमांना तिनं आपल्या मादक अदाकारीनं प्रेमदिवानं करून सोडलं. ‘र्मलिनचं नुसतं हंसगती चालणं पाहण्यासाठी आम्ही ‘नाथगारा’ दहादा-पंधरादा पाहिला,’ असं सांगणारे अनेक बुजुर्ग आजही आपल्याला भेटतात. १९२६ मध्ये लॉसएंजलीसमध्ये जन्माला आलेली नॉर्मा जीन बेकर म्हणजेच र्मलिन मन्रो. तिच्या जन्म दाखल्यावर आई व पित्याचं नाव होतं; पण पित्याच्या निवासस्थानाचा पत्ताच नव्हता. आईच्या गर्भातही र्मलिन अवतरली होती ते आईबापांच्या घटस्फोटानंतरच. ‘एक नकोशी असणारी अनौरस, अनाथ मुलगी’ असं स्वत:चं वर्णन तिनं केलंय. आई मनोरुग्ण झाल्याने कायमची इस्पितळात दाखल झाली आणि नॉर्माला आईच्या जीवलग मैत्रिणीने ग्रेसने सांभाळायला आणले. सिनेमाचं खूळही ग्रेसनेच नॉर्माला लावले; पण ग्रेसने लग्न केल्यामुळे नॉर्माची रवानगी अनाथालयात झाली. नंतर मग शाळेत जाणार्‍या नॉर्माला परत ग्रेसची आजी ऑलीव्हकडे पाठवलं गेलं. तेथे ऑलीव्हच्या तरुण पोरांनी नॉर्मावर लैंगिक अत्याचार केले. ते घाव पुढील आयुष्यातही नॉर्मा पुसू शकली नाही. नंतरच्या आयुष्यातील तिचं स्वैर लैंगिक वर्तन, निद्रानाश, कुठलंही नातं सांभाळता न येणं, उद्दामपणे शिवीगाळ याची बिजं तिच्या बालपणीच्या अनुभवांत दडलेली होती. १९४२ मध्ये नॉर्मा परत ग्रेसकडे आश्रयाला आली. अनाथालयात जायला नको म्हणून तिनं शेजारच्या जेम्सला लग्नाची गळ घातली. लग्न होऊन ते एकत्र राहू लागले; पण तोपर्यंत दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि एका व्यापारी बोटीवर जेम्स निघून गेला. पोट भरण्यासाठी नॉर्माने विमानाचे पार्टस् तयार करायच्या फॅक्टरीत नोकरी धरली. तेथे आर्मी फोटोग्राफर डेव्हीडने तिचे फोटो काढले व ते फोटो ‘चाक’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले. डेव्हीडच्या प्रोत्साहनाने नॉर्माने ब्ल्यू बूक मॉडेलिंग एजन्सीमध्ये नाव नोंदवलं आणि ती एक यशस्वी मॉडेल होऊन डझनभर मासिकांच्या कव्हरवर झळकली. टष्‍द्वेंटिथ सेंच्युरी फोक्स सिनेकंपनीच्या लेऑन या दिग्दर्शकाने तिची स्क्रीन टेस्ट घेतली. लेऑन आणि त्याच्या बायकोनं नॉर्माचं नाव बदलून र्मलिन केलं. र्मलिनने आपल्या आईचे माहेरचे आडनाव मन्रो त्याला जोडून घेतलं. र्मलिन मन्रो हे नाव चंदेरी दुनियेत आजही एक दंतकथा. लिजेण्ड होऊन राहिलं आहे. र्मलिनने आपल्या भूमिकांसाठी गोल्डन ग्लोब, पारितोषिकांसाठी नॉमिनेशनही मिळवले. ‘समलाईक इट हॉट’ या सिनेमाकरिता तिला बेस्ट अँक्ट्रेस अँवॉर्डही लाभला. तिची ‘नायगारा’तील रोज अविस्मरणीय होती. ‘डायमंडस् आर अ गर्लस् बेस्ट फ्रेंडस्’, डोन्ट बॉदर टू नॉक’ ‘हाऊ टू मॅरी अ मिलीऑनर’, रीव्हर ऑफ नो रिटर्न’, ‘मंकी बिझनेस’ अशा सिनेमांतून आपल्या मादक विभ्रमांनी तिनं दुनियेला भुरळ घातली. तिची तीन लगं्न झाली तीनही लग्नांची परिणती घटस्फोट. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडीं बरोबरच्या प्रेमप्रकरणातील अपयश यामुळे र्मलिन मन्रो प्रचंड एकाकी झाली होती. विसरता न येणारा भूतकाळ, अनाथपणाची मोहर ललाटी लागलेली, तारुण्याच्या उंबरठय़ावरच पोट भरण्यासाठी कॅलेंडरना न्यूड फोटोग्राफ्स देऊन बसलेली ही मदालसा. दारुण निराशा, सततचे मद्यपान, ड्रग्ज, मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली ट्रँक्विलायझर या सार्‍या विषारी विळख्यात सापडली होती. ‘प्राणावर नभ धरणारा’ कुणी तिला भेटलाच नाही. क्षणभरचा विरंगुळा शोधणार्‍या नरांच्या वासनेची ती शिकार होत राहिली. ट्रँक्विलायझरचा जादा डोस घेऊन तिनं आत्महत्त्या केली, असं म्हटलं जातं. तरीही ती हत्त्या की आत्महत्त्या, असे वादळ तिच्याभोवती आजही घोंगावते आहे. १९६२ च्या जुलै महिन्यात लॉसएंजलीसमधील तिच्या घरी ती मृतावस्थेत सापडली तेव्हा तिचं वय फक्त छत्तीस वर्ष होतं. मरणाआधी तिनं केलेला शेवटचा फोन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना होता. केनेडीबरोबर असणार्‍या सुतावरून ती स्वर्गाला पोहोचली. जॉन केनेडी विवाहित होते. जॅकलीनसारखी सुंदर, बुद्धिमान पत्नी त्यांना लाभली होती. तरीही र्मलिन लग्नासाठीचा तगादा अध्यक्षांच्या मागे लावत होती; पण तिच्या पदरी निराशा व वैफल्यच आले. त्या दु:खातून सावरण्यासाठी ती आधार शोधायला राष्ट्राध्यक्षांचे बंधू रॉबर्ट केनेडीकडे वळली. तिच्या अखेरच्या दिवशीही रॉबर्ट तिला भेटला होता. मात्र, र्मलिनचा मृत्यूच्या आधीचा फोन जॉन केनेडींना आला होता. सिल्क स्मिता आणि र्मलिन मन्रोच्या आयुष्याची जी शोकांतिका झाली त्याला त्यांचे बालपण, दारिद्रय़, वज्रलेप एकाकीपण, प्रेमबंधातील अपयश, चंदेरी ग्लॅमरस दुनियेची त्यांना पडलेली भुरळ आणि त्यांचं वाहवत जाणं, व्यसनाधीन होणं कारणीभूत ठरलं. या दोघी जणी गेल्या त्याच चिंचोळ्या घसरणीच्या वाटेने फॅशन, मॉडेलिंग व सिनेजगतातील अनेक जणी मृत्यूच्या खोल दरीत अदृश्य झाल्या. २00२ मध्ये मुंबईत आत्महत्त्या केलेली तेवीस वर्षांची मॉडेल राखी चौधरी, बाविसाव्या मजल्यावरून उडी घेऊन आपला अंत करणारी दिल्लीतील अठरा वर्षांची गायिका सोम्या शर्मा, एकवीस वर्षांची तमिळ अभिनेत्री मोनल, १९९६ मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळालेली तेलगू व हिंदी अभिनेत्री दिव्या भारती, २000 मध्ये प्रेमभंगामुळे आत्मघात करून घेतलेली सत्तावीस वर्षांची अभिनेत्री विजी, एकतीस वर्षांंची मॉडेल नताशा सिंग, नटवरसिंगांची कन्या- एकतीस वर्षांची मॉडेल रितू सिंग या सार्‍या जणींनी स्वत:हून जगाचा निरोप घेतला. जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केलं आहे की, येत्या दशकात हार्ट अँटॅक किंवा कॅन्सरपेक्षाही दारुण निराशेपोटी आत्महत्त्या केलेल्या स्त्रियांचे प्रमाण अधिक असेल. असहायता, थकवा, निद्रानाश, अकारण होणारी चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, प्रचंड अपराधीपण, भावनिक आधार देण्यास कुणीही नसणं, अंमली पदार्थ व दारूच्या आहारी जाणं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे प्रेमबंधातील अपयश. या सर्वांंमुळे ऐहिक जीवनात यशोशिखरावर असणार्‍या, लक्ष्मीची मेहरनजर असणार्‍या तरुणींची पावलं मृत्यूच्या दरीकडे वळत आहेत. क्वचितप्रसंगी मेंदूतील रासायनिक बदल किंवा कुटुंबात आत्महत्त्येची काही पूर्वपीठिका असणं, अशीही कारणं आत्महत्त्येच्या पाठीमागे असतात. आपल्याला स्वातंत्र्याच्या नावाखाली भावनिक, आर्थिक आणि लैंगिक स्वैराचार हवा असेल, तर त्याची जबरदस्त किंमत म्हणजे भ्रमनिरास होऊन आत्मघात करून घेणे ठरू शकतो

Return to “Marathi Stories”