एक छोटीशी चूक
मित्रांनो.. हि कथा माझी नाही तर मला हि कथा इंटरनेटवरील एका फोरममध्ये इंग्लिश रुपात मिळाली होती. त्यावेळी मला ती आवडली म्हणून मी त्या कथेचा स्वैर मराठी अनुवाद करून आपल्या सेवेत सदर करीत आहे. मूळ कथेचा गाभा तसाच ठेवून मी कथेत थोडेफार बदल व काही ठिकाणी नवीन भाग जोडून हि कथा वाचनीय करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या कथेचे सर्व श्रेय मुळ कथेच्या लेखकाला जाते. पहा तुम्हाला आवडते का ???
शोभा टीव्ही समोर पहुडली होती आणि बाकी सगळे एकेक करत आपापल्या रुममध्ये झोपायला गेलेले होते. शोभा आणि शरद हे नवरा-बायको, शरदच्या मोठ्या भावाच्या नवीन बंगल्यात सुट्टीत राहण्यास आलेले होते. शरदच्या मोठ्या भावाने म्हणजे अविनाशने नुकताच हा नवीन दुमजली बंगला घेतला होता. इतक्या मोठ्या बंगल्यात अविनाश, त्याची बायको दीप्ती आणि त्यांचा मुलगा अजय असे तीनच जण राहत होते. रात्रीच्या वेळी ते सर्वजण एक रहस्यमय चित्रपट पाहत होते आणि इतर मसाला चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातदेखील काही मसाला दृश्ये होती. चित्रपटात एक उत्कट प्रणयाचा सीन सुरु झाल्याबरोबर अजय तिथून निघून गेला होता. अविनाश आणि दीप्ती 'तो' सीन पाहून थोडेशे गारठल्यासारखे झाले होते आणि त्याचवेळी आपल्या मुलाचा अजयचा समंजसपण पाहून दीप्तीला खूप अभिमान वाटला होता.
बंगल्यातील सर्व बेडरूम वरच्या मजल्यावर होती आणि संध्याकाळी ते सर्वजण इथे आल्यापासून कोणीही वरती गेलेले नव्हते. नोकरच सर्व सामान घेवून आले होते आणि त्यांनीच ते वरच्या खोल्यांमध्ये नेऊन ठेवले होते. बाहेर हॉटेलमध्ये जेवण झाल्याने घरात आल्यावर लगेचच दोन्ही भावांनी ड्रिंक्स बनवायला घेतले होते आणि त्यांच्या बरोबरच दोन्ही स्त्रियांनीही मद्यपान केले. जरी असे असले तरी कुटुंबातील मोठ्यांच्या छत्र-छायेत सर्व जण पारंपारिक पद्धतीने होत होते. घरातील स्त्रिया सौभाग्यलेणी आणि साडी नेसून वावरायच्या. मोठ्यांच्या समोर स्त्रिया डोक्यावर पदर ढळू देत नसत. अविनाश शोभाचा मोठा दीर असल्याने ती त्याच्या समोर देखील डोक्यावर पदर घेऊन वावरत असे.
अविनाश आणि शरद मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहत असल्याने आणि आपापल्या नोकरीच्या ठिकाणी मोठ्या पदावर काम करीत असल्याने घरातील वातावरण थोड्याफार प्रमाणात उदारमतवादी आणि मुक्त विचारसरणीचे होते. घरातील सर्व स्त्रियांना मान-सन्मान आणि त्यांच्या मताला, इच्छेला किंमत होती. फक्त जेव्हा घरातील जेष्ठ व्यक्ती जसे आई-वडील जेव्हा दोन्ही भावांकडे येत असत, तेव्हा मात्र घरातील सर्व व्यवहार पारंपारिक रीतीने होत असत.
शोभा एका मुक्त-विचारसरणी आणि मुक्त-वातावरण असलेल्या घरातून आलेली होती त्यामुळे इथे पुराणमतवादी कुटुंबात वावरताना ती जास्त काळजी घेत असे. दीप्ती दिल्लीतील अशाच चांगल्या कुटुंबातून आलेली होती. प्रवासाला जाताना जेव्हा कधी आई-वडील, सासू-सासरे बरोबर नसतील तेव्हा तेव्हा शोभा व दीप्ती नवीन फॅशनचे कपडे वापरायच्या. शोभा आणि दिप्तीमध्ये पाच वर्षांचे अंतर होते,