तू असा कसा आहेस
कांचन ही साधारण तिशीत पोहोचलेली तरुणी. दिसायला सुंदर, अगदी एखाद्या प्रोफेशनल मॉडेलसारखी. स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभी असलेली आणि स्वतःचे सर्व निर्णय स्वतःच घेणारी मुलगी.
एकोणीस-वीस वर्षांची असताना कांचनला वाटायचं की ती आजूबाजूच्या सभ्य जगातल्या सगळ्या मुली-बायकांपेक्षा वेगळी आहे. लैंगिक विचारांनी पिसाटलेलं वय होतं ते. आपल्याइतके घाणेरडे विचार इतर कुठलीच मुलगी-बाई करु शकत नाही, असं तिला वाटायचं.
दोन-तीन वर्षांतच तिच्या लक्षात आलं की, लग्नाआधी आणि लग्नानंतर दुसऱ्या पुरुषांबद्दल विचार करणाऱ्या आणि जमलं तर त्यांच्याशी संबंधसुद्धा ठेवणाऱ्या खूप बायका-मुली आपल्या आजूबाजूला आहेत.
तसंच, लग्न झालेल्या पुरुषासोबत झोपणारी ती जगातली एकमेव तरुण मुलगी नाही हेही तिला कळालं. पन्नाशीला पोहोचलेल्या पुरुषासोबत अफेअर करणाऱ्या आपल्यासारख्या इतरही पंचविशीतल्या तरुण मुली आहेत, हेसुद्धा तिला कळून चुकलं.
“पण कांचन, तुझं समीरवर मनापासून प्रेम होतं, फक्त अफेअर नव्हतं ते…” ती एखादा मंत्र म्हटल्यासारखं हे वाक्य स्वतःला सतत ऐकवायची.
“समीर, तू त्या बाईमध्ये का अडकून पडलायस रे? सुंदर मेकअपमागं दडलेल्या तिच्या चेहऱ्यावरचे धूर्त भाव तुला इतक्या वर्षांत कसे काय दिसले नाहीत रे? तिचं तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम आहे आणि तू तिच्यासाठी मला विसरायला तयार झालास. आपल्या दोघांच्या वयातलं अंतर विसरुन मी तुला आपलं सर्वस्व दिलं. पण तुझ्या बायकोचा दर्जा मात्र तू त्या कारस्थानी बाईलाच दिलास. इतका कसा निष्ठूर वागू शकतोस तू, समीर?”
कांचनच्या मनात असे काही विचार अजूनही येत असले तरी, समीरचा अध्याय आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून संपलेला आहे, हे तिनं आता मान्य केलं होतं.
अजून तारीख ठरली नसली तरी, येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ती अर्जुनशी लग्न करणार होती. अर्जुन वयानं तरुण होता, दिसायला रुबाबदार होता, सगळ्या कामांत उत्साही होता आणि सगळ्यांत विशेष म्हणजे त्याचं हे पहिलंच लग्न आणि कदाचित पहिलंच सिरीयस अफेयर होतं.
आता कांचनचं लग्न होणार असल्यानं समीरला ती पुन्हा कधीच मिळू शकणार नव्हती, हे समीरचं फार मोठं दुर्दैवच… असं निदान कांचनला तरी वाटत होतं.
अर्थात, अर्जुन हा समीरएवढा हळुवार, कांचनला फुलवत नेऊन प्रणयाची मजा देणारा जोडीदार नव्हता. पण त्याबद्दल कांचनची काहीच तक्रार नव्हती. तो हे सगळं शिकून घेईल याची तिला खात्री होती.
एकदा लग्न झालं की त्याला या गोष्टी शिकवण्यासाठी तिच्याकडं वेळच वेळ होता. मग ती त्याला आपल्या शरीराची ओळख करुन देणार होती. तिच्या सुख मिळवण्याच्या युक्त्या ती त्याला शिकवणार होती. त्याच्या तरुण शरीराची चव ती दररोज चाखणार होती. मग त्यांचा प्रणय फुलतच जाणार होता. महिनोन् महिने, वर्षानुवर्षे…
‘पुरुषांच्या मनात दर तिसऱ्या सेकंदाला सेक्सचा विचार येतो’ असं म्हणतात. कांचनच्या मनात मात्र दुसरा काहीतरी विचार येईपर्यंत सेक्सचाच विचार असायचा.
आत्तासुद्धा पासपोर्ट ऑफीसच्या ह्या कंटाळवाण्या रांगेत ती इतका वेळ उभी राहू शकण्याचं कारण तिच्या डोक्यात सुरु असलेले हे शारीरिक सुखाचे विचारच होते.
तिला जाणवत होता तिचे गच्च नितंब कुस्करणारा तिच्या प्रियकराचा हात आणि त्याचवेळी तिच्या मानेवरुन घरंगळत खाली जाणारा त्याच्या ओठांचा गरम आणि ओला स्पर्श. तिच्या ब्रेसियरच्या कडांमधून आत घुसू पाहणाऱ्या जीभेच्या स्पर्शानं तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
“कांचन?” त्याचा आवाज तिच्या कानात घुमला.
इतका ओळखीचा आवाज? तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्याच्या स्पर्शासोबत त्याचा आवाजसुद्धा आता ती ऐकू शकत होती.
“कांचन… कांचन, मी कधीपासून तुझं नाव पुकारतोय. कुठं हरवलीयेस?”
हा त्याचाच आवाज आहे. पण आत्ता? इथं? तोच असेल का? तिच्या छातीतली धडधड अचानक वाढली, जणू तिचं हृदय उसळी मारुन बाहेर यायला धडपडत होतं.
असंच धडका देत राहिलं तर ते खरंच बाहेर येईल, असं वाटून नकळत तिनं आपला हात छातीवर दाबून ठेवला आणि काही कळायच्या आत ती बोलून गेली, “मी तुझ्याच आठवणींत हरवलीये, समीर…”