अरूणचं काय चुकलं? (सत्य घटनेवर आधारित शृंगारिक वस्था)
(फक्त प्रौढांसाठी)
भाग १
अरूण माझा वर्गमित्र. आठवी ते दहावी आम्ही एकाच वर्गात होतो. त्याला एक मोठा भाऊ होता. तसेच त्याच्याहून एक लहान भाऊ व बहिणही होती. त्याचे वडील एका सरकारी कार्यालयात कारकून होते. घरी आई होती. त्यांचं घर आमच्याच गल्लीत होतं.
अरूण एक साधासुधा, शांत स्वभावाचा मुलगा होता. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. घरी तसेच वर्गातही. त्या उलट मी हुशार असलो तरी तसा उचापती होतो. मी शाळेच्या सर्व अॅक्टीव्हीटीज मध्ये भाग घ्यायचो.
आम्ही दोघेही दहावी पास झालो. मी प्रथम वर्गात तर अरूण जेमतेम पास झाला. मी कॉलेजमध्ये गेलो. तर हा नोकरीच्या शोधात लागला. अठरा वर्षे पूर्ण होताच आमच्या गावाला लागूनच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कारखान्यात तो लेथ मशिन ऑपरेटर म्हणून लागला. त्याच कारखान्यात त्याचा मामाही काम करत होता. मामानेच त्याला नोकरीला लावले होते. एका उपनगरात त्याच्या मामाचे दोन खोल्यांचे घर होतं. अधून-मधून तो मामाकडे जात-येत असे.
अलिकडेच त्याच्या या मामाचे लग्न झालेले होते. त्याच्या मामाला मी पाहिले होते. तो दिसायला साधारण, काटकोळा होता. तर अरूण अंगापिंडाने मजबूत होता. अरूणच्या मामीलाही मी पाहिले होते. त्यावेळच्या मुलांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ती माल होती. ती असेल वीस एक वर्षांची तर मामा होता पंचविशीच्या आस-पास.
अरूणची मामी असेल साडे पाच फूट उंचीची. मामा तिच्यापुढे बुटका वाटायचा. ती रंगाने गोरी होती. तिचे केस लांबसडक होते. अंगाने ती भरलेली होती. जवानी तिच्या अंगा-प्रत्यंगातून नुसती ओसंडून वाहत होती. तिला पाहताच मला जुनी सिनेमा नटी माला सिन्हाची आठवण झाली होती.
इतपर्यंत सगळे ठीक होते. एके दिवशी मला अचानक समजले की अरूणच्या मामाची तब्येत अचानक बिघडली होती. त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. डॉक्टरानी त्याच्या आजाराचे कारण टी. बी. (क्षयरोग) सांगितले होते. पूर्वीपासूनच अरूणचा या मामाकडे ओढा अधिक होता. त्यातच त्यानेच त्याला नोकरीला लावले होते. त्यामुळे मामाच्या आजारपणात अरूण त्याची सेवा करू लागला. अधून-मधून तो त्याच्या घरातच राहू लागला होता.
.
.
..
.
या आजारातच अरूणच्या मामाचे निधन झाले. त्याचे लग्न होऊन वर्षही झाले नव्हते. त्याची जवान मामी अकाली विधवा झाली होती. हे सारेच धक्कादायक होते. आम्ही सर्वच जण हळहळलो.
असेच काही दिवस गेले अणि अचानक एके दिवशी संध्याकाळी मला समजले की अरूण त्याच्या घरी आला होता. त्याचे व त्याच्या आई-वडीलांचे कडाक्याचे भांडण झाले होते. बांबुची काठी घेऊन तो आपल्या आई-वडीलाना मारायला धावला होता. त्याचा लहान भाऊ, बहिण घरी होते; नाहीतर त्याने आपल्या जन्मदात्या आई-वडीलांचे डोकेच फोडले असते; नक्कीच.
हे सारे ऐकूण मला धक्काच बसला. एक अतिशय सुशील. शांत स्वभावाचा. सभ्य मुलगा असे करेल? याच्यावर कुणाचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. हळुहळू गल्लीत कुजबूज सुरू झाली. ती अशी होती की अरूणचे आणि त्याच्या विधवा मामीचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. मामाच्या निधनानंतर अरूण आता मामीच्याच घरी राहू लागला होता. तो रहात असलेल्या भागात या संबंधांची चर्चा होऊ लागली होती.
याचा राग अरूणच्या आई-वडीलाना येणे साहजिकच होते. एके दिवशी अरूण कामावर गेलेला असताना ते दोघे मामीच्या घरी गेले होते. त्याची आई मामीला म्हणाली होती. रंडकी. रोड, माझ्या भावाला खाल्लस! आता माझ्या मुलावर (अरूणवर) तुझा डोळा आहे. त्याला नादी लावतेस काय? तुझं तोंड काळं कर. या गावातून चालती हो. नाहीतर मी तुझा खून करीन! हडळ कुठली, पांढऱ्या पायाची!! इ. इ.
तर अरूणचे वडील तिला म्हणाले होते. मामी भाच्याचे नाते पवित्र असते त्याला तू बट्टा लावलास. तुला हे शोभत नाही. तुझी खाजच भागवायची असेल तर बाहेरचा कुणी पकडायचा होतास. माझ्या भोळ्या मुलाला का नासवतेस?
संध्याकाळी अरूण घरी येताच त्याला हे समजले. तशी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सायकलवरून तो तडक आपल्या घरी गेला: आई-वडीलाना जाब विचारायला. घरी पोचताच त्याला कपडे वाळत घालण्यास ठेवलेली बांबुची काठी दिसली ती त्याने घेतली व तो तिरीमिरीने आई-वडीलाना मारायला गेला होता.
सारे काही सुन्न करणारे होते. थक्क करणारे होते. आतापर्यंत मामी-भाच्याची ही अनोखी प्रेमकथा मी कधीच ऐकली नहती. मी मनातल्या मनात विचार करू लागलो. अरूण असे का वागला? जन्मदात्या आई-वडीलांपेक्षा त्याला मामी जवळची का वाटली? त्याला दुसरी कोणती जवान मुलगी मिळाली नसती का? अशा एकापेक्षा एक प्रश्नांनी माझ्या मेंदूचा भुगा होऊ लागला. मात्र जे घडले ते अघटीत होते. विलक्षण होते. निदान आपल्या मध्यमवर्गीय समाजात तरी. संपूर्ण गल्लीत तो एक चर्चेचा गरमागरम विषय होऊन राहिला होता.