"काय बघतेस, मंजू?"
"अय्टया, वहिनी, नेकलेस किती छान आहे! नवं दिसतंय! कधी घेतलंत?" मंजुषाला निलीमाच्या शेजारी रहायला येऊन काहीच दिवस झाले होते, पण निलीमाच्या अंगावर किंवा घरात तिला नेहमी काही तरी नवी वस्तू दिसायची. तिला निलीमाचा अतिशय हेवा वाटायचा.
"कालच घेतलं!" निलीमा जाणून बुजून खोटं बोलली.
"आवडलं तुला?"
"हो ना! खूपच क्यूट आहे." तिनेही त्या नेकलेस बद्दल अगोदर निलीमानेच वापरलेलं विशेषण वापरलं होतं.
"तू पण घे ना!" निलीमाने पहिला खडा टाकला.
"अहो वहिनी, माझं कुठे तुमच्या सारखं नशीब? तुम्ही कश्या नेहमी काही ना काही तरी नवं घेत असता, मला थोडी शक्य आहे!"
निलीमाला मंजुषाच्या आवाजात निषादाची किनार जाणवली.
"का गं? महेशला सांग, तो आणून देईल की तुला!" महेश मंजुषाचा पति होता. मंजुषा एकदम रडायलाच लागली. निलीमाला कळे ना की आपण असं काय बोलून गेलो की मंजुषाला रडू फुटलं. ती मंजुषाजवळ गेली.
"अगं, रडतेस कशाला? मी बोललेलं काही खटकलं का तुला? चल, रडणं थांबव अन् डोळे पूस बरी हा रुमाल घे." मंजुषाने रडणं थांबवत निलीमाने दिलेला रुमाल घेतला व आपले डोळे पुसले. त्या रुमालाला एक मंद पण धुंद करणारा सुवास येत होता. निलीमाने मंजुषाचा हात आपल्या हातात घेतला व तिला सोफ्यावर बसवून आपण तिच्या जवळ बसली. "कसं शहाण्या सारखं रडणं थांबवलंस! आता सांग मला सगळं. काही लपवू नकोस माझ्या पासून." मंजुषा निलीमाला 'वहिनी' म्हणून संबोधायची, पण ती तिला मोद्या बहिणीसारखीच वाटायची. आपलया अडचणी, घरातल्या कुरबुरी ती मोकळेपणाने निलीमाला सांगायची. मग ती सुद्धा मंजुषाला शक्य ती मदत करायची. त्यामुळे, आताही तिला निलीमासमोर आपलं मन मोकळं करण्यात काही वावगं वाटलं नाही. "वहिनी, तुम्हाला तर माहितच आहे की महेश हा भावंडांमधला थोरला आहे. त्याचे वडील रिटाटार झाले आहेत, धाकटा भाऊ प्रायव्हेट इंजिनीयरींग कॉलेजमधे शिकतो आहे आणि बहीणही आता लग्नाला आलेली आहे. त्यामुळे, महेशला गावी खर्चासाठी पैसे धाडावे लागतात. निम्म्याहून अधिक पगार असाच जातो. मला मान इकडे बरीच ओढाताण होते. आणि आत्ता नणंदेच्या लग्नासाठीही काहीतरी व्यवस्था करावी लागेल. ह्या सगळ्यामुळे मला आपल्या आवडीनिवडी माराव्या लागतात.
आता तुम्हीच सांगा मी काय करू."
"तुझं म्हणणं खरं आहे गं. तुझा दीर इंजिनीयार झाल्यावर मग महेशवर इतका ताण नाही येणार."
"अहो वहिनी, तो आता पहिल्या वर्षाला आहे. म्हणजे जवळपास चार वर्ष शिक्षणातच जातील. आणि त्यानंतर जेव्हा कमाईला लागेल तेव्हा खरं!" तिचा आनाज पुन्हा केविलवाणा झाला होता.
"मंजु, तू बाई रडू नकोस गं. थां मी कॉफी करून आणते, ती घे, तुला फ्रेश वाटेल. मग आपण बघू काही मार्ग निघतो का." असे म्हणून निलीमा किचन मधे गेली. मंजुषाचा प्रॉब्लेम ऐकल्यावर, तिला नरेनसाठी गटवता येईल असा निलीमाला विश्वास वाटू लागला. थोड्या वेळात कॉफी करून ती हॉलमधे घेऊन आली. मंजुषाही सावरली होती. दोघींचं कॉफीपान झालं. उष्ट्या कपबशा घेऊन निलीमाने किचनच्या सिंक मधे मोलकरणीसाठी ठेऊन दिल्यात. हात पुसत ती पुन्हा बाहेर आली.
"अहो बहिनी ... तुम्हाला एक विचारू का?"
"विचार ना!"
"मी जेव्हा तुमच्याकडे बघते, तेव्हा तुम्ही नेहमीच फ्रेश दिसता. आता मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तुम्हीच जास्त आकर्षक दिसता."
"मंजु, मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा तुलाच एक प्रश्न विचारते. खरं खरं उत्तर द्यायचं हं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातच मिळेल तुला."
"इश्श्य, विचारा की!"
"महेश तुझ्याकडे लक्ष देत नाही का गं?" निलीमाने लक्ष शब्दावर सहेतुक जोर दिला. मंजुषाला पटकन उमगलं, निलीमाला काय म्हणायचंय ते. तिचा चेहरा खाली झुकला.
"अगं, सांग ना!"