पावसाळी रात्र
'आयचा घो ह्या पावसाच्या... धरण फुटल्यासारखा बदाबदा गळतोय... साला, कधी थांबणार कोणास ठाऊक?'...
मनातल्या मनात मी धुंवाधार कोसळणाऱ्या पावसाला दोष देत माझी कार ढकलत होतो... मला जायचे होते त्या तालुक्याच्या गावाच्या अलीकडे अर्ध्या तासाच्या रस्त्यावर माझी कार बंद पडली होती. सगळीकडे सुनसान होते आणि एखादीच गाडी रस्त्याने जाताना दिसत होती... आता काय करायचे ह्याचा मी विचार केला. पाऊस कधी थांबेल ह्याचे काही चिन्ह दिसत नव्हते आणि गाडी अशी येथेच ऊभी ठेवली तर आपोआप रिपेअर होणार नव्हती... आधी मी विचार केला की गाडी तिथेच सोडुन जवळपास कोठे एखादे गॅरेज किंवा मेकॅनिक भेटतो का हे चेक करुया. पण किती वेळ जाईल ह्याचा काही अंदाज नव्हता आणि तितका वेळ गाडी अशीच सुनसान जागी सोडुन गेलो तर चोरीला जाण्याची भिती होती.
शेवटी मी ठरवले की गाडी स्वत:च ढकलत ढकलत होईल तितके दूर जावे आणि एखादे घर किंवा दुकान वगैरे लागले तर तेथे गाडी ठेवावी... मग मी गाडी न्युट्रलमध्ये टाकुन एक दरवाजा उघडुन स्टेअरींग धरत ढकलायला लागलो... मी नियमित व्यायाम करणारा होतो त्यामुळे एकट्याने अशी गाडी ढकलायला मला जास्त कष्ट वाटत नव्हते... गाडी ढकलता ढकलता मी विचारांच्या महापूरात वहावत गेलो...
साधारण १५/१६ वर्षापुर्वी मी माझ्या गावातून पळालो होतो त्यावेळीही असाच पाऊस पडत होता... इतका मुसळधार नाही पण बऱ्यापैकी पडत होता... त्यावेळी मी जेमतेम १४ वर्षाचा होतो... गावातून मी पळत तालुक्याच्या गावाकडील रस्त्याला लागलो होतो आणि एका ट्रकमध्ये बसून तालुक्याचे गाव गाठले होते... तालुक्याच्या गावाला लागुन रेल्वे स्टेशन होते... रात्रीच्या एका ट्रेनमध्ये मी बसलो आणि मुंबईकडे निघालो... अंगावर एक ड्रेस आणि खिशात वश्या, म्हणजे माझा मित्र वसंतकडुन घेतलेले ३०० रुपये होते... मुंबईला जावुन मी काय करणार आणि माझे पुढे कसे होणार ह्याची कसलीही चिंता माझ्या मनात नव्हती. एकदा निर्धार करुन बाहेर पडलोच आहे तर आता नशीब जेथे कोठे नेईल तेथे जायचे असे मी ठरवले होते...
सकाळी मी मुंबईला वि.टी. स्टेशनला पोहचलो आणि गर्दीत मिसळुन बाहेर पडलो... आणि मग मुंबईच्या गर्दीत पुढे मी कसा वहावत गेलो आणि घडलो हे सांगायचे म्हटले तर एक पुस्तक लिहुन होईल... इतकेच सांगतो की जमेल तसे आणि झेपेल इतकेच शिकलो... भरपूर काबाडकष्ट केले आणि करत राहिलो... दुनियादारी शिकलो, संधी मिळेल तसे प्रगती करत गेलो आणि मुंबईमध्ये स्वत:चे एक स्थान बनवले... रिअल इस्टेट क्षेत्रात शिरलो आणि स्वत:चा व्यवसाय काढत बिल्डर झालो... आता माझ्याकडे स्वत:चे घर, गाडी, थोडी फार प्रॉपर्टी आणि भरपूर पैसा होता... पहिल्यापासून एकटाच असल्याने छान छौकीत राहिलो आणि ऐश करत जगलो...
म्हटले तर सगळे होते पण तरीही काहितरी कमी होती... शेवटी काही झाले तरी तुमची नाळ जिथे आहे किंवा तुम्ही जेथुन आलात त्या जागेला कधी विसरता येत नाही... गेले काही महिने मला माझ्या जन्म गावाची आठवण खूप सतावत होती... माझ्या कुटुंबाची मला फार आठवण येत होती... मनातून सतत वाटत होते की गावी जावे आणि आपल्या कुटूंबाला भेटावे... आपण आता इतके कमवतोय ते कोणासाठी?? इतका पैसा मिळवतोय त्याचा आपल्या कुटूंबाला काय फायदा?? ते सगळे कसे असतील, कसे रहात असतील??? मी इतके ऐशोआरामात रहातोय पण ते कसे जगत असतील?? अश्या अनेक प्रश्नांनी मला भंडावुन सोडले आणि मी गावाला भेट द्यायचा निश्चय केला...
त्याप्रमाणे मी सकाळी माझी कार घेवुन मुंबईवरुन निघालो आणि तेव्हा पासूनच रिमझिम पाऊस पडत होता... घाट चढुन वर आल्यानंतर जो धुवाधार पाऊस पडायला लागला ते एक क्षणही थांबायचे नाव घेत नव्हता... संततधार पाऊस आणि ओलाव्यामुळे सगळीकडे धुके होते... काळ्याकुटट ढगांनी सगळीकडे अंधारी आली होती त्यामुळे दुपारचे चार वाजुन गेले तसे रात्र झाल्यासारखे वाटत होते... सहाला तर मध्य रात्र उलटल्यासारखा अंधार सर्वत्र पसरला होता... मेन हायवेवर गाड्यांची वर्दळ होती, गावे लागत होती. पण हायवे सोडुन मी माझ्या गावाच्या जवळील तालुक्याच्या रस्त्याला लागलो तसे रस्त्याला एखाद दुसरी गाडी दिसत होती... त्यात माझी कार बंद पडली तेव्हा तिला ढकलत पुढे गेल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. आश्चर्य म्हणजे कोठेही गाव किंवा वस्तीची चिन्ह दिसत नव्हती... तालुक्याचे गाव अगदी जवळ होते पण एवढ्या पटट्यात एकही घर किंवा दुकान दिसत नव्हते... रेग्युलर व्यायाम करुन कमवलेली बॉडी आता कामाला येत होती... एकट्य़ाने कार ढकलत न्यायला मला जास्त त्रास पडत नव्हता...
आणि तेवढ्यात मला अंधारात घरासारखी आकृती दिसली!... निरखुन पाहिल्यावर ते घरच असल्याची खात्री झाली आणि माझ्या त्रस्त मनाला दिलासा मिळाला... ते घर पुढे शंभर पाऊलावर रस्त्याच्या बाजुला पंचवीस एक फूट आत होते... कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात कोठे खडडा तर नाही ना ह्याची खात्री करुन मी कार ढकलत रस्त्यावरुन खाली उतरवली आणि त्या घराच्या दिशेने ढकलू लागलो... डांबराच्या रस्त्यावर कार ढकलायला मला त्रास पडला नाही पण आता रस्त्यावरुन खाली मातीत उतरल्यावर मला ढकलायला त्रास पडु लागला... कसेबसे जोर लावत मी कार ढकलत त्या घराजवळ पोहचलो...
कारच्या हेडलाईटमध्ये पाहिले तर ते घर म्हणजे एक टपरीसारखे दुकान होते आणि अर्थात ते बंद होते... दुकानाचा टाळा पाहुन माझी सटकली आणि तोंडातुन शिवी बाहेर पडली... मला विश्रांतीसाठी काहितरी आडोसा मिळाला ह्याचा आनंद होता पण बंद दुकान पाहून मी अजुनच वैतागलो... कार तशीच सोडुन मी त्या दुकानाच्या मागच्या बाजुला गेलो आणि माझ्या लक्षात आले की दुकानाला लागुनच मागच्या बाजुला एक खोली होती... पण त्याच्या भोवती बऱ्यापैकी मोठे बंदिस्त आंगण दिसत होते... अंगणाची भिंत पेंडेच्या सुक्या गवतापासून तयार केलेली चांगली पुरुषभर ऊंचीची होती त्यामुळे आतले काही दिसत नव्हते (तसेही अंधारात काही दिसायला वाव नव्हता).
त्या अंगणाच्या भिंतीला वळसा घालुन मी मागच्या बाजुला गेलो तेव्हा मध्यावर अंगणात शिरायचा दरवाजा दिसला... गवताच्या पेंडेचाच बनलेला तो दरवाजा उघडुन मी आत शिरलो... चांगले बारा-पंधरा फुटाचे अंगण पार करुन मी खोलीच्या दरवाज्यात पोहचलो... दरवाज्याच्या वरील शेडखाली मी शिरलो आणि गेल्या तास-दिड तासात प्रथमच मला पाऊसापासून एक आडोसा मिळाला... पाऊसाच्या आडव्या तिडव्या मारापासून माझी सुटका झाली आणि जीव सुखावला! मी अंगावरील पाणी निथळत, माझे केस झटकत काही क्षण तेथेच तसा ऊभा राहिलो... कपड्यावरील पाणी बऱ्यापैकी निथळुन गेल्यावर मगच मी दरवाज्यावर थाप मारली आणि दार ठोकू लागलो...
काही क्षणानंतर कडी उघडल्याचा आवाज झाला आणि दरवाजा उघडला... घराच्या आत लावलेल्या कंदिलाचा प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात मला एक 'बाई' दारात ऊभी असलेली दिसली... म्हटले तर कंदिलाचा प्रकाश प्रखर नव्हता पण त्या मंद प्रकाशातही मला स्पष्ट दिसले की त्या बाईने वर फक्त टाईट ब्लाऊज घातलेला होता आणि खाली पेटीकोट होता... काही क्षण आम्ही दोघेही स्तब्ध होवुन एकमेकांकडे पहात राहिलो... मी कल्पना केली नव्हती की एक बाई अश्या अवस्थेत मला पहायला मिळेल आणि तिनेही बहुतेक एक अनोळखी पुरुष बाहेर असेल अशी अपेक्षा केली नसेल...
ती बाई पहिली भानावर आली आणि एका क्षणात दरवाज्यातून दूर झाली!! ज्या स्पीडने ती गायब झाली त्याच स्पीडने ती पुन्हा दरवाज्यात अवतरली! फक्त आता तिने छातीवर टॉवेल घेतला होता...
"म... मला वाटलं माझा नवरा आला... काय पाहिजे तुम्हाला??" तिने ओशाळत आपल्या उभारावरचा टॉवेल नीट करत विचारले.
"ते... माझी कार बंद पडली आहे... तुमच्या दुकानाच्या पुढे आहे..." मी म्हणालो.
"अच्छा... तुम्हीच शिवी दिली मघाशी तिकडे..." तिने हसुन म्हटले.
"स.. सॉरी हं... ते... मी कार ढकलुन ढकलुन वैतागलो होतो आणि तुमचे घर दिसले तर मनातून मी खूष झालो की आडोसा मिळाला... पण तुमच्या दुकानाचे बंद दार पाहुन मला वैतागल्यासारखे झाले... म्हणुन तोंडातुन शिवी बाहेर पडली... सॉरी हं, मला माहीत नव्हते की तुम्ही आत ऐकाल म्हणुन..." मी ओशाळत म्हटले...
"ठिक आहे हो... मला सवय आहे शिव्या ऐकायची..." तिने हसत म्हटले...
"सवय??..." मी तिला 'सवय कशी' विचारणार होतो पण म्हटले जाऊ दे आपल्याला काय करायचेय... तेव्हा मी फक्त विचारले,
"येथे कोठे जवळपास रिपेरींग गॅरेज किंवा मेकॅनिक भेटेल का??"