"म्हणुनच तुला सांगतो तू परत नोकरी कर... तेवढेच तुझेही मन गुंतलेले राहील आणि एक ठराविक रक्कम घरी येईल. तुझी ओढाताणसुद्धा कमी होईल.” आकाशने तिला सुचवले. तिने फक्त मानेच्या झटक्याने त्याची आयडिया भिंतीवरची पाल झटकावी तशी झटकून टाकली.
“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही"
“मान्य आहे पण म्हणुनच मी जमतील ते सगळे प्रयत्न करतो आहे ना... आपल्याकडे आज एकही वेलनोन - प्रसिद्ध क्लायंट नाह
ही मोठी कंपनी आपल्याला ऑर्डर देत नाही. जोपर्यंत मोठी ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हे असेच चालणार... होईल काहीतरी, बघतो मी..."
एक क्षण घुटमळून प्रेरणा बोलायला लागली. “आकाश... 'मल्होत्रा इंडस्ट्रीज'चे नाव तू ऐकले आहेसच. आपल्याला जर त्यांची ऑर्डर मिळाली तर आपले सगळे प्रश्न सुटतील. ते नाव आपल्या क्लायंट लीस्ट मध्ये आले की मग बघायला नको. नुसत्या त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या तरी आपल्या कंपनीचे एक्स्पान्शन करावे लागेल.” बोलताना त्या विचारांनीच तिच्या डोळ्यात स्वप्नाळू भाव आले आणि तिचा चेहेरा फुलून आला.
“छान स्वप्न आहे... पण फक्त स्वप्न... दिवा स्वप्न... त्यांच्यापेक्षा लहानसहान कंपन्या देखील आपल्याला
ऑर्डर्स देत नाहीत आणि मल्होत्रा इंडस्ट्रीज आपल्याला ऑर्डर देणार आहे? माझे वडील काम करतात तिथे का तुझा भाऊ?” संपूर्णपणे जमिनीवर असलेल्या आकाशने प्रेरणाच्या स्वप्नाच्या फुग्याला टाचणी लावली. तरीही मनात आलेले 'तुझा बाप' बदलुन त्याने 'तुझा भाऊ' म्हटले आणि सभ्यता दाखवली. तिचे हे दिवा स्वप्न कितीही मनोहर असेल तरी सत्यपरिस्थिती नजरेआड करायला आकाश तयार नव्हता.
"तुझे वडील अथवा माझा भाऊ - फॉर टॅट मॅटर - माझा बाप जर तिथे असता तर हा विषय तुझ्याकडे न काढता मी त्यांच्याशी बोलले असते आणि ऑर्डर घेउन आले असते. पण तशी परिस्थिती नसल्याने आपल्याला 'आहे त्या परिस्थितीत काय करता येईल' ते बघावे लागेल.”
"इतका मस्त पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे... आणि आज शनिवार आहे... दोघांनाही आज चक्क अपॉइंटमेंट नसल्याने वेळच वेळ आहे... चल आत... 'आहे त्या परिस्थितीत काय काय करता येईल' ते प्रात्यक्षिकासहित दाखवतो तुला.” नाईट गाऊन मधुन दिसणाऱ्या प्रेरणाच्या शरीराच्या कर्व्हसकडे आशाळभूतपणे बघत आकाश बोलला. नुसत्या कल्पनेने त्याच्या लंगीत खळबळ झाली.
"आकाश, प्लीज बी सिरीयस. तुला खरच जर सेक्स, मी, माझे हे शरीर, अशा मस्त धुंद वेळी आराम करणे हे सगळे आवडत असेल तर प्लीज जरा सिरीयसली बोल माझ्याशी. आय हॅव अ प्लॅन...” तिच्या बोलण्यातील सिरीयसनेस त्याला स्पष्ट जाणवला आणि तिचा गंभीरपणा संसर्गजन्य असल्याप्रमाणे तोही गंभीर झाला.
"ओके, व्हॉटस् द प्लॅन?"
"तू मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायचे आणि आपल्यासाठी ऑर्डर मिळवायची” एक आवंढा गिळून आणि सगळा धीर एकवटून शेवटी प्रेरणाने सांगुन टाकले. बोलल्यानंतर ती आकाशच्या चेहेऱ्याकडे बघायला लागली. त्याचा चेहेरा टोटली ब्लँक होता. त्याला आपले म्हणणे ऐकू आले नाही का समजले नाही ते प्रेरणाला समजेना. त्याचा तो चेहेरा बघुन तिने त्याला हलवले “आकाश, ए आकाश... काय म्हणतेय मी?"
"तू काहीतरी प्लॅन सांगणार म्हणालीस. म्हणुन वाट बघतोय."
"अरे सांगितला ना आत्ता... लक्ष नव्हते का तुझे? अरे, तू मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायचे आणि
आपल्यासाठी ऑर्डर मिळवायची"
"आज सकाळीच तुझा मुड जर माझी मजा करायचा असेल तर तू कर... मी जातो... मला बरीच कामं आहेत” '
"अरे अरे, असे काय करतोस... मी बोलतेय सिरीअसली आणि तू जातोस कुठे? काय झाले तुला?"
"तुला काही माहित आहे का ग मल्होत्रा इंडस्ट्रीज बद्दल? त्याचा एमडी सोड पण त्यांचा परचेसिंग मॅनेजरसुद्धा मला साधी अपोइंटमेंट देणार नाही. का उगाच छळतेस?"
“मी इतक्या सिरीयस मूडमध्ये अशा विषयावर बोलताना तुला छळेन वा तुझी टर खेचेन असे वाटते तुला?” विचारताना न राहवुन प्रेरणाच्या डोळ्यात पाणी चकाकले.
"मग ह्याला काय म्हणू मी? तू प्लॅन म्हणालीस तर मला वाटले खरचं तुझ्या मनात काहीतरी भन्नाट आयडीया आहे. पण ज्या कंपनीचा एमडी कोण आहे ते देखील मला माहित नाही त्या एमडीला मी भेटणार कसा आणि भेटून करणार काय?"
"मला माहित आहे" प्रेरणा उत्साहाने सांगायला लागली “एमडी चे नाव आहे राज मल्होत्रा"
"ओह, राज मल्होत्रा... नाम तो सुना होगा... तो राज मल्होत्रा? आयला, शाहरूख खानची इतकी मोठी फॅन असशील असे वाटले नव्हते मला. आणि तो तोतरा मला काय मदत करणार आहे? तो त्याच्या रा-वन ला नाही मदत करू शकला.” आकाशने माफक जोक केला. प्रेरणाला हसवण्या ऐवजी त्याच्या जोकने तिला चिडवण्याचे काम चोख बजावले.
“मी तुला शाहरूख खानकडे जायला सांगत नाहीये. डोन्ट इन्सल्ट माय इन्टिलिजन्स. मी तुला राज मल्होत्रा - मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या एमडी ला भेटायला सांगते आहे. आणि फॉर युअर काईंड इन्फोर्मेशन, रा-वन कसाही असला तरी त्याने नफा मिळवून दिला आहे... करोडोंचा... नुकसान नाही केले... आणि जो नफा मिळवतो तो यशस्वी असतो.” नाही म्हटले तरी तिच्या तिखट स्वराने आणि त्याला नसलेल्या तिच्याकडच्या माहितीने आकाश सटपटला.
"अगं तो कशाला मला भेटेल आणि कशाला ऑर्डर देईल?"