त्याचे बोलणे ऐकून प्रेरणा खूप भावूक झाली. त्याचे बोलणे तिच्या मनाला स्पशून गेले. किती साधी सोपी आणि सरळ इच्छा आहे ह्या माणसाची आणि बिचारा त्यासाठीपण प्लीज म्हणतोय. ह्या गोष्टीची तिने अपेक्षा ठेवली नसल्याने तिची तयारी नव्हती पण नाही म्हणणे तिला जीवावर आले. ती विचार करताना आकाश मोठया आशेने आणि अपेक्षेने तिच्याकडे बघत होता. काही क्षणाने मनाशी उजळणी करून प्रेरणा तयार झाली.
नविन संसारात प्रवेश करते तोडून सगळे जुने पाश भरभरून सुख मिळू दे, जोडी प्रेरणा आणि आकाश
तिच्या तोंडून तो उखाणा ऐकून आणि तिने खुबीने त्यात गुंफलेली दोघांची नावे बघुन आकाशला उचंबळून आले. त्याने तिला परत एकदा तो उखाणा घ्यायला लावला. दुसऱ्यांदा उखाणा झाल्याबरोबर आकाश पटकन दरवाजातून बाजुला झाला आणि आपले हात पसरून प्रेरणाला आपल्या मिठीत बोलावले. तिने फक्त मान हलवली - नकारार्थी.
आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली...
"माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मलापण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."
प्रेरणाच्या मागणीने आकाश विचारात पडला. 'बुमरँग' ह्या शब्दाशी त्याचा जवळुन परिचय झाला. त्याची मागणी तिने पूर्ण केल्याने तिची मागणी रास्त होती. तसेही तिची कुठलीही मागणी पूर्ण करायला तो नक्कीच तयार झाला असता. पण आत्ताची वेळ चुकीची होती. एक महिन्याच्या संयमाची आता समाप्ती होऊ घातली होती आणि अशावेळी 'भात शिजेस्तोवर धीर धरवतो, वाफ निघेस्तोवर नाही...' त्याचे तल्लख डोके कामाला लागले आणि काही क्षणात त्याच्या चेहेऱ्यावर स्मित पसरले. त्याला उखाणा आठवला किंवा त्याने एखादा उखाणा बनवला हे त्या स्मितावरून प्रेरणाला समजले. उत्सुकतेने ती ऐकू लागली...
प्रेरणा आणि आकाश - जोडा दिसेल सगळ्यात उठुन लवकर घरात प्रवेश कर, माझा धीर चाललाय सुटून
त्यानेही खुबीने गुंफलेली दोघांची नावे, तिची पूर्ण केलेली मागणी आणि उखाण्यातून प्रकट केलेली आतुरता तिला भावली आणि घरात प्रवेश करून तिने स्वतःला आकाशच्या बाहुपाशात झोकून दिले. पायाने कसेबसे दार लोटुन आकाश प्रेरणाच्या मिठीत आणि चुंबनात बुडाला. तसेही प्रेरणा त्याला रोखत नव्हतीच आणि आता त्याला स्वतःला सुद्धा संयम बाळगायची आवश्यकता नव्हती. पण हीच ती रात्र होती ज्यासाठी आकाश इतके दिवस तरसत होता. त्याला ही नुसती उरकून टाकायची नव्हती तर त्याला क्षण न क्षण उपभोगायचा होता. एक सुंदर
चुंबन वसूल करून त्याने प्रेरणाला मिठीतुन सैल सोडले. थोडासा मागे होऊन तो प्रेरणाला म्हणाला...
"आपले वैदिक पद्धतीने किंवा व्यवस्थित विधीवत लग्न झाले असते तर मला तुला मस्त सुंदर साडीत बघता आले असते. हा ड्रेस जरी छान असला आणि लग्नासाठी तू नवीन घेतला असलास तरी मला तुला आज रात्री साडीत बघायचे आहे. आत बेडच्या बाजूच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात एक बॉक्स आहे. त्यात मी आजच्यासाठी एक साडी आणली आहे. अंदाजाने तुझ्या मापाचा रेडीमेड ब्लाऊज आणि मॅचिंग परकर सुद्धा आहे. त्यावरच मोगऱ्याचा एक टपोरा गजरा सुद्धा आहे. आता पटकन आत जाऊन फ्रेश हो आणि मस्त साडी नेसून तयार हो. मग मला हाक मार"
त्याची ती तयारी आणि अपेक्षा ऐकून प्रेरणा हबकूनच गेली. आकाशचे तिच्यावर प्रेम आहे हे तिला माहीतच होते पण तो इतका रोमॅन्टीक असेल असे तिला वाटले नव्हते. तिला बोलायला शब्दच सुचत नव्हते. काही न बोलता त्याच्या ओठांचे एक पुसट चुंबन घेउन ती आत निघून गेली. ती आत गेल्यावर येऊ घातलेल्या प्रसंगाच्या कल्पनेनेच आकाश उत्तेजीत व्हायला लागला. खास ह्या दिवसासाठी खपून त्याने काही निवडक गाणी गोळा
ती. पटकन जाऊन त्याने ती सीडी लावली आणि घर रफी आणि लताच्या आवाजाने भरून गेले...
दो सितारो का जमीं पर है मिलन आज की रात मुस्कुराता है उम्मीदो का चमन आज की रात रंग लायी है मेरे दिल की लगन आज की रात सारी दुनिया नजर आती है दुल्हन आज की रात
रफीच्या आवाजात स्वतःचा स्वर मिसळून आकाश एका वेगळ्याच बेहोश मुड मध्ये शिरला. किचनमध्ये जाऊन त्याने एक ग्लास दूध पटकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून त्यात थोडी साखर आणि दुधाचा मसाला टाकला. दूध हलवून ग्लास रेडी करेस्तोवर त्याला बाथरूम आणि मग बेडरूमच्या दारांचा आवाज आला. प्रेरणा बेडरूममध्ये गेल्याची चाहूल घेउन आकाश लगबगीने बाथरूममध्ये शिरला. केसांची साफसफाई आधीच करून ठेवली असल्याने त्याने एक क्विक शॉवर घेतला आणि अंगावर डीओडरंट फवारून आणि चेहेऱ्यावर आफ्टरशेव्ह फासून त्याने शरीर एकदम सुगंधीत केले. हॉलमध्ये येऊन त्याने आपले लपवून ठेवलेले आतले कपडे आणि झब्बा सलवार काढले. आत प्रेरणा त्याच्यासाठी सजत होती. इथे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अझीझच्या स्वरात स्वर मिसळून आकाश स्वतः सजायला लागला.
कितने दिनो के बाद है आयी सजना रात मिलन की अब हमसे ना सही जाये जुदाई आयी सजना रात मिलन की
तनहाई के रुसवाई के हम कितने गम झेले