"अगं, पोटात भुकेचा आगडोंब उसळला आहे. घरी प्रेयसी... नव्हे... भावी बायको असताना तिच्या कडून मी एका ओमलेट सॅन्डविचची पण अपेक्षा करू नको?” त्याचे ते समर्थन ऐकून प्रेरणा एकदम खजील झाली. तिचा चेहेरा त्याला सांगुन गेला की तिचा भ्रमनिरास झाला आहे. तिची नाराजगी त्याला बिलकुल चालणार नव्हती. आकाश पुढे झाला आणि तिचा चेहेरा ओंजळीत पकडून त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तिच्या अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत तो तिला चक्क लीप टू लीप कीस करायला लागला. सद्यस्थिती जाणून घेउन प्रेरणा रंगात यायला लागली आणि चुंबन घेणाऱ्या ओठांचे चुंबकीय आकर्षण तोडून आकाश दूर झाला. तिच्या नाराज नजरेत नरज रोखुन आकाश बोलला
"प्रेरणा, माझे तुझ्यावर मनापासुन प्रेम आहे. त्या प्रेमात वासनेचा लवलेश नाही. तू मला सर्वार्थाने हवी आहेस हे जरी खरे असले तरी लग्न होईपर्यंत थांबायला माझी तयारी आहे. मघाशी भावनेच्या भरात मी जरा वाहवलो होतो
पण ती माझी चुक होती. मला परत ती चुक करायची नाही. मी आता आपली ही पातळी ओलांडेन ती लग्न
झाल्यावरच. आपल्या पहिल्या रात्री. सुहागरात्री...”
"पण मी तुला आत्ता सांगितले ना? मी तुला मनोमन माझा पती मानले आहे. मला आता आपल्या संबंधात कुठलीही अडचण नाही. 'त्या' अर्थाने आपण आपली 'सुहागरात' आज आत्ता करू शकतो” बोलून गेली आणि आपल्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन प्रेरणा भयंकर लाजली. तिच्या त्या लाजण्याने संमोहित होऊन आकाश पुढे झाला आणि त्याने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले. दोन प्रेमी जीव एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध झाले.
"पण एक अडचण आहे" काही क्षणाने आपल्या मिठीतून प्रेरणाला किंचित विलग करून आकाश तिच्या कानात पुटपुटला. प्रश्नार्थक नजरेने प्रेरणा त्याच्याकडे बघायला लागली.
“कायदेशीर लग्नानंतर पहिल्या रात्री प्रत्येक पुरुषाची अपेक्षा असते की त्याची बायको वर्जिन असावी. आपण आत्ता मजा मारली तर 'त्या' रात्रीसाठी मी दुसरी वर्जिन कुठून शोधुन आणू?” आकाशच्या प्रश्नावर आणि त्यानंतरच्या खळाळून हसण्यावर खवळून प्रेरणा त्याच्या छातीवर बुक्के मारायला लागली. तिलाही त्याच्या चावटपणामुळे जाम हसायला येत होते. शेवटी आपले हसणे थांबवून आकाशने तिचे हात धरले आणि पटकन ओढन आपल्या मिठीत घेतले. आताची एकमेकांच्या ओठांची पकड दोघांनाही खपच हवीहवीशी वाटत होती. चंबन थांबवून आकाश किंचित मागे झाला. बोलताना त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्श करत होते.
"प्रेरणा आत्ता थांबलोय पण आता नाही थांबवत. उद्याच्या उदया आपण एक महिन्याची नोटीस देऊ आणि नोटीस पिरियड संपला की लगेच लग्न करू. तुझा काही प्रॉब्लेम नाही ना?"
"मला कुणीही लग्नाच्या गोष्टी बोलाव्या अथवा ठरवाव्या इतके जवळचे नाही. माझा कसला प्रॉब्लेम असणार
आहे?"
"तसे नाही ग, पण एकदा नीट बघुन घे. नाहीतर नोटीस पिरियड संपायचा आणि तुझा पिरियड सुरु व्हायचा"
पुढची प्रेरणाची हालचाल गृहीत धरून आकाश आधीच आपले वाक्य पूर्ण करून लांब झाला म्हणुन बचावला. नाहीतर “नालायक....” म्हणत त्याच्या मागे धावलेल्या प्रेरणाने त्याला नक्कीच फटकावले असते.
“जा पटकन कपडे घालुन ये आणि मस्त खाऊया आपण... भुकेने जीव कासावीस झाला आहे अगदी"
त्याच्या ओठांचे पुसट चुंबन घेउन प्रेरणा बेडरूममध्ये गेली. आकाश प्रेरणाच्या पाठमोऱ्या चालीकडे बघत राहिला. तिच्या चालण्यात एक डौल होता. ते चालणे जरी रॅम्प वॉकिंग नव्हते तरी तिच्या चालण्यात ग्रेस होती. चालताना होणारी कंबरेची हालचाल जीवघेणी नक्कीच होती. शिवाय आत्ता टॉवेलने तिची पाठ आणि मागचे कुंभ जेमतेम झाकले जात होते. वर खांदे आणि खाली मांड्यांपासून संपुर्ण पाय उघडे होते. पाठीवर मागे रुळणारे काही चुकार केस सोडले तर तिचे टॉवेलने लपेटलेलं रूप बघून आकाश खूप उत्तेजीत होत होता. प्रेरणाला बहुदा माहिती होते की आकाश तिथेच उभा राहून तिच्याकडे बघतो आहे. त्यामुळे तिची चाल आणि हालचाल संथ होती. प्रत्येक गोष्ट वेळ घेउन नजाकतीने केलेली होती.