दादाचा कावा (फक्त प्रौढांसाठी शृंगारिक कथा)
आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या एका जिवलग मित्राच्या जीवनात घडलेली घटना आहे. आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजात असेही घडू शकते हे सर्वांना कळावे हा हेतु. माझा मित्र विकास हा आठवी पासूनच माझ्या वर्गात होता. आम्ही दोघेही तसे मध्यमवर्गीय घरातले. विकासला तीन मोठे भाऊ होते; तसेच मलापण. आम्ही दहावीत गेलो. विकास अभ्यासात तसा साधारण होता; तर मी एकदम हुशार. दहावीनंतर माझे कॉलेजला जाणे हे ठरलेलेच होते. ग्रॅज्युएट होणे हे माझे एक स्वप्न होते.
मात्र विकासला ते शक्य नव्हते. दहावीनंतर पुढे काय, काय करायचे याची आम्ही बरेच वेळा चर्चा करायचो. मी बँकेत किंवा एखाद्या सरकारी खात्यात नोकरी करणार होतो. तर विकास त्याला जमेल ते काम शोधणार होता. आमची दहावीची परीक्षा झाली. मी प्रथम वर्गात पास झालो, तर विकास कसाबसा पास झाला. ठरल्याप्रमाणे मी कॉलेजात गेलो. तर विकास त्याच्या मोठ्या भावाकडे पुण्याला नोकरीच्या शोधात गेला.
अधून-मधून आम्ही एकमेकांना भेटायचो. तो जेव्हा पुण्याहून यायचा तेव्हा आमची गप्पांची मैफिल जमत असे. माझे कॉलेज व्यवस्थित चालू होते. मला ग्रॅज्युएशनला पाच वर्षे लागणार होती. विकास पुण्याच्या एका मोठ्या कंपनीत भावाच्या ओळखीने नोकरीला लागला होता. त्याचा दादा म्हणजेच मोठा भाऊ हाही एका मोठ्या कंपनीत होता. त्याचे लग्न झालेले होते. त्याला दोन मुलगे होते. विकास त्यांच्याकडेच रहायला होता. त्याच्या दादाचे दोन खोल्यांचे पुण्याच्या एका उपनगरात एका चाळीत घर होते.
असाच एकदा विकास गणपतीसाठी गावी आला असता मला भेटला. सहज बोलता बोलता त्याने मला जी हकीकत सांगितली ती थक्क करणारी होती, मन सुन्न करणारी होती.
तो सांगू लागला--
एकदा अचानक वहिनीची धाकटी बहिण त्यांच्याकडे पुण्याला रहायला आली. तिच्यासाठी स्थळ बघण्याचे काम माझ्या दादावर होते. दादाची मेव्हणी आमच्याच गावातील शिवाय आमच्याच बाजुच्या मुलींच्या शाळेत शिकलेली होती. तिने दहावी नापास होताच शाळा सोडून दिली होती. ती घरीच असायची. ती अठरा वर्षांची होती. दिसायला गोरी आणि अंगाने उफाड्याची होती. दादा तिच्यासाठी स्थळ शोधण्याच्या कामाला लागला होता.