/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

"मराठी कथा" मास्टरमाईंड

User avatar
rangila
Super member
Posts: 5702
Joined: Mon Aug 17, 2015 11:20 am

Re: "मराठी कथा" मास्टरमाईंड

Post by rangila »


“डॉली!!, तुझा अजुनही माझ्यावर संशय आहे??”, जॉन
डॉली खिडकीबाहेरच बघत होती.
” अगं मी कशाला खुन करु भैय्यासाहेबांचा? माझा काय फायदा त्यात?” जॉन डॉलीला हताश होऊन विचारत होता
“पण मग त्या दिवशी भैय्यासाहेबांनी तुझ्याकडे का बोटं दाखवलं?” डॉली जॉनच्या नजरेला नजर न देता बोलत होती.
“आता ते मी कसं सांगु, भैय्यासाहेब जिवंत असते तर त्यांनीच कारण सांगीतले असते..” जॉन
“आणि त्या दिवशी??..”
“त्या दिवशी काय डॉली? त्या दिवशी काय??, तुला कित्तीदा सांगु समजावुन सांगु? त्या दिवशी घाटात मी नव्हतो! आणि शेणाचं काय घेऊन बसलीस! रात्री तु जरी ह्या गावातुन चक्कर मारुन आलीस तरी कधी ना कधी, कुठं ना कुठं तुझ्या पायाला पण लागेलच! म्हणुन काय तु खुनी झालीस का?”
“आय डोंट नो जॉन..! मला खुप भिती वाटतेय!”, डॉली
“भिती? कुणाची?? माझी?? ओह कमॉन डॉली, डोंन्ट ऍक्ट स्टुपीड.”, असं म्हणुन जॉन तेथुन निघुन गेला
“तुला माहीती आहे शशांक, नानासाहेबांपेक्षा भैय्यासाहेब मला जास्त जवळचे होते.
लहानपणापासुन मी त्यांच्याच जवळ जास्ती असायचे. ‘डॉल’ होते मी त्यांची. लहानपणी मला ते ’ये डॉले..’ म्हणुन हाक मारायचे ना.. पण आता सारंच संपल! त्यांच्या ह्या अश्या जाण्याने मला खरंच खुप धक्का बसला आहे..” सुमन डोळे टिपत बोलत होती.
“मला का कळत नाही का तुझं दुःख सुमी! पण इथं अजुन किती दिवस थांबणार आपणं? परत आपल्याला जायलाच हवं ना?” शशांक सुमनची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होता.
“हो शशांक, पण मला असं वाटत होतं की भैय्यासाहेबांचा खुनी पकडला जाईपर्यंत तरी आपणं इथं थांबावं! मला त्या नराधमाचा चेहरा पहायचा आहे आणि विचारायचं आहे, काय केलं होतं
भैय्यासाहेबांनी ज्याचा तु असा बदला घेतला?”
“हे बघ सुमी, ते काम पोलीसांच आहे, त्यांच काम त्यांना करु देत. तसंही इथे अधीक काळ रहाणं धोक्याचं आहे. तो खुनी खरंच माथेफिरु असेल तर..”
“सुमन ताई, नानासाहेबांन बोलिवलयं तुम्हा दोघांस्नी बाहेर..”, एक नोकर येऊन सांगुन गेला
सुमनने डोळे पुसले आणि शशांकबरोबर ती व्हरांड्यात नानासाहेब बसले होते तिथे गेली.
नानासाहेब नेहमीप्रमाणे सुपारी फोडत बसले होते. चाहुल लागताच, वर न बघता त्यांनी शेजारच्या खुर्चीकडे बसायला खुण केली.
दोन क्षण शांततेत गेल्यावर नानासाहेब म्हणाले, “शशांकराव, सुमे, जे झालं लय वंगाळ झालं. भैय्यासाहेबांच्या जान्यानं लय दुःख झालंय बघा. पन त्ये दुःख असं कित्ती दिस कवटाळुन बसायचं?
सकाळच्याला पंडीत आलं व्हंत! त्ये म्हणतयं भैय्यासाहेबांच्या जान्यान आपल्या खानदानावर काली सावली पडलीय. पुढच्या एक वर्षात ह्या घरात काय बी शुभ काम व्हता कामा नयं. नाय तर त्ये काम बी बिघदुन ज्याल. काही करायचंच असंल तर ह्यो १५ दिसांत आटपुन घ्या म्हणतयं त्ये. तसं बी तुमी दोघं इथं हात, मला वाटतं तुमच्या लगनाचा बार उडवुन द्यावा आत्ताच..’
’..पण नानासाहेब.. भैय्यासाहेबांच्या मृत्युनंतर असं लग्न म्हणजे..” सुमन म्हणाली..
“हो नानासाहेब, मला पण ते बरोबर वाटत नाही..” शशांकने सुमनचे म्हणणे उचलुन धरले.
“ह्ये बगा, दुःख आम्हास्नी बी हायेच की.. आम्ही गावाकडली मानंसं म्हणा नाहीतर अजुन काय, पण पंडीताला आम्ही लयं मानतो आणि त्याचा शब्द ह्यो लास्ट शब्द हाय. आत्ता नाय तर मंग पुढचं वर्षभर तुमच्या लग्नास माझा विरोध राहील.. बोला.. विचार करा आनं मला काय ते लौकर सांगा..” असं म्हणुन नानासाहेब निघुन गेले.
शशांकने सुमनच्या डोळ्याला नजर भिडवली. तिच्या डोळ्यात अजुनही दुःखाचा डोंगर उभा होता.
**************
“मिस्टर जॉन, तुमच्यासाठी फोन आहे”, लॉजच्या क्लार्कने जॉनकडे फोन ट्रान्स्फर केला.
जॉन काही क्षणच फोनवर बोलला आणि डॉलीकडे वळुन म्हणाला.. “डॉली.. चल लवकर, नानासाहेबांच्या वाड्यावर जायचे आहे..”
“अरे पण कश्याला..??” डॉली घड्याळात रात्रीचे ९ वाजत आलेले पाहुन म्हणाली..
“चल तु लवकर..” असं म्हणत जॉन जवळ जवळ पळतच खाली गेला.
नानासाहेबांचा वाडा नेहमी गुढतेनेच भारलेला असे. रात्रीच्या वेळी तर तो अधीकच भयाण दिसे. जॉनने गाडी वाड्यावर न घेता वाड्यापासुन थोड्या दुरवर असलेल्या नानासाहेबांच्या फार्महाउसकडे घेतली.
डॉलीच्या चेहर्याववरील प्रश्नचिन्ह अजुनही कायम होते.
जॉन गाडीतुन उतरुन डॉलीची वाट न बघता पळत पळतच आतमध्ये गेला. डॉलीला जॉनबद्दल का कुणास ठाऊक अजुनही विश्वास वाटत नव्हता. तिने पर्समधुन आपला मोबाईल काढला आणि इ.पवारांना फोन लावला..
फार्महाउसमध्ये अंधाराचे साम्राज्य होते.
“नानासाहेब??”, जॉन ने हाक मारली.
कुणाचाच प्रतिसाद आला नाही..
तळमजला शोधुन झाल्यावर जॉन वरच्या मजल्यावर गेला..
“नानासाहेब??”, जॉन ने पुन्हा हाक मारली… परंतु त्याच्या आवाजाव्यतीरीक्त कुणाचाच आवाज नव्हता.
जॉन अंधारातच दिव्याचे बटन शोधायला पुढे पुढे सरकत होता आणि अचानक तो कश्याला तरी अडखळुन खाली पडला. त्याच्या हाताला कसल्यातरी कोमट, चिकट द्रव्याचा स्पर्श झाला. ते काय असावं हे समजण्यासाठी जॉनला वेळ लागला नाही. त्याने पटकन हात कपड्याला पुसले आणि तो उभा राहीला. तेवढ्यात दारात कुणाचीतरी चाहुल लागली आणि दोन क्षणात खोली दिव्याच्या प्रकाशाने उजळुन गेली.
दारामध्ये इ.पवार जॉनवर बंदुक रोखुन उभे होते.. मागोमाग डॉली आतमध्ये आली आणि जॉनकडे पाहुन तिने किंकाळी फोडली.. जॉनने एकवार इ.पवार आणि डॉलीकडे पाहीले आणि त्याची नजर जमीनीकडे गेली. त्याच्या पायापाशीच नानासाहेबांचा मुडदा पडलेला होता.. आणि जॉनचे हात आणि कपडे त्यांच्या रक्ताने माखलेले होते..
“जॉन.. तु? तु केलास खुन? मला वाटलंच होत जॉन.. तुच खुनी आहेस.. त्या दिवशी पण घाटात तुच होतास.. तुला प्रसिध्दी हवी आहे जॉन आणि म्हणुनच तु हे खुन सत्र अवलंबले आहेस जॉन..”
डॉली किंचाळत होती..
“डॉली मुर्ख पणा करु नकोस.. मी एकही खुन केलेला नाहीये.. मी तुझ्याबरोबरोबच इथे आलो होतो.. तुझ्यासमोर मला फोन आला होता की नानासाहेबांच्या जिवाला धोका आहे..” जॉन..
“मला माहीत नाही जॉन तुला कसला फोन आला होता.. पण मला खात्री आहे हे खुन तुच केलेस.. त्या दिवशी मी मजेने तुला म्हणाले होते.. ते तु सत्यात उतरवलस जॉन..इ.पवार हाच तो खुनी आहे.. अटक करा त्याला..” डॉली म्हणाली..
“पवार साहेब.. काही तरी गडबड होते आहे.. मला उगाचच ह्यात अडकवले जात आहे.. मला मान्य आहे, आत्ता ज्या परीस्थीतीत मी आहे, त्यावरुन तुमचा समज तसा होणं सहाजीकच आहे. पण तुम्ही निट तपास केलात तर तुमच्या लक्षात येईल. खुनासाठी वापरलेले हत्यार माझ्याजवळ नाही, नानासाहेबांचा खुन मी का करेन? मला इथे येउन फक्त १० मिनीटंच झाली, पोस्टमार्टम मध्ये सिध्द होईल की नानासाहेबांचा खुन त्या आधीच झालेला आहे..”.. जॉन आगतीकतेने बोलत होता.
“हे बघा मी. जॉन, तुम्ही म्हणता ते खरंही असेल, पण सुकृतदर्शनी पुराव्यांनुसार मला तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावेच लागेल, माझा नाईलाज आहे..” पवार.. “मिस् डॉलीने आम्हाला फोन करुन सर्व सांगीतले आणि तुमच्याबद्दल वाटणारा संशय व्यक्त केला म्हणुनच आम्ही लगोलग इथे आलो.. चला.. आपण अधिक आता चौकीवरच बोलु..”
जॉनसमोर कुठलाच पर्याय नव्हता.. “डॉली!!, का केलेस तु असे? तुझा माझ्यावर विश्वास नाही डॉली??”.. परंतु डॉलीने तिचे तोंड दुसरीकडे फिरवले होते.
*******************************
पवारांना संशय नव्हे, खात्री होती की हे खुन जॉनने केलेले नाहीत. परंतु गावात चौथा खुन पडल्यावरही तपास अपुर्ण आहे सांगीतले असते तर गावकर्यां नी पोलीसांचे जगणे मुश्कील करुन टाकले असते. जॉन हा आयताच गळाला लागलेला मासा होता आणि तात्पुर्ते का होईना, ह्या केसवर पडदा पडला होता.. पुढचा खुन होत नाही तो पर्यंत..
पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आणि इतर जुजबी तपास पुर्ण होईपर्यंत तरी जॉनच्या नशीबी तुरुंगवास लिहिलेला होता… “नशीब बलवत्तर असेल तर ह्यातुन सुखरुप बाहेर पडु”.. जॉन विचार करत होता..
“परंतु नानासाहेबांचा खुन अगदी त्याच वेळेस झाला असेल तर मात्र कठीण आहे.. नानासाहेबांची बॉडी तशी बर्यारपैकी कोमट होती ह्यावरुन तरी निदान खुन फार पुर्वी झाला असेल असे वाटत नाही…”
“पण डॉली?? तिने का केले असेल असे?? खरंच तिचा माझ्यावर संशय होता.. भावनेच्या आहारी जाऊन तिने असे केले.. की..??”.. जॉनला राहुन राहुन डॉलीबद्दल एकमत होत नव्हते.. “का केले असेल असे डॉलीने.. का????”
जॉन विचारात मग्न असतानाच इ.पवार जॉनच्या सेल पाशी येऊन उभे होते.. “काय जॉन साहेब कसला विचार करताय??”
जॉनने एकवार पवारांकडे बघीतले.. “पवार साहेब, तुम्हाला माहीती आहे ना मी हे खुन केले नाहीत.. का पकडले आहे मला?”
“अहो.. डिटेक्टीव्ह ना तुम्ही.. करा विचार करा जरा.. तुम्ही नाही खुन केले तर कोणी केले मग? अहो. पुढचा मेंदु काम करेनासा झाला असेल तर.. मागच्या मेंदुला द्याकी जरा काम..” पवार
“पुढचा काय, मागचा काय, डावा-उजवा मेंदु असता तरी.. ह्या क्षणाला सगळेच बधिर झालेले आहेत…”
दोन क्षण शांततेत गेले आणि मग जॉन अतीउत्साहाने म्हणाला.. “येस्स पवार साहेब.. येस्स.. मी सिध्द करु शकतो मी खुन नाही केले..”
“चव्हाण, जॉनला बाहेर काढ..” असं म्हणत पवार आपल्या जागेवर जाउन बसले.., “बोला जॉन साहेब, काय सिध्द करत आहात आपण?”
“साहेब, मला फक्त तो सुर्याढचं चित्र असणारा कागद आणि मयत व्यक्तीच्या जखमांचे स्केचेस हवे आहेत.” पवारांच्या समोरच्या खुर्चीवर बसत जॉन म्हणाला
पवारांनी टेबलावरच्या फाईलमधुन पेपर काढले आणि जॉनसमोर ठेवले..
जॉनने ते सर्व स्केचेस उलटसुलट करुन नजरेसमोरुन घातले. मग त्याच्या चेहर्याउवर समाधानाचे भाव उमटले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो पवारांना म्हणाला.. “पवार साहेब, माझ्या निर्दोषत्वाचा पुरावा ह्या स्केचेस मध्येच आहे.. बघा.. निट बघा जरा..”
पवारांनी ते कागद उलटसुलट करुन पाहीले, परंतु त्यांना त्या चित्रांवरुन काहीच मागोवा लागेना.
जॉनने त्याचा पुर्ण वेळ घेतला. पवारांना त्या चित्रावरुन काहीच बोध होत नाही ह्याची खात्री झाल्यावर तो पवारांना म्हणाला.. “हे बघा पवार साहेब, ह्या सुर्याबकडे निट बघा. त्याच्या पात्याच्या एका बाजुला सुर्य आहे.. आणि दुसर्याव बाजुला सिंह.. अधीक स्पष्ट करुन सांगायचे तर डाव्या बाजुला सुर्य आणि उजव्या बाजुला सिंह.. बरोब्बर?”
“हम्म..” पवार म्हणाले..
जॉनने समोरच पडलेल्या एक कोरा कागदाची सुरनळी केली. त्याच्या डाव्या बाजुला सुर्य आणि उजव्या बाजुला सिंहाचे प्रतिकात्मक चित्र काढले.
“आता हे बघा पवार साहेब, समजा मी खुनी असतो तर.. मी जेंव्हा चाकु धरीन तेंव्हा तो असा धरीन..” असं म्हणुन त्याने कागदाची ती सुरनळी पवारांसमोर धरली.. “निट लक्ष द्या.. ह्या अवस्थेमध्ये जेंव्हा हा सुरा समोरच्या व्यक्तीच्या अंगात घुसेल तेंव्हा टिल्ट अवस्थेमध्ये सुर्यानची डावी बाजु वर असेल आणि उजवी बाजु खाली. म्हणजे मयत व्यक्तीच्या जखमेचा निट आढावा घेतला तर जखमेच्या वरच्या बाजुस सुर्य आणि खालच्या बाजुस सिंह यायला हवा.. बरोब्बर?”
“हम्म..” इ.पवार
आता चारही मयत व्यक्तींच्या जखमांचे स्केचेस पहा.. त्यामध्ये हे बरोब्बर उलटे आहे.. हे पहा.. असं म्हणुन जॉन ने पवारांना ते स्केचेस पुन्हा दाखवले.
“बरं मग? पण ह्यावरुन सिध्द काय होते?” पवार अजुनही संभ्रमात होते.
“सांगतो..” असं म्हणुन जॉनने कागदाची ती सुरनळी आपल्या डाव्या हातात धरली.. “आता पहा पवार साहेब.. ह्या अवस्थेमध्ये खुन झाला तर सुर्या ची उजवी बाजु.. अर्थात सिंहाची बाजु वर रहाते तर डावी.. अर्थात सुर्याची बाजु खाली. ज्याने खुन केला ती व्यक्ती डावरी असली पाहीजे.. हे खुन डाव्या हाताने केले गेले आहेत पवार साहेब.. आणि मी लेफ्टी नाही..” आपली बाजु मजबुत करत जॉन म्हणाला..
पवारांनी ती चित्र पुन्हा पुन्हा तपासुन पाहीली.. “इंटरेस्टींग.. तु म्हणतोस त्यात तथ्य आहे खरं.. पण हा सबळ पुरावा म्हणुन ग्राह्य धरता येणार नाही.. आणि शेवटी मुळ प्रश्न अनुत्तरीतच रहातो.. मग खुनी कोण???”
“अरे सावंत चव्हाण आले का रे मुंबईवरुन?”, पवार म्हणाले..
“व्हय साहेब, दुपारच्यालाच आलेत, झोपले असतील घरला, येतील उद्या..” सावंत..
“अरे काय.. जा.. घेऊन या त्यांना, मुंबईमध्ये शशांकबद्दल काय काय माहीती गोळा केली आहे ती मला त्वरीत पाहीजे..” पवार म्हणाले
तासाभरातच चव्हाण चौकीत हजर झाले..
“बसा चव्हाण.. आराम झाला असेल तर जरा मुद्याचं बोलणार काय?” पवार त्रासीक चेहरा करुन म्हणाले.
“व्हय साहेब.. शशांकची बरीच माहीती काढुन आणली आहे. ’कुमार’ साहेबांचं ते एकुलते एक पोर.. कुमार साहेबांची केमीकल फॅक्टरी आहे. आपल्या पोराने कंपनीची सुत्र हाती घ्यावीत म्हणुन त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत. शशांकची असणारी वाईट संगत कुमारांना मान्य नव्हती आणि म्हणुनच एके दिवशी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक पोराला घराबाहेर काढला.
सुमनची आणि शशांकची ओळख एक-दीड वर्षांपुर्वीची. शशांकची त्याआधी कोणीतरी एक गर्लफ्रेंड होती.. साहेब.. ’माल’ होती म्हणे एकदम, पण दोघांमध्ये काय बिनसलं कुणास ठाऊक आणि तिला सोडुन शशांकने सुमनशी ओळख केली.” चव्हाण बोलत होते..
“चव्हाण, त्या दुसर्याा पोरीबद्दल काही अधीक माहीती मिळाली काय?”, पवार
“नाही साहेब, त्या पोरीबद्दल तर अधीक काही मिळाले नाही, पण हे एक महत्वाचे मिळाले आहे”, असं म्हणुन चव्हाणांनी खिश्यातुन एक कागद काढुन पवारांसमोर धरला.
“काय आहे हे?” असं म्हणत पवारांनी तो कागद उलगडुन पाहीला आणि त्यांच्या चेहर्यानवरचे भाव झरझर बदलत गेले..
“लग्नाचे सर्टीफिकेट.. शशांक आणि सुमनच्या रजिस्टर लग्नाचे.. एक महिन्यापुर्वीच दोघांनी कोर्ट मॅरेज केलेय.. आणि इथं त्याची कुणालाही कानोकान खबर नाही..” चव्हाण
“ओ माय गॉड.. आता लक्षात येते आहे माझ्या सगळं.. सावंत त्या जॉनला सोडा.. खरंच निर्दोष आहे तो बिच्चारा.. चव्हाण, चला गाडी काढा..”
*******************************
“माफ कर सुमन.. पण आता तुझी जायची वेळ आली.. नानासाहेब आणि भैय्यासाहेब तुझी वाट बघत आहेत..” एका अलीशान खुर्चीत आरामात बसुन डॉली म्हणत होती.
सुमन प्रचंड भितीने आणि धक्याने घाबरुन थिजुन उभी होती.
“बिच्चारी सुमन.. आधी भैय्यासाहेबांचा आणि मग आता नानासाहेबांचा मृत्यु पचवु शकली नाही आणि तिने गळफास लावुन आत्महत्या केली..” समोरुन एक पाठमोरी आकृती सुमनच्या दिशेने हातामध्ये दोर घेऊन पुढे सरकत होती.. “बाय सुमन.. गुड बाय माय डीअर वाईफ…” चेहर्यादवरचे विकृत हास्य कायम ठेवत शशांक म्हणाला..
“थांब शशांक.. यु आर अंडर अरेस्ट..” पवार साहेबांचा धनगंभीर आवाज शशांक आणि डॉलिच्या कानावर एखाद्या वेगवान समुद्राच्या लाटेसारखा आदळला. दोघांनीही चमकुन दारात बघीतले.
दारात आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेउन पवार आणि जॉन उभे होते डॉलीची आणि जॉनची नजरानजर झाली.. पण ह्यावेळेस जॉनच्या नजरेत कोरडेपणाव्यतीरीक्त तिच्यासाठी अधीक काहीच नव्हते..
******************************************
मिस्टर कुमार आणि मिस्टर परेरा एकमेकांचे बिझीनेस पार्टनर. डॉली आणि शशांक ह्या दोघांची एकुलती एक अपत्य.. वाया गेलेली.. ओवाळुन टाकलेली. बिझिनेसच्या निमीत्ताने वडीलांच्या होणार्याय पार्ट्यांमध्ये वारंवार भेटुन एकमेकांमध्ये संबंध निर्माण झाले. परंतु पुढे कुमारांनी शशांकला आपल्या आयुष्यातुन काढुन टाकले आणि शशांक अचानक कुठेतरी निघुन गेला.
एकट्या पडलेल्या, शरीर सुखाला चटावलेल्या डॉलीला जॉनच्या रुपाने नविन पार्टनर मिळाला खरा, परंतु फारसी महत्वकांक्षा नसलेल्या जॉनकडुन तिला शरीरसुखाव्यतीरीक्त अधीक काहीच मिळत नव्हते आणि अचानक तिची भेट शशांकशी झाली.
एव्हाना शशांकने ’सुमन’ नावाचा मासा गळाला फासला होता. आवश्यकता होती ती तो मासा गट्टम करण्याची. डॉली आणि शशांक पुन्हा एकदा एकत्र आले.
त्यांच्या दृष्टीने समोर दिसणारा पैसा म्हणजे सुमन. तिच्या नावावर नानासाहेबांची जंगी मालमत्ता होती. नानासाहेबांना उडवले तर सर्व संपत्ती सुमनचीच. आणि मग सुमनशी लग्न करुन तीचा काटा काढला की सर्व संपत्ती त्याचीच..हा साधा सोप्पा विचार होता. पण मग भैय्यासाहेब? त्यांनाही मारले तर?? का नाही??
भैय्यासाहेबांना कोणी वारस नव्हता. त्यांच्या पश्चात सर्व संपत्ती नानासाहेबांचीच होणार होती. भैय्यासाहेबांचा काटा आधी काढुन मग नानासाहेबांना उडवले तर तो मोठ्ठा जॅकपॉटच होता शशांकसाठी.
पण गावातल्या दोन मोठ्ठ्या व्यक्तींचे अचानक खुन झाले तर अर्थातच पोलीसांचे लक्ष ’संपत्तीसाठी होणारे खुन’ म्हणुनच केंद्रीत झाले असते. आणि म्हणुनच मग शशांकने नविन डाव आखला. सिरीयल खुनांचा. त्याच उद्देशाने तो प्रवासी बसने शहरात दाखल होत होता. त्याचे नशीब म्हणा किंवा शेवंतीचे दुर्दैव त्या दोघांची गाडीत भेट झाली. शशांकला नशीबाने साथ दिली आणि शेवंता स्वतःच्या पावलांनी मृत्युला कवटाळायला त्याला लॉजमध्ये घेउन गेली.
अनिताताईंना मारण्याचासुध्दा हेतु काहीच नव्हता. त्यांच्या जागी दुसरे कोणीसुध्दा असु शकले असते. परंतु त्या रात्री, अंधार्याह वळणावर दबा धरुन बसलेल्या शशांकला अनिताताई आयतेच सावज होत्या.
त्यानंतर ह्या सिरीयल खुन्यानेच भैय्यासाहेब आणि नानासाहेबांना मारले असा आभास निर्माण करायचा. मग ह्या खुनांमध्ये कुणालातरी गुतवायचे आणि आपण नामनिराळे रहायचे असा बेत होता.
डॉलीने जॉनला ह्या केसमध्ये गुंतवण्याचा विडा उचलला. बुडती लागलेल्या एखाद्या डिटेक्टीव्ह एजंटला नव्याने भरारी घेण्यासाठी आवश्यकता असते ती प्रसिध्दीची. लोकांच्या तोंडी नाव होण्याची. आणि त्यासाठीच जॉनने हे खुन घडवुन आणले आणि काही बाही खोटे पुरावे सादर करत चर्चेत राहण्यासाठी त्यानेच हे सर्व केले हे सिध्द करायचे.
पोलीस फारसा विचार न करता सुकृतदर्शनी पुरावा पाहुन ’प्रसिध्दीसाठी’ खुन करणार्याक जॉनला अटक करतील. सवडीने नानासाहेब आणि भैय्यासाहेबांच्या मृत्युने धक्का बसलेली सुमन स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करेल आणि शशांक जो सुमनचा नवरा होता तोच ह्या संपत्तीचा सर्वेसर्वा होणार होता.
डॉलीने काही करण्याआधीच जॉन स्वतःहुन तरवडे गावात दाखल झाला आणि नंतर फक्त त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डॉली सामील झाली. पुढे जे योजले होते तस्सेच घडत गेले, फक्त जॉनला अडकवण्यात एकच चुक झाली..ती म्हणजे सुर्यागच्या दोन बाजुंना असणारी वेगवेगळी नक्षी. आणि तेथेच तो प्लॅन फसला. कारण त्यावरुनच ’लेफ्टी’ खुन्याची ओळख झाली.
भैय्यासाहेबांनी मरताना जॉनला डॉलीकडे बोट दाखवुन सुमनशी संबंधीत काहीतरी असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.. पण सुमनचे भैय्यासाहेबांनी लाडाने पाडलेले ’डॉली’ नाव आणि त्यामागचा संबंध कुणाच्या लक्षात आला नाही.
चव्हाणांनी आणलेली माहीती, डॉलीचे अचानक जॉनच्या विरोधात जाणे आणि पोलीसी सिक्थ सेन्सच्या सहाय्याने पवार खुन्यापर्यंत पोहोचले..काही क्षुल्लक घटनांवरुन पवारांनी तर्क बांधला आणि शशांक आणि डॉली तावडीत सापडले..
मास्टरमाईड.. प्रत्येक क्रिमीनल स्वतःला असेच समजत असतो..परंतु ’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अशी शपथ घेतलेल्या महाराष्ट्र पोलीसांना कमी लेखण्यात ते फार मोठ्ठी चुक करत असतात हेच इ.पवारांनी पुन्हा एकदा दाखवुन दिले.
********************************************
[समाप्त]

Return to “Marathi Stories”