दुस-या दिवशी सकाळी उठून मी आणि ताई आम्ही गणपतीचे मखर बनवू लागलो. दुपारी जेवणं झाल्यावर थोडावेळ आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. तेव्हासुद्धा काकांनी माझ्या लग्नाचा विषय काढला, तो विषय टाळून आम्ही पुन्हा मखराच्या कामाला लागलो. रात्री जेव्हा मी, ताई आणि वहिनी बेडरूममध्ये बोलत बसलो होतो तेव्हा ताईने माझ्या लग्नाचा विषय काढला. त्यावर मी ताईला म्हणालो कि
"मी काकांना उद्या सांगणार आहे कि मला इतक्यात लग्न नाही करायचे." आमचे बोलणे ऐकून वहिनी म्हणाली
"नाही अस नकोस बोलूस. त्यांना वाईट वाटेल. कारण त्यांचे बोलणे मी ऐकले आहे. अगोदरच ते टेन्शनमध्ये आहेत दोन्ही मुली लग्न नाही करत आहेत म्हणून आणि आता तूदेखील नाही म्हणालास, तर त्यांच्यावर आभाळ कोसळेल."
वहिनीचे बोलणे ऐकून ताईसुद्धा म्हणाली कि " वहिनीचे बरोबर आहे, "
त्यावर मी उत्तर दिले " जर मी लग्न केले तर मला तुमच्याबरोबरचे संबंध सोडावे लागतील आणि मला ते नाही करायचे आहे."
आम्ही तिघेही विचारात होतो. त्यावर वहिनी म्हणाली " एक मार्ग आहे, पण सोना तुला बरीच तडजोड करावी लागेल, "
मी लगेच म्हणालो " तुमच्यासाठी मी कुठलीही तडजोड करायला तयार आहे " त्यावर वहिनी म्हणाली
"जर तुझे लग्न पल्लावीशी झाले तर सगळे काही व्यवस्थित होऊ शकते."
"कोण पल्लवी ? "मी म्हणालो.
त्यावर वहिनी म्हणाली " माझी लहान बहिण, "
" कसं शक्य आहे ?" मी वहिनीला म्हणालो.
" ते तु माझ्यावर सोड. मी तिला तयार करीन. आम्हा दोन्ही बहिणीमध्ये खूप प्रेम आहे. माझ्यासाठी ती तयार होईल. पण जर तुला चालणार असेल तर, तु विचार कर ती फक्त बारावी शिकली आहे. बाकी दिसण्यासाठी तर तु तिला बघितलीस आहे."
तशी ताई मला म्हणाली " सोना जर आपल्याला संसार थाटायचा असेल, तर हा एकच मार्ग आहे. प्लीज माझ्यासाठी तयार हो, "
मी विचार करत म्हणालो " जरी समजा मी तयार झालो तरी आपण कसे करू शकणार काका आणि बाबा तयार झाले पाहिजेत."
वहिनी म्हणाली " जर तु तयार असशील तर बाकी माझ्यावर सोड. मी उद्या बाबांना सांगते कि सोनासाठी माझी बहिण आहे आणि जर ती घरात आली तर मला किवां काकूला त्रास नाही होणार, शिवाय विभूसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही होणार. आमच्यासाठी किंवा किमान विभूसाठी तरी सगळे तयार होतील फक्त तु तयार हो."
दुस-या दिवशी वहिनीने काकांना सांगितले. काकांनी मला विचारले मी काय बोलणार होतो. मी मोठ्या बलिदान कारक स्वरात म्हणालो " मला नुसता माझा नाही माझ्या कुटुंबाचासुद्धा विचार करायचा आहे, जर ती माझ्या ह्या कुटुंबाबरोबर हसून खेळून प्रेमाने राहणार असेल तर मला हरकत नाही." पण काकूला आणि दीदीला ठाऊक होते कि मला मॉडर्न आणि शिकलेली मुलगी हवी आहे आणि मी ह्या लग्नाला तयारी दाखवली तसा दीदीला आपल्या व्यवसाया धरून माझ्यावर काही शंका आली आणि त्या दिवसापासून काकू आणि दिदीमध्ये काहीतरी शिजायला सुरु झाले.
कारण वहिनीची बहिण दिसायला सुंदर होती, पण खेडवळ होती आणि मी ५.११" उंच रेगुलर जिम करत आल्यामुळे माझे शरीर एकदम पिळदार होते शिवाय सिल्की केस गोरा रंग आणि दिसायलासुद्धा मी रेखीव आहे आणि मुख्य म्हणजे मी खूप शिकलेलो आहे, त्यामुळे काकू आणि दीदीला खात्री होती की काही कट असल्याशिवाय मी ह्या लग्नाला तयार होणार नाही. खरे तर दीदी आमचा प्लॅन सहज शोधू शकली असती, पण तिच्या अती शहाणपणा मुळे आम्ही सावध झालो. तिचा अती शहाणपणा म्हणजे तिने ताईला सगळे सांगितले आणि आम्ही सावध होऊन पुढे चालू लागलो.
खरे तर आम्हाला दिदीची भीती नव्हती खरी भीती होती ती काकूची, काकू म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आहे. असो तर गणपतीच्या पहिल्या दिवशी वहिनीचे आई बाबा आणि पल्लवी घरी आले होते. तेव्हा काकांनी त्यांच्यासमोर माझ्या लग्नाचा विषय काढला, ते सुद्धा आनंदाने तयार झाले. मग काय काकांनी लगेच गुरुजींना बोलावून मुहूर्त वैगरे काढला सगळे काही नक्की झाले, पण काकूला शांती नव्हती शेवटी तिने मला एकट्याला गाठून विचारलेच
"तुला तर शिकलेली आणि हॉट मुलगी हवी होती, मग हिच्याशी लग्नाला का तयार झालास?"